Tuesday, April 9, 2019

२०१९ मधील निवडणुका योग्य पद्धतीने होतील का?

२०१९ मधील निवडणुका योग्य पद्धतीने होतील का?

खरे तर हे शीर्षकच एक प्रकारे वादग्रस्त आहे याची मलाही जाणीव आहे. पण एकूण परिस्थिती पाहता २०१४ पेक्षा २०१९ मध्ये जनतेला असे वाटण्यास काहीतरी कारण नक्कीच आहे. माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे. मी लहानपणापासून शिवसेना आणि भाजप समर्थक होतो. काँग्रेस पक्षाला कधीही मत दिले नव्हते. २०१४ मध्ये मी आणि माझ्या कुटुंबातील १० जणांनी भाजपला प्रचंड आशेने मतदान केले होते. २०१९ साठी आम्हा सर्व १० जणांची भूमिका एकदम स्पष्ट आहे की मतदानात सहभागी व्हायचे नाही. त्याला अन्य कारणेही आहेत. पण असो.
मुख्य कारण काय आहे तर नरेन्द्र मोदी हे ज्या आवेशात २०१३ / १४ मध्ये बोलत होते त्याच्या उलट त्यांचे पूर्ण वागणे पंतप्रधान झाल्यावर आहे. मी प्रत्येक महिना मोदीं काय काय करत होते हे गेली ५ वर्षे ट्रॅक करत होतो.
मोदी एकामागोमाग एक असे नेहरु आणि  गांधी कुटुंबिय , मनमोहन सिंह , यांच्यावर आक्रमक होऊन आरोप करत होते. टीका करत होते. नेमकी हीच गोष्ट मला खटकू लागली. स्वतःच्या हातात सत्ता आल्यावर मोदी काय करणार? याचा पूर्ण ब्लू प्रिंट ते निवडणूकीच्या काळात झालेल्या प्रचारात मांडत होते. उदाहरणच द्यायचे झाले तर शपथविधि झाल्यावर सर्वात पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा सर्वात पहिले काम मी केलेले असेल अशी ते घोषणा करत होते. ( या सर्वांचे पुरावे हवे असतील तर यु ट्युब वर सगळी भाषणे उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी ती अवश्य पहावीत)
पहिले २ वर्षे भ्रमात गेल्यावर मग मी मोदी सांगत असलेल्या गोष्टी तपासून पहायचे ठरवले. नेमक्या याच काळात मी स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते मनमोहन सिंह यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे देशी - विदेशी अभ्यासकांचे लेख अभ्यासले आणि ते सरकारी डाटा सोबत तपासुनही पाहिले. मग माझा भ्रम तुटू लागला.
मोदींच्या देशभक्ती अथवा हेतूबद्दल मला शंका नाहिये. पण अशा शेकडो फॅक्ट्स समोर आल्या कि ज्यामुळे मला नेहरुंनी किती विपरित परिस्थितित भारताचा ढांचा घडवला, याचे सखोल दर्शन झाले. नेहरु सुद्धा माणूस होते त्यामुळे ते चुकणार होतेच. पूर्ण राष्ट्र निर्माण करायचे होते त्यांना. ज्या चुकांवर मोदी बोट ठेवत आहेत ते मुद्दे मोदींसाठी आज मोठे आहेत. त्या काळात भारताच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या याचे भान आरोप कर्त्यांना नव्हते. अत्यंत गरीब असलेला देश, जिथे अन्न , वस्त्र, निवारा, शेती, औषधोपचार, शिक्षण या सर्वोपरि महत्वाच्या गरजा होत्या त्यांच्यावर पूर्ण लक्ष देणे अत्यंत गरजेचे होते हे सर्व लक्षात आले, पुढे अनेक पंतप्रधान झाले. पण सर्वांनी नेहरूंनी दिलेल्या आराखड्यानुसार च काम केले. आज मागे वळून पाहताना ६० वर्षांत एका लोकशाही असलेल्या देशाने गरिबीतून इतकी प्रगती केल्याचे जगाच्या इतिहासात दुसरे उदाहरण नाही.  आपली तुलना आर्थिक सधन युरोप अमेरिकेशी आज करु बघतो आहोत. पण हेही बघितले पाहिजे कि गेल्या ६० वर्षांत एका योग्य नियोजनाद्वारे आपण काम केले ते एवढे सोपे असते तर आज आफ्रिका , इतर आशियाई देश, लॅटीन अमेरिकी राष्ट्रे आज कुठल्या कुठे असती. जगात सर्वत्र आज अराजक आहे. भारत हा केवळ एक अपवाद आहे. जगातील सर्वात विपरित परिस्थिति जर कुठे असेल तर ती भारतात आहे. सर्व धर्मिय लोक इथे राहूनही पंडित नेहरुंनी भारताला "सर्व धर्म सम भाव"  या तत्त्वावर राष्ट्राची उभारणी केली. त्यासाठी असंख्य लोकांनी मेहनत घेतली. असे असतानाही काही चुका होणारच. जो काम करतो तोच चुकतो. म्हणून पंडीत नेहरूंनी देशाचे हित आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या सुखासाठी लोकशाही मार्गाने सर्वांना समान संधी मिळावी असा देशाचा ढांचा उभा केला. आज देश जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत काय एकट्या मोदींनी नेऊन ठेवला ?????? २०१४ साली मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा भारताने २ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा आकडा पार केलेला होता. आज ५ वर्षांनी हा आकडा केवळ २.६० ट्रिलियन डॉलर्स इतकाच आहे. पुढील ८ वर्षांत या वेगाने मोदी कोणत्या तोंडाने १० ट्रिलियन डॉलर्स ची अर्थव्यवस्था बनवणार आहेत? ना कोणती योजना ना कोणती व्यवस्था. नुसत्या घोषणांनी अर्थव्यवस्था मजबूत होत नसते. तर त्यासाठी कुशाग्र बुद्धिमत्तेची गरज असते. ती मनमोहन सिंह यांच्या सारख्या सुशिक्षित पंतप्रधानांकडे होती. अशिक्षित असलेल्या मोदींकडून अशा आर्थिक प्लानिन्ग ची अपेक्षा करता येऊ शकेल ?

अशी असंख्य कारणे देता येतील ज्यामुळे हे सहज सिद्ध होते की मोदी हे भारताच्या इतिहासातले अत्यंत अकार्यक्षम पंतप्रधान आहेत. त्यामुळे मोदींना मत म्हणजे देशाच्या मुळावर आपण स्वतःच कुर्‍हाड मारण्याची चूक करतोय असे होईल. तेव्हा मतदारांनो तुम्हाला हवे त्याला मत द्या. फक्त तो उमेदवार भाजप चा नसेल एवढे बघा. अन्यथा २०२४ मध्ये पुन्हा निवडणूका होणार नाहीतच. पण गेल्या ६०/७० वर्षांत जो काही कायदेशीर मार्गाने  , लोकशाही मूल्ये जपत, आपण सर्वांनी जो भारत देश उभा केलेला आहे. तो कायम स्वरुपी मागासलेपणाकडे वाटचाल करेल. खुद्द गुजरात मध्ये काही महिन्यांपूर्वीच दलित लोकांना शिक्षण नाकारले गेले आहे. असा भारत आपल्याला हवाय का? आपण सर्वांनी ठरवा की तुम्ही तुमच्या मुलांना स्वतंत्र विचार्सरणीचे आयुष्य देऊ इच्छिता की त्यांना वर्चस्ववादी लोकांचे गुलाम बनवू इछिता?

भाजपला मत म्हणजे देशद्रोह्यांना मत अशी कटू असली तरी दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.  तेव्हा मतदारांनो तुम्हाला हवे त्याला मत द्या. फक्त तो उमेदवार भाजप चा नसेल एवढे बघा.

#२०१९_निवडणुका
-सागर