१३ ऑक्टोबर, माझ्या लाडक्या किशोर कुमार चा पुण्यस्मरणदिन
किशोरदांना माझी भावूक श्रद्धांजली
भारतीय टपाल खात्यानेही किशोरदांच्या नावाने एक तिकीट काढून श्रद्धांजली दिलेली आहेच
किशोरदांची स्वाक्षरी :
मध्य प्रदेश येथील खांडवा येथे जन्म झालेल्या आणि वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी मुंबईत नशीब काढायला आलेल्या किशोर कुमार यांनी अवघ्या चित्रपट सृष्टीला आपल्या प्रतिभेने चकीत केले. अभिनेता, संगीतकार , निर्माता आणि दिग्दर्शक अशा अनेक क्षेत्रांवर या हरहुन्नरी कलाकाराने आपली न विसरता येणारी छाप उमटवलेली असली तरी किशोर कुमार ने आपल्या जादुई आवाजाने संगीत ऐकणार्या प्रत्येक हृदयात स्वतःला अजरामर करुन सोडले आहे.
किशोर च्या गाण्यांनी लाखो हृदयांना संजीवनी दिलेली आहे. मग तो कोणताही मूड असो. रोमॅन्टीक असो किंवा दु:खाचा मूड असो, प्रत्येक मूडला किशोरने सजीव केले आहे.
आजची सारी रात्र किशोरची गाणी ऐकायचे ठरवले आहे आणि किशोरदां बद्दल अजून लिहायला शब्दच सुचत नाहियेत. तेव्हा इथेच थांबतो आणि माझ्या आवडीची काही गाणी पुढे देतो आहे.
http://www.esnips.com/web/Best-of-Kishor-Kumar या दुव्यावर एमपी थ्री अपलोड केली आहेत.
खाजगी आयुष्यात किशोरदांना दु:ख भोगावे लागले असले तरी ५१ व्या वर्षी लीना चंदावरकर सोबत विवाह करुन लवकरच अपत्य प्राप्ती झाल्यामुळे सुखाचे काही कण जीवनाच्या शेवटी त्यांना लाभले असे म्हणता येईल.
पहिली पत्नी रुमा घोष (हिच्यापासून अमितकुमार चा जन्म झाला)
दुसरी मधुबाला
तिसरी योगिताबाली
आणि शेवटी लीना चंदावरकर सोबत १९८० साली लग्न केले (हिच्यापासून सुमित कुमार चा जन्म झाला)
एकूण ८ वेळा किशोरदांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला असला तरी त्यांचे प्रत्येक गाणे हृदयाची तार झंकारुन जायचे असा जादुई आवाज त्यांना लाभला होता.
या गाण्यांसाठी ८ वेळा किशोरदांना फिल्मफेअर मिळाला होता:
र्ष गाणे चित्रपट संगीतकार गीतकार
१९६९ रूप तेरा मस्ताना - आराधना
१९७५ दिल ऐसा किसी ने मेरा तोडा - अमानुष
१९७८ खैके पान बनारासवाला - डॉन
१९८० हज़ार राहें मुडके देखीं - थोडीसी बेवफाई
१९८२ पग घुँघरू बाँध - नमक हलाल
१९८३ हमें और जीने की चाहत ना होती - अगर तुम ना होते
१९८४ मंजिलें अपनी जगह - शराबी
१९८५ सागर किनारे - सागर
बाकी मीमराठीवरील किशोरदा प्रेमी माहितीत चर्चेद्वारे भर घालत राहतीलच...
किशोरदांची माझी सर्वात आवडती ३ गाणी
१. जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम
२. फूलोंके रंग से दिल के कलम से
३. कभी अलविदा ना कहना
No comments:
Post a Comment