१. कधी लिहिली गेली?
२. कोणी लिहिली?
३. कोणावर लिहिली गेली?
या प्रश्नांच्या साहाय्याने लावणीच्या उगमाचा शोध घ्यायचा आहे.
शाहिरी लावणी : ही डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहीरच सादर करतो
बैठकीची लावणी : ही दिवाणख्यान्यात मोजक्याच रसिकांसमोर बैठकीच्या स्वरूपात सादर केली जाते
आणि
फडाची लावणी : ही म्हणजे ढोलकीची लावणी. आज लोकांना जी भुरळ पडली आहे, ती याच ढोलकीच्या तालावर रंगणा-या लावणीची
पहिली उपलब्ध लावणी ही चौदाव्या शतकातली असून ती मन्मथ शिवलिंग यांनी कराडच्या भवानीवर लिहिलेली आहे. आजच्या लावणीचा उगम मात्र उत्तर पेशवाईत झालेला आहे.
हे सर्व शोधण्याचे मुख्य कारण म्हणजे मला मराठीतील पहिली लावणी हवी आहे
पठ्ठे बापुरावांच्या तमाशाच्या फडात पवळा हिवरगावकर नाचायला उभी राहिली नि पुन्हा एकदा लावणी तुफान गाजू लागली
पठ्ठे बापुरावांबरोबर - पवळा हिवरगांवकर चे पण लावणी लोकप्रिय होण्यात मोठे योगदान आहे
पठ्ठे बापुराव,पवळा हिवरगावकर - असे एक भन्नाट पुस्तकच आबासाहेब आचरेकर यांनी लिहिले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य वाचावे. लावणी लोकप्रिय कशी झाली याचा छान इतिहास यातून वाचायला मिळेल .
पुढील भागात लावणीचा शोध घ्यायचा प्रयत्न करुयात
~सागर~
लावणी लोकप्रिय करणार्या पवळा हिवरगांवकर ची दुर्लक्षित माहिती
ReplyDeletehttp://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-on-pawala-hiwargaonkar-by-sagar-bhalerao-divya-marathi-4544787-NOR.html
wow..really Nice work Done for महाराष्ट्राची शान मराठी लावणी...
ReplyDeleteनाच्याच्या भूमिकेचे उगम स्रोत काय?
ReplyDelete