Tuesday, March 20, 2018

मोदींनी विश्वासार्हता पूर्ण का गमावली आहे ?

मोदींनी विश्वासार्हता पूर्ण गमावली आहे हे वास्तव, कटू आणि जळजळीत सत्य आहे. प्रधान सेवक म्हणवणाऱ्या मोदींनी हि घोषणा देखील पंडित नेहरूंच्या पंतप्रधान म्हणजे प्रथम सेवक या घोषणेवरून ढापलेली आहे. दुसऱ्याच्या कर्तृत्त्वावर स्वतःचे लेबल लावणे याला काम म्हणत नाहीत. मग ते इंदिरा गांधींनी १९८० साली  सुरु केलेल्या आवास योजनेला प्रधानमंत्री आवास योजना असे नाव बदलून स्वतःचे ढोल बडवणे असो
अथवा मनमोहन सिंग सरकारने सुरु केलेल्या आरोग्य सुरक्षा विमाचे नाव प्रधान मंत्री सुरक्षा योजना असे नाव बदलून गरिबांचे आपणच कैवारी असल्याचे सोंग घेणे असो. या शिवाय भाजप आणि मोदींनी काही केलेले नाही.

- २३,००० अब्जाधीश मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भारतातून विदेशात स्थलांतरित झालेले आहेत (मॉर्गन स्टॅन्ली चा अधिकृत रिपोर्ट)

- देशातील कित्येक लाख करोड रुपये विदेशात चालले आहेत. मोबाईल क्षेत्र सोडले तर  विदेशी कंपन्या भारतातील गुंतवणूक कमी करत आहे.  लाखो लोकांचे रोजगार संपले आहेत.
- एकट्या खादी क्षेत्रात गेल्या दोन वर्षांत ७ लाख लोकांचे जॉब्स गेले आहेत (केंद्र सरकारचा अधिकृत रिपोर्ट)
आणि मोदी सत्तेत असलेल्या  केंद्र सरकारच्याच  श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत आकड्यानुसार देशात २ लाखांपेक्षा जास्त नवे रोजगार देखील निर्माण झालेले नाहीत.
- २०१४ च्या निवडणूकींत मोदींनी देशाच्या तरुणांना आश्वासन दिले होते कि दार वर्षी २ करोड लोकांना रोजगार देऊ. प्रत्यक्षात हे सरकार वर्षाला  २ लाख जॉब्स देखील देऊ शकत नाहीये. भारताचा विकास दर जो काँग्रेस सरकारच्या काळात कधीही खाली आला नव्हता इतका खाली मोदी सरकारच्या कारकिर्दीत आला आहे.
- नोटबंदी आणि GST  या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करणाऱ्या प्रमुख घटनांची अत्यंत बेजबाबदार पद्धतीने केलेली अंमलबजावणी आणि त्यामुळे बाजारात निर्माण झालेली कमालीची अस्थिरता हे सध्याच्या मोदी सरकारचे  खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. सामान्य जनतेचे नाहीत. सामान्य जनतेला वेठीस धरणारे सरकार जेव्हा जेव्हा सत्तेवर येऊन मनमानी करू लागले तेव्हा तेव्हा जनतेने त्यांना उचलून फेकून दिलेले आहे. हा इतिहास आहे. मग ते सरकार इंदिरा गांधींचे सरकार असो, मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या टर्म चे सरकार असो, आणि आता हुकूमशाही पद्धतीने काम करणारे सध्याचे मोदी सरकार असो. जेव्हा जेव्हा राज्यकर्त्यांना मस्ती चढली आहे तेव्हा तेव्हा जनतेने त्यांना लोकशाहीची ताकद दाखवलेली आहे. मोदी  सत्तेच्या नशेत  हेच विसरून गेले कि आपला देश  युरोप अमेरिकेतील देशांसारखा प्रगत नाहीये तर आपण अजूनही विकसनशील राष्ट्र आहोत. अन्न, वस्त्र ,निवारा , महागाई आणि रोजगार हे अजूनही आपल्या देशाचे  खूप बेसिक   प्रश्न आहेत या मूलभूत प्रश्नांवर काम करणारे सरकारच लोकप्रिय होऊ शकते. केवळ हिंदू मुस्लिम आणि राममंदिर याच्या नावाने लोकांमध्ये तेढ निर्माण करणारे सरकार कधीही दीर्घ काळ राज्य करू शकत नाही.