Wednesday, October 21, 2020

मोदी फेल का आहेत ?

मनमोहन सिंह यांचे काम चुकीचे असते तर देशाचा जी डी पी वाढला नसता
माल्या नीरव मोदी चोकसी यांना कर्जे जरी काँग्रेस काळात दिली गेली असली तरी त्यांची परतफेड ते वेळेवर करत होते.  
हे लोक विदेशात पळून गेले ते मोदींच्या काळात हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल.
कागदोपत्री हे सिद्ध झालेले आहे की नीरव मोदी चोकसी व्हिडिओकॉन यांची सर्व कर्जे कोणतेही तारण नसताना मूळ कर्जांच्या वीस ते दोनशे पट जास्त पुन्हा दिली गेली ते २०१४ ते २०१७ या काळात. मग त्या कारभाराचा दोष पण काँग्रेस चा? 
मोदींच्या मागच्या ६ वर्षांच्या काळात मोजक्या उद्योगपतींची २५ लाख कोटी रुपयाची कर्जे माफ झालेली आहेत जी आजपर्यंत कोणत्याही सरकारने केली नव्हती.
आपण सामान्य लोकं जे पेट्रोल आज ७० /८० रुपयांनी भरतो आहोत त्यांची प्रत्यक्ष किंमत २० ते २२ रुपये आहे. जागतिक तेलाचे भाव पत्त्यासारखे कोसळून तो फायदा सामान्य माणसांना दिला जात नाहीये. यातून सरकारने गेल्या ४ वर्षांत ५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे. लोकांना लाभ न देता कोणाला लाभ मिळाला हे तुमच्या आता लक्षात आले असावे.
 मागच्या तिमाहीत जी डी पी -२४% एवढा जोरात कोसळला आहे. सरकारचे टॅक्स द्वारे होणारे उत्पन्न कमी झाले आहे. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे इन्कम टॅक्स आणि पी एफ फंडात येणारी रक्कम कमी झालेली आहे. हे सर्व असताना परिस्थिती सुधारत आहे असे वाटते तुम्हाला ?
 मनमोहन सिंग यांच्यासारखा गोल्ड मेडलिस्ट अर्थतज्ज्ञ पंतप्रधान होता म्हणून २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीतून देशाला त्यांनी वाचवले होते. ती आर्थिक अडचण आजच्या पेक्षा भयंकर होती. मी स्वतः त्यावेळी सविस्तर अनुभवले आणि अभ्यासले पण आहे. 
एका डिग्री चां पत्ता नसलेल्या पी एम च्या आर्थिक ज्ञानावर तुमचा विश्वास आहे पण जगातील सर्वात प्रगत देशांत ज्या अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांच्या पुस्तकांचा, लेक्चर्स चां, त्यांनीं घेतलेल्या निर्णयाचा आदर्श म्हणून अभ्यास केला जातो त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही हे समजण्या पलीकडे आहे. 
मोदी सरकारने ६ वर्षांचा काळ पूर्ण केला आहे हे ही बघा. अजून किती वाट बघायची ? ६ वर्षे हा खूप मोठा काळ असतो कामाची फळे दिसण्यासाठी. 
नोट बंदी आणि चुकीची जी एस टी यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्ण कोसळली आहे.
जी एस टी कलेक्शन मधले राज्यांना देण्यासाठी केंद्र सरकार आज हात वर करत आहे.
एकट्या महाराष्ट्रातून केंद्र सरकारला देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ३८% टॅक्स मिळतो. आणि जेव्हा राज्याला गरज आहे तेव्हा ते पैसे मिळत नाही आणि थकवले जातात. राज्याचे उत्पन्न नसेल तर कोणते राज्य काम करू शकेल ? हे एक उदाहरण आहे.
तुम्ही जी माहिती सांगितली ती मी संघ आणि भाजप ने व्हॉटसअप द्वारे पसरलेली माहिती आहे. सत्य नाही एवढे सांगून थांबतो.
स्वतः बघा काय होत आहे ते. मोदी केवळ १ ते २ टक्के गोष्टींवर लक्ष देत आहेत.
प्रत्यक्षात देशासाठी सर्वात महत्त्वाचे आहे रोजगार, नोकऱ्या, आरोग्य सुविधा, शिक्षण, अन्न , वस्त्र निवारा ... या सर्व गोष्टी उत्तम झाल्यावर मोदींनी हवे तेवढे पुतळे आणि मंदिरे बांधावीत. कोणाचीही त्यावेळी हरकत नसेल. 
आत्ता गरज काय आहे आणि मोदी काम काय करत आहेत हे ही तपासून बघण्याची गरज आहे.