Wednesday, October 21, 2020

मोदी फेल का आहेत ?

मनमोहन सिंह यांचे काम चुकीचे असते तर देशाचा जी डी पी वाढला नसता
माल्या नीरव मोदी चोकसी यांना कर्जे जरी काँग्रेस काळात दिली गेली असली तरी त्यांची परतफेड ते वेळेवर करत होते.  
हे लोक विदेशात पळून गेले ते मोदींच्या काळात हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल.
कागदोपत्री हे सिद्ध झालेले आहे की नीरव मोदी चोकसी व्हिडिओकॉन यांची सर्व कर्जे कोणतेही तारण नसताना मूळ कर्जांच्या वीस ते दोनशे पट जास्त पुन्हा दिली गेली ते २०१४ ते २०१७ या काळात. मग त्या कारभाराचा दोष पण काँग्रेस चा? 
मोदींच्या मागच्या ६ वर्षांच्या काळात मोजक्या उद्योगपतींची २५ लाख कोटी रुपयाची कर्जे माफ झालेली आहेत जी आजपर्यंत कोणत्याही सरकारने केली नव्हती.
आपण सामान्य लोकं जे पेट्रोल आज ७० /८० रुपयांनी भरतो आहोत त्यांची प्रत्यक्ष किंमत २० ते २२ रुपये आहे. जागतिक तेलाचे भाव पत्त्यासारखे कोसळून तो फायदा सामान्य माणसांना दिला जात नाहीये. यातून सरकारने गेल्या ४ वर्षांत ५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे. लोकांना लाभ न देता कोणाला लाभ मिळाला हे तुमच्या आता लक्षात आले असावे.
 मागच्या तिमाहीत जी डी पी -२४% एवढा जोरात कोसळला आहे. सरकारचे टॅक्स द्वारे होणारे उत्पन्न कमी झाले आहे. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे इन्कम टॅक्स आणि पी एफ फंडात येणारी रक्कम कमी झालेली आहे. हे सर्व असताना परिस्थिती सुधारत आहे असे वाटते तुम्हाला ?
 मनमोहन सिंग यांच्यासारखा गोल्ड मेडलिस्ट अर्थतज्ज्ञ पंतप्रधान होता म्हणून २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीतून देशाला त्यांनी वाचवले होते. ती आर्थिक अडचण आजच्या पेक्षा भयंकर होती. मी स्वतः त्यावेळी सविस्तर अनुभवले आणि अभ्यासले पण आहे. 
एका डिग्री चां पत्ता नसलेल्या पी एम च्या आर्थिक ज्ञानावर तुमचा विश्वास आहे पण जगातील सर्वात प्रगत देशांत ज्या अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांच्या पुस्तकांचा, लेक्चर्स चां, त्यांनीं घेतलेल्या निर्णयाचा आदर्श म्हणून अभ्यास केला जातो त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही हे समजण्या पलीकडे आहे. 
मोदी सरकारने ६ वर्षांचा काळ पूर्ण केला आहे हे ही बघा. अजून किती वाट बघायची ? ६ वर्षे हा खूप मोठा काळ असतो कामाची फळे दिसण्यासाठी. 
नोट बंदी आणि चुकीची जी एस टी यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्ण कोसळली आहे.
जी एस टी कलेक्शन मधले राज्यांना देण्यासाठी केंद्र सरकार आज हात वर करत आहे.
एकट्या महाराष्ट्रातून केंद्र सरकारला देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ३८% टॅक्स मिळतो. आणि जेव्हा राज्याला गरज आहे तेव्हा ते पैसे मिळत नाही आणि थकवले जातात. राज्याचे उत्पन्न नसेल तर कोणते राज्य काम करू शकेल ? हे एक उदाहरण आहे.
तुम्ही जी माहिती सांगितली ती मी संघ आणि भाजप ने व्हॉटसअप द्वारे पसरलेली माहिती आहे. सत्य नाही एवढे सांगून थांबतो.
स्वतः बघा काय होत आहे ते. मोदी केवळ १ ते २ टक्के गोष्टींवर लक्ष देत आहेत.
प्रत्यक्षात देशासाठी सर्वात महत्त्वाचे आहे रोजगार, नोकऱ्या, आरोग्य सुविधा, शिक्षण, अन्न , वस्त्र निवारा ... या सर्व गोष्टी उत्तम झाल्यावर मोदींनी हवे तेवढे पुतळे आणि मंदिरे बांधावीत. कोणाचीही त्यावेळी हरकत नसेल. 
आत्ता गरज काय आहे आणि मोदी काम काय करत आहेत हे ही तपासून बघण्याची गरज आहे. 

Saturday, June 27, 2020

भारतात सध्या आर्थिक अराजकता का पसरली आहे?

मुळात सध्याच्या सरकारने गेल्या ६ वर्षांत आधीच्या सरकारांनी केलेली कामे पुढे नेली नाहीत. आणि आधी जे जे निर्माण झाले तो ढांचा उध्वस्त करत सुटले आहेत. हजारो कोटी रुपये नफा देणाऱ्या सरकारी कंपन्या विकून दुभती गाय कापण्याचे काम सध्याच्या सरकारने गेली ६ वर्षे केले आहे.
तो पैसा सरकारने कशासाठी वापरला याचा कोणताही ठोस डाटा उपलब्ध नाहीये. पण ३ हजार कोटी रुपयांचा पुतळा, मोठ मोठ्या घोषणा आणि त्यांना जाहीर केलेली पॅकेजेस अशा गोष्टीतून सध्याच्या सरकारला देश कसा चालवतात याचे प्राथमिक ज्ञान सुद्धा नाहीये हे अगोदरच सिद्ध झालेले आहे. 
चुकीच्या निर्णयामुळे सरकारकडे वापरण्यासाठी पैसा कमी पडतो तेंव्हा सरकार कडे तत्काळ निधी उपलब्ध होण्यासाठी पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमती वाढवणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. 
पण प्राप्त परिस्थितीत मागील काही वर्षांत झालेल्या घटना पाहिल्या तर या सरकारने आर बी आय कडून कित्येक लाख कोटी रुपये घेतले आहेत. जे या आधी कोणत्याही सरकारांनी इतक्या प्रमाणात घेतले नव्हते. पी एम केयर फंडात जनतेने खूप उदार मनाने दान दिलेले आहे. तो पैसा कित्येक लाख कोटी रुपयांचा असेल असा अंदाज आहे. पण माहिती अधिकार क्षेत्रात या फंड ला सरकारने वगळले असल्यामुळे याची नेमकी माहिती जनतेला मिळणे कठीण आहे. 
पेट्रोल डिझेल गॅस यांच्या वाढीव टॅक्स वरून सरकारने आतापर्यंत गेल्या ६ वर्षांत जवळपास २५० लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
असो तर ही झाली पार्श्वभूमी.
कित्येक लाख कोटी रुपये सरकारने जमा केलेले असताना 
ज्या पेट्रोल ची किंमत ३० रुपये लिटर ठेवून सुद्धा सरकार कित्येक लाख कोटी रुपये नफा कमावू शकते असे असतानाही ७५ ते ८० रुपये या दराने वाढीव किमती वसूल करणे याला जनतेच्या खिशावर टाकलेला राजरोस दरोडा यापलीकडे चांगले नाव देता येणे शक्य नाही. 
लोकांनी सध्याच्या सरकारला २०१४ मध्ये खूप मोठ्या आशेने निवडून दिले आणि असे लोकांना वाटले होते की हे सरकार लोकांच्या हितांची कामे करतील. पण असे झाले नाही. विकास नावाच्या बाळाचे गाजर दाखवून सत्तेवर आलेले विद्यमान सरकार चे हेतू पूर्ण वेगळे आहेत. त्यांना देशात धार्मिक दुफळी माजवून फोडा आणि झोडा या इंग्रजांच्या राजकारणाचा आदर्श ठेवून काम करायचे आहे. 
सध्याच्या सरकारने इतक्या लाख कोटी रुपयांचा निधी कोणत्याही विकास कामांसाठी वापरला असता तर तो विकास डोळ्यांना दिसला तरी असता. पण सध्याच्या सरकारने काही केले आहे असे कुठेही दिसत नाही. जनतेचा हा विश्वास पूर्ण गमावलेला असताना २०१९ मध्ये हेच सरकार पुन्हा कसे निवडून आले हा एक संशोधनाचा आणि वादाचा मुद्दा देखील आहे. 
पण मुद्दा आर्थिक विषयापुरता मर्यादित ठेवूया. 
देशातील जनतेचे उत्पन्न गेल्या ६ वर्षांत वाढणे अपेक्षित होते ते कमी झाले आहे. 
पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमतीवर वाढ करून सरकारला तात्कालीक उत्पन्न मिळत आहे खरे. पण देशाला एका भयानक आर्थिक संकटाच्या दिशेने अगोदरच सध्याच्या सरकारने ढकलून दिलेले आहे. 
वाढत्या इंधन भावा मुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढणार आहेत. आणि जनतेचे उत्पन्न कमी झालेले आहे.
अशा परिस्थितीत बाजारात लोक आवश्यक वस्तूंवर च पैसा खर्च करत आहेत. अशा परिस्थितीत देशाचे आर्थिक चक्र संथ झालेले आहे. जवळपास थांबलेले आहे. त्यामुळेच लोक कोणत्याही नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी हात आखडता घेत आहेत. 
बाजारात मागणी नसेल तर लाखो उद्योग आणि करोडो लोकांचे उत्पन्न होणार नाही. ते उत्पन्नच नसेल तर बाजारात गती येणार नाही. देशाचे आर्थिक चक्र वेगवान झाले नाही तर देशाचा आर्थिक विकास कसा होणार ?
त्यात सरकारने अजून एक चुकीची गोष्ट केली ते जानेवारीत भारतात करोना महामारी येऊ दिली. जी अडवणे सहज शक्य होते. आता या महामारी मुळे वस्तूंच्या किमती अवाच्या सव्वा झाल्या आहेत. जनतेला आतापर्यंत केलेली बचत आरोग्य या कारणासाठी अनावश्यक पणे खर्च करावी लागत आहे. हे सर्व अडवता आले असते. पण सध्याच्या सरकार मध्ये हे सर्व थांबवण्याची इच्छाशक्ती दिसत नाहीये. सध्याच्या सरकारला देशात सर्वत्र त्यांचे झेंडे फडकवण्यात जास्त रस आहे.
देशाचा जी डी पी शून्याच्या खाली अगोदरच गेला आहे. अशा परिस्थितीत भारताचा विकास पुढील ५ ते १० वर्षांत होणे केवळ अशक्य गोष्ट आहे. हीच गोष्ट जगभरातले तज्ज्ञ देखील सांगत आहेत की २०२२ पर्यंत भारताने परिस्थिती आटोक्यात आणली नाही तर भारतात एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आपण आहोत. सरकारने राजकारण करायचे तर करावे पण स्वतःच्याच जनतेच्या खिशावर दरोडे टाकून देशाचा विकास होणार नाही. हेही सरकारने लक्षात घेतले पाहिजे. सध्याच्या सरकारने केवळ आर्थिक पॅकेज च्या घोषणा करण्यापेक्षा देशाचे अर्थ चक्र चालवणाऱ्या वर्गाचे उत्पन्न वाढवण्यासाठी तत्काळ पावले उचलली पाहिजेत. तरच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. अमेरिका सारखा देश १०० बिलियन डॉलर्स फक्त देशाच्या जनतेच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी निधी उपलब्ध करून ठेवतो आहे. पण आपल्या सरकारने केवळ ५०० रुपये महिन्याला एवढेच पॅकेज तेही अत्यंत मर्यादित लोकांना (देशाच्या १०% पेक्षा कमी नागरिकांना) दिले आहे. ते सुद्धा हा पैसा कोणाला मिळाला कोणाला नाही याची स्पष्टता नाहीये. 
एकूण देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी देशाला एक कुशल अर्थतज्ज्ञा ची गरज आहे. आणि ते उपाय अमलात आणण्याची सरकारची इच्छाशक्ती सुद्धा हवी. अन्यथा आपण काळाच्या मागे जातो आहोत. सरकारला हे धोके माहिती आहेत. पण त्यासाठी सरकार काय करते ते बघत बसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. अपेक्षा मात्र करू शकतो की सरकार वेळीच चुका सुधारेल.

Tuesday, April 28, 2020

हां मैं हिन्दू हूं और तू मुसलमान

हां मैं हिन्दू हूं और तू मुसलमान
लेकिन सबसे पहले हम है एक इंसान

किसी हिन्दू ने हिन्दू को काटा
तो किसी को फर्क नहीं पड़ता
मुसलमान ने मुसलमान को काटा
तो भी किसीको फर्क नहीं पड़ता

किसी हिन्दू ने मुसलमान को मारा
तो इस्लाम खतरे में आता है 
और मुसलमान ने हिन्दू को मारा 
तो हिन्दू खतरे में पड़ जाता है

हिन्दू मुसलमान को शक से देखेगा
और कहेगा गद्दार है साला
मुसलमान हिन्दू को शक से देखेगा 
और कहेगा काफिर है साला 

हिन्दू है तो सनातन धर्म हमारा
जिसने मानवता की बलि चढ़ा दी है
मुसलमान है तो मजहब हमारा
जिसने इंसानियत की कुर्बानी दी है

मुसलमान ने हिन्दू को परेशान किया तो
क्या हिन्दू खतरे में पड़ गए ?
हिन्दू ने मुसलमान को परेशान किया तो 
क्या खून के दाग अच्छे हो गए ? 

हां मैं हिन्दू हूं और तू मुसलमान लेकिन 
क्या पहले इंसान होना तेरी जिम्मेदारी नहीं है ?

Friday, March 6, 2020

ब्रेक अप आयुष्यातले एक वळण

असेच मनात उमटले ते लिहिले 
खरे म्हणजे ब्रेकअप कडे दुःखाचा डोंगर म्हणून बघण्यात काही अर्थ नाही. आपण आपल्या जोडीदाराबरोबर स्वप्ने रंगवतो त्या स्वप्नांचा चुराडा होतो आणि तो झालेला सहन होत नाही. 
साहजिक आहे. 
Be positive factor काम करतो हेही खरे आहे.
त्यातून बाहेर पडणे किंवा त्याच कोशात राहणे या दुहेरी विवंचनेत अनेक जण अडकतात. 
स्वतःच्या जगण्यावर प्रेम करावे माणसाने. मग ते कसेही असेना. आयुष्यातली आव्हाने , संकटे,  आनंदाचे क्षण , दुःखाचे क्षण सारे सारे फेस करायचे ... जगण्यावर प्रेम असले की कोणतेही नैराश्य लवकर जाते  असा अनुभव आहे. मग ब्रेक अप सुद्धा त्याला अपवाद असू शकत नाही. आयुष्य हे एक नदीचा प्रवाह आहे. त्या प्रवासाचा आनंद मुक्तपणे लुटायचा. सर्व वळणे सुखद यात्रा देतीलच असे नाही. काही वळणे जीवनात वादळे सुद्धा देतात. वाहात राहायचे. वादळे जशी आली तशी निघूनही जातात. उरतो तो फक्त आपल्या जीवनाचा प्रवास. त्या आयुष्यावर .. त्या जगण्यावर नितांत प्रेम करायचे ... आयुष्य जगणे सुसह्य होते. कोणा एका व्यक्तीच्या अपेक्षेने मागे लागले की लहान मुलासारखे घट्ट धरून ठेवण्याचे प्रयोग होतात. पण प्रेम हे रेतीसारखेच असते.  जेवढे घट्ट धराल तेवढे हातातून निसटून जाते. 
मुक्त पणा आणि सहजपणा हा प्रेमाचा खरा आविष्कार आहे. जिथे  प्रेम मुक्त आणि सहज असते तिथे बंधने येत नाहीत आणि त्यामुळे धरून ठेवणारी बंधने देखील येत नाहीत. प्रेम अनुभवा... जगा... जगू द्या... निखळ आयुष्याचा आनंद घ्या. 
ब्रेक अप आपल्या सुंदर आयुष्यातले आपल्यातीलच स्वत्वाला आकार देणारे स्वतःचीच स्वतःला नव्याने अधिक क्षमतांची ओळख करून देणारे  फक्त एक वळण असते. ...
असेच मनात उमटले ते लिहिले
- सागर 

Sunday, February 2, 2020

ब्रिटीशकालीन पुणे आणि महाबळेश्वर - Lester, John Frederick च्या कुंचल्यातून

ब्रिटीशकालीन पुणे आणि महाबळेश्वर - Lester, John Frederick च्या कुंचल्यातून

स्त्रोत : https://www.shantanuparanjape.com/2020/01/puneduringbritish.html?m=1

जुनी चित्रे पाहायला कुणाला आवडत नाही? अर्थातच सगळ्यांनाच आवडते आणि ती चित्रे जर आपल्या शहराची असतील तर अजूनच मजा. इंग्रज जेव्हा पुण्यात होते तेव्हा त्यानी पुण्याची तसेच पुण्यातील माणसांची अनेक चित्रे काढली. Lester, John Frederick हा इंग्रजांचाच एक चित्रकार. हा गृहस्थ १८६५ ते १८७७ मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ मध्ये होता. त्यावेळी त्याने अनेक चित्रे काढली. त्याची काही पुण्याविषयीची चित्रे येथे देत आहे. 

1. Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील एका रस्त्याचे चित्र. चित्राची तारीख आहे १३ सप्टेंबर १८७१. 


2.  Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील जकात महालाचे चित्र.  चित्राची तारीख आहे ९ ऑक्टोबर १८७१ . 




3.  Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील होळकर पुलाचे चित्र. चित्रात नदीला आलेला पूर स्पष्टपणे दिसतो आहे. चित्राची तारीख आहे २८ जुलै १८७०.


4.  Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील एका रस्त्याचे चित्र. 


5.  Lester, John Frederick याने काढलेले महाबळेश्वर येथील चर्चचे चित्र. तारीख - नोव्हेंबर १८७१



६.  Lester, John Frederick याने काढलेले मधुमकरंदगडाचे चित्र. तारीख - नोव्हेंबर ४, १८७१


७.  Lester, John Frederick याने काढलेले महाबळेश्वर येथील चर्चचे. तारीख - नोव्हेंबर २३, १८७१


८.  Lester, John Frederick याने काढलेले महाबळेश्वरमधील चित्र. वर्ष - १८६८




© 2020, Shantanu Paranjape