वाचल्याबरोबर नष्ट होणारा ई-मेल संदेश याबद्दल किती जणांना माहिती आहे हे मला माहित नाही, त्यामुळे मीमराठीच्या मित्र-मैत्रिणींसाठी हा दुवा व थोडी माहिती देतो आहे.
दुवा : http://www.privnote.com/
ही सुविधा कशी वापरायची?:
आपला खाजगी संदेश त्या व्यक्तीशिवाय कोणालाही माहिती होऊ नये अथवा त्याचा चुकूनसुद्धा गैरवापर होऊ नये असे वाटत असेल तर ही साईट तुम्हाला मदत करु शकेल.
प्रक्रिया अगदी सोपी आहे.
या साईट वर तुमचा मजकूर टाईप करा व लगेच त्याची लिंक मिळवा. तुम्ही तुमच्या ई-मेल आयडी वरुन हव्या असलेल्या व्यक्तीला ती लिंक पाठवा.
तुमचा हा गुप्त संदेश तुम्ही ज्याला पाठवला त्या व्यक्तीने फक्त त्या लिंक वर क्लिक करायचे म्हणजे त्याला हा संदेश वाचता येईल. हे फक्त एकदाच करता येईल. एकदा का संदेश त्या व्यक्तीने वाचला की पुन्हा दुसर्यांदा त्याच व्यक्तीला तीच लिंक वापरुन देखील वाचता वा वापर करता येणार नाही. शिवाय त्या व्यक्तीने तुमचा संदेश वाचल्याची पोचपावती मात्र तुमच्या ई-मेल वर तुम्हाला अवश्य मिळेल..
आहे की नाही खरा गुप्त संदेश
तेव्हा ही सुविधा वापरा आणि गुप्त संदेश खर्या अर्थाने गुप्त ठेवा
No comments:
Post a Comment