Tuesday, March 19, 2019

मोदींना विरोध का ? आणि मोदींना का निवडून देऊ नये ?


महाराष्ट्र टाईम्स मध्ये एक बातमी आली आहे.
बातमी : Times Now-VMR survey: हवाई हल्ल्यामुळे भाजपच्या जागांमध्ये वाढ?
बातमीची लिन्कः https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/nda-likely-to-gain-13-seats-after-balakot-air-strike-and-get-283-seats-says-survey/articleshow/68475084.cms 


यावर कोणा DharmnirapekshBharat (धर्मनिरपेक्ष भारत) म्हणून एका माणसाने मोदींना का निवडून देऊ नये याची भली मोठी यादीच दिलेली आहे.तीच इथे ब्लॉग वर साठवून ठेवत आहे. कारण प्रतिक्रिया सरकार विरोधी असल्याने उडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 



१.  एन डी ए (मोदी सरकार) सरकारने पावणे पाच वर्षांमध्ये काय काय केले?<br/>१. गाईला आई म्हटले, बैल त्यांचा बाप झाला. लव्ह जिहाद, गोहत्या बंदी सारख्या संवेदनाशील विषयांना चिथावणी दिली. धार्मिक तेढ वाढवण्याचे काम केले. अनेक लोक ''मॉब लिंचिंग'' चे बळी ठरले. भारतावर असहिष्णुतेचा ठपका बसला. अनेक विचारवंतांनी मिळालेले पुरस्कार परत केले. काहींना पाकिस्तानात जाण्याचा अविवेकी सल्ले देण्यात आले. विरोध करणाऱ्या लोकांवर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवण्यात आला, मूर्खपणाचा कळस झाला.

२. नोटाबंदीचा किंवा नोटा बदलीचा (५०० आणि १००० च्या नोटा) अर्थतज्ञ् व्यक्तींशी सल्ला न घेताच आततायीपणे निर्णय घेतला. निर्णय चुकीचा झाला तर चौकात फाशी द्या, असे सांगितले गेले. शब्दाला जागणे यांना मान्य नाही, हे सिद्ध झाले. १०० पेक्षा जास्त लोक बँकांच्या रांगेत राहून मरण पावले, त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेतली नाही, बँकांचे सुद्धा काही कर्मचारी दगावले गेले. काळा पैसा चलनात येणार अशी हमी दिली गेली मात्र प्रत्यक्षात ''डोंगर पोखरून उंदीर'' सुद्धा मिळाला नाही. २००० ची नोट छापण्यामागचे कारण सांगण्यात अपयश आले. ५००० कोटी पेक्षा जास्त पैसा नव्या ५०० आणि २००० च्या नोटा छापण्यात व्यर्थ घालविले. देशवासियांना प्रचंड मानसिक त्रास झाला, ते वेगळेच. भारतीय अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली. अनेक लहान लहान उद्योग बंद पडले, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. चाय-पकोडे विका असे सल्ले देऊन बेरोजगार तरुणांच्या जखमेवरती मीठ चोळले गेले. देशवासीयांच्या मनातून कायमचे उतरले! चूक मान्य केली नाही, जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजतागायत चालू आहे.

३. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही उदा. परदेशातला काळा पैसा ९० दिवसात भारतात परत आणणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करणार, दाऊद इब्राहिमला लगेच भारतात परत आणणार, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी आमलात आणणार, तरुणांना प्रत्येक वर्षी २ कॊटी नोकऱ्या देणार (पाच वर्षात १० कोटी नोकऱ्या), शेतकऱयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलणार, प्रत्यक्षात तो ''चुनावी जुमला'' होता म्हणून निर्लज्जपणे मुलाखती दिल्या.

४. राम मंदिर बांधू म्हणून निवडणुकीपूर्वी हिंदू मतदारांना शब्द दिला, आता म्हणत आहेत कि सर्वोच्च न्यायालयाची वाट पाहणार, कायदा करून राम मंदिर बांधण्याचे सर्व प्रस्थाव फेटाळण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंदिर बांधले जाईल असे घोषणापत्रात कुठेच लिहिलेले नव्हते. राम मंदिर बांधण्यासाठी एक पाऊल सुद्धा पुढे टाकले नाही. अनेक कंगोरे काढून जनतेला फसविण्याचा काम अजूनही अव्याहतपणे चालू आहे.

५. विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक लोक चौकीदाराच्या नाकावर टिच्चून बँकांचे हजारों कोटी रुपये घेऊन भारतातून फरार झाले. हे हातावर हात ठेऊन नुसते बघत बसले. बँका ''लो बॅलन्स '' च्या नावाखाली जनतेकडून त्याची भरपाई करण्याचा वेडगळ प्रयत्न करीत आहेत. ''ना खाऊंगा , ना खाणे दूंगा'' हि वल्गना साफ खोटी ठरली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे पुरते वाटोळे झाले. जी डी पी, बेरोजगारीची खोटी आकडेवारी जनतेसमोर ठेऊन जनतेला मूर्ख बनविले.

६. जी एस टी ची अंमल बजावणी करण्यात नोटबंदी प्रमाणेच प्रचंड अपयश आले. व्यवस्थित पूर्वतयारी न करताच जी एस टी सुरु करण्यात आली. वेगवेगळ्या पदार्थांवरील कर प्रणाली वारंवार बदलण्यात आली, ते अजूनही चालूच आहे. व्यापारी तसेच ग्राहक या दोघांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. व्यापारी वर्गाला मोठं-मोठे मोर्चे काढायला भाग पाडले. अनेक व्यापाऱ्याना व्यापार बंद करावे लागले, बहुतांश लोक व्यापारी व्यवसायातून बाहेर पडले. हे सर्व अनर्थ या सरकार मुळे झाले.

७. देशात धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम या सरकारने (भाजपच्या मंत्री आणि नेत्यांनी) केले. परधर्मीय लोकांची हेटाळणी केली गेली. हनुमानाला कोणी दलित, कोणी आदिवासी, कोणी ब्राह्मण, कोणी मुस्लिम होता अशी निरर्थक शेरेबाजी केली. गणपतीला ''प्लास्टिक सर्जरी'' चे उदाहरण असल्याची कोल्हे-कुई केली. व्यर्थ अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केले. घरात गाईचे मांस असल्याच्या संशयावरून मुस्लिम लोकांच्या हत्या घडवून आणल्या. स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात अक्षरशः हैदोस घातला. या सरकारने योग्य ती कारवाई न केल्याने ते चांगलेच मस्तवाल बनले.

८. बलात्काराच्या अनेक घटनांमध्ये भाजपचे नेते तसेच कार्यकर्ते सापडले मात्र तात्काळ कारवाई न करता सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचे मूर्खपणाचे वर्तन केले. जनतेचा जास्त दबाव वाढल्यानंतरच कारवाईचे करण्याचा चुकीचा पायंडा पडला. कट्टर धार्मिक संघटना स्वतः च सत्तेस असल्यासारखे वागू लागले, आमचे सरकार आहे, आम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही, अशा गुर्मीने बोलू लागले. स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करून इतर लोकांना देशद्रोही असल्याची प्रमाणपत्रे जाहीरपणे वाटू लागले. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हणू लागले, एवढी यांची पातळी घसरली कि उठसूट कोणालाही पाकिस्थानात जाऊन राहण्याचे सल्ले निर्लज्जपणे देऊ लागले.

९. ''स्मार्ट सिटी'' च्या नावे दिंडोरा पिटण्यात आला, हजारों कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले, आजतागायत संपूर्ण भारतात एक सुद्धा शहर ''स्मार्ट सिटी'' म्हणून उदयास आलेले नाही.

१० आणि ११ क्रमान्काच्या कमेन्ट्स गायब झालेल्या दिसल्या.

१२. लोकांना गॅस देण्याची योजना आणली ती सुद्धा फसली. गरिबी रेषेखालील (मासिक उत्पन्न १०२० रुपये) करोडो महिलांना गॅस दिल्याचे सांगण्यात आले, गॅस धारकांची संख्या फुगवून सांगितली गेली. तो नुसताच फार्स ठरला, सिलेंडर चे दर एवढे जास्त करून ठेवले की जवळपास ९०% लोकांनी दुसरा सिलेंडर विकत घेताच आला नाही. सिलेंडरचे दर ९२० रुपयांवर (मासिक उत्पन्न १०२० रुपये) पोहोचले होते. गॅस आल्यामुळे रॉकेल मिळणे सुद्धा बंद झाले आता ती कुटुंबे सरपणावर (लाकडे, पालापाचोळा) जेवण बनवीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

१३. कच्चा तेलाचे जागतिक बाजारपेठेत दर एकदम कमी असताना सुद्धा प्रचंड नफा कमवून (भरमसाठ कर लादून) या सरकारने देशातील जनतेला अक्षरशः लुटले. पेट्रोलियम पदार्थ [पेट्रोलियम पदार्थ (पेट्रोल, डिझेल, गॅस इ.)] जी एस टी च्या अंतर्गत आणता आले असते मात्र या सरकारने तसे न करता करांमध्ये खूप वाढ करून जनतेला लुबाडले. पेट्रोल तर काही ठिकाणी शंभरी पार झाले होते. निवडणूक (कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड) जवळ आल्या कि दर वाढवायचे नाहीत अन निवडणुका संपल्या कि पुन्हा लुबाडणे चालू, हे सामान्य जनतेने अनुभवलेले आहे. या सरकारने यातून प्रचंड माया जमा केलेली आहे.

१४. स्वायत्त संस्था (सीबीआय, ईडी इ. ) या सरकारने आपल्या मुठीत ठेवल्या आहेत. त्यांची स्वायत्तता सरकारने धुळीस मिळविली आहे. त्या संस्थाचा वापर विरोधकांना वेगवेगळ्या चौकशांत अडकविण्यात करण्यात येत आहे. हा खूप मोठा दुरुपयोग आहे. जनता सर्व बघत आहे, ती जेवढ्या तत्परतेने डोक्यावर घेते त्याच्या कितीतरी पटीने जातात जमिनीवर आपटायला कमी करीत नसते.

१५. या सरकारने राफेल डील संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. सरकार विरोधी पक्षासोबतच देशातील जनतेला सुद्धा फसवीत आहे. एवढी कमी विमाने का घेण्याचा करार झाला? शंभर पेक्षा जास्त विमान खरेदीचा करार का मोडीत काढला? एच एल एल ही सरकारच्या अंतर्गत येणारी कंपनी असताना कंत्राट अनिल अंबानीला देण्यासाठी एवढा आटापिटा का केला? एवढी जास्त तातडीची गरज होती तरी सुद्धा आजपर्यंत एकसुद्धा विमान भारतात का पोहोचू शकलेले नाही? सरकार चौकशीला सामोरे जाण्यास का घाबरत आहे? या प्रश्नांची समाधानकारक उत्तर अजूनही सरकार देऊ शकलेले नाही. होऊ द्या ना एकदा ''दूध का दूध और पानी का पानी'' कर नाही त्याला डर कशाला? सरकारने स्वतः हुन जेसीपी तर्फे ताबडतोब संयुक्त संसदीय समिती स्थापून चौकशी करून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा मतदार जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात असू द्या!

१६. पुलवामा मध्ये दहशतवादी हल्ला झालाच कसा? गुप्तहेर संघटना झोपा काढत होत्या काय? प्रधान चपराशी कसली चौकीदारी करीत आहे? हा दहशतवादी हल्ला व्हायला केंद्र सरकारचे फालतू धोरण कारणीभूत आहे. ४० पेक्षा जास्त जवान शाहिद झाले आणि चौकीदार प्रचारात मग्न होता. त्याला जवानांच्या सुख - दुःखाचे अजिबात सोयर - सुतक नव्हते. हा शाहिद जवानांच्या टाळू वरचे लोणी खाण्यात व्यस्त होता. एयर स्ट्राईक करून खोटी सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. आता मतदार जनता मोदी आणि भाजपाला नेस्तनाभूत केल्याखेरीज राहणार नाही.