Tuesday, January 16, 2018

गांधीजी च्या खून्याचे पितळ उघडे.



Superb Reply by Mr. Ganeshprasad Deshpande Sir on Facebook on people who supports Killer Nathuram Godse for the murder of Mahatma Gandhi ji
Great reply Sir !!!!

काही गोष्टी स्पष्ट बोलाव्याच लागतात. आंधळे गांधीभक्त विरुद्ध मूकबधीर गांधीविरोधक हा वाद खेळण्याची ही जागा नव्हे. तिच्यासाठी विक्रांत अलगुजे, समीर यादव किंवा इतरही कुणी हवा तर स्वतंत्र ग्रुप काढावा. (तसे केल्यास मला त्यात गांधी समर्थक म्हणून जरूर समाविष्ट करा.) 'गांधी हत्या आणि मी' आणि '५५ कोटींचे बळी' यांच्या संदर्भात पहायचे तर गोपाळ गोडसे कसे दिसतात?
प्र. १) गांधीहत्येचा (किंवा संघ परिवाराला आवडणाऱ्या भाषेत बोलायचे तर गांधीवधाचा) खटला संपला, शिक्षा झाल्या आणि गोपाळ गोडसे शिक्षा भोगून बाहेरही आले. आता त्यांना पुस्तकात स्पष्टपणे गांधीवधाच्या कटाची संपूर्ण हकीकत द्यायला काय हरकत आहे? त्यांच्या कोणत्याही 'हो' किंवा 'नाही'ने आता परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. मग त्यावर ते स्पष्ट उत्तर का देत नाहीत?
प्र. २) ज्या वेळी गोडसे आणि इतरही हिंदुत्ववादी लोकसंख्येची अदलाबदली हा उपाय सुचवतात तेव्हा ते थेट जीनांच्या द्विराष्ट्रसिद्धांताला मान्यताच देताहेत  ना? मग जिना आणि हिंदुत्ववादी या एकाच नाण्याच्या दोन बाजू नव्हेत का?
प्र. ३) हैद्राबादमध्ये 'नथुरामने मदत पुरवली' असे का? हिंदुत्ववादी कुठे होते? हैद्राबाद सत्याग्रहात भाग घेणाऱ्या लोकांमध्ये हिंदुत्ववादी किती होते आणि 'महात्मा गांधी की जय' असा घोष करीत भाग घेणारे किती होते? हिंदुत्ववादी अल्प हा शब्दही मोठा वाटावा एवढ्याच संख्येने सहभागी नव्हते काय?
प्र. ४) पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा सरकारी निर्णय गांधींनी उपोषण करण्याआधीच झाला होता हे असंख्य सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरून पुरेसे सिद्ध झाले नाही काय? आता तर ती सर्व सरकारी कागदपत्रे गुप्ततेच्या कायद्याच्याही बाहेर आली आहेत. गोडसे आणि कंपनीने ५५ कोटींची गांधींवर टाकलेली जबाबदारी ही चूक आहे हे सिद्ध झाले आहे. मग एका गैरसमजापोटी देशातल्या सर्वात उंच नेत्याची हत्या (किंवा वध) करणे यात कोणते शौर्य मानावे? आणि पुन्हा एकदा, व्यक्तिगत स्वार्थ नसणे एवढी एकाच गोष्ट कुणाला आपल्या कृत्याच्या जबाबदारीतून मुक्त करायला पुरेशी आहे का?
एक गोष्ट सांगतो. माझ्या वडिलांच्या पिढीपर्यंत माझे सारे कुटुंब (म्हणजे माझे वडील, त्यांचे सारे भाऊ-अर्थात माझे सगळे काका माझी आई, सर्व काकू वगैरे वगैरे) रा. स्व. संघाच्या पठडीत वाढले आहे. माझे सगळे काका संघाच्या व्यवस्थेत पदाधिकारी होते. त्यामुळे संघ मी फार फार जवळून पाहिला आहे. संघ आणि संघ परिवार यांच्याइतका अफवा, अपसमज आणि असत्य हे सत्याच्या भावात विकणारा दुसरा विक्रेता मी आजतागायत पाहिला नाही. संघ जेव्हा एखादी गोष्ट मांडतो तेव्हा ती मुळापासून पारखून घेणे हेच शहाणपणाचे हे निर्विवाद.
शेवटचा मुद्दा- या सगळ्या चर्चेत सागर भंडारे यांनी शेषराव मोरे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्यावर नंतर चर्चेत भाग घेणाऱ्या सर्वानी मौन पाळले आहे- 'फाळणीसमर्थक मोरे..... अविचार...' हा पराग वैद्य यांचा शेरा हा एकमेव अपवाद. वैद्य- मोरे यांच्या प्रतिपादनात चूक काय आणि गांधीं आणि काँग्रेस यांनी फाळणीला मान्यता देण्याऐवजी काय करायला हवे होते याची काही तर्कशुद्ध मांडणी कराल? तुम्ही असे काही केलेत तर आपल्या मताची वैचारिक मांडणी करणारे पहिले हिटलरसमर्थक हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही इतिहासात नोंदले जाल. घेणार ही संधी?