Tuesday, November 19, 2024

महाराष्ट्र राज्यात सत्ता कोणाला मिळणार ? महायुतीला की महाविकास आघाडीला ?

महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाली तेव्हा अमित शाह हे मुंबईत आले होते. त्यांनी भाजपच्या सर्व टीम ची बैठक घेऊन सांगितले होते की साम, दाम , दंड आणि भेद यापैकी जे वापरायचे ते वापरा पण सत्ता आपलीच आली पाहिजे. वरून हवी ती मदत आम्ही करूच. पण यावेळी महाराष्ट्राची सत्ता काहीही झाले तरी आपल्याकडेच पाहिजे.
पडद्याआड काम करणारे आणि रिजल्ट देणारे म्हणून त्यांची ख्याती सर्वश्रुत आहेच.
त्यामुळे महायुती चेच सरकार परत येईल अशी चिंन्हे आहेत.
 

इथे कोण खरा कोण खोटा हा मुद्दा नाहीये.
यापूर्वी असंतुष्ट वेगळे होऊन स्वतःचा पक्ष स्थापन करून किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन स्वतःचे स्थान नव्याने निर्माण करत होते. महाराष्ट्राच्या राजकारणात जे दुसऱ्याच्या घरावर स्वतःचा मालकी हक्क सांगण्याचे जे २ प्रकार झाले ते राजकारणाच्या परंपरेला काळिमा फासणारे झाले आहे. त्यामुळे भाजप जनतेच्या मनातून केव्हाच उतरली आहे.
 
जनतेच्या न्यायाने बघाल तर महाविकास आघाडी सत्तेत यायला पाहिजे.

पण अमित शाह यांच्या रणनीतीची तोड केवळ शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणी काढू शकला तरच अन्यथा पूर्ण देशभर भाजप सत्तेसाठी जे करते आहे ते बघता महाराष्ट्रात भाजप परत येणे थांबवणे कोणाला शक्य नाही.

कारण महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यावर लगेच विदर्भ प्रश्न निकालात लावून वेगळा विदर्भ केला जाईल. त्यानंतर मुंबई केंद्र शासित प्रदेश करणे सोपे पडेल.
महाराष्ट्राला मुंबई गमावण्याची किंमत म्हणून बेळगाव महाराष्ट्राला जोडले जाऊ शकते.

शेवटी खुर्चीचा खेळ आहे लोकहो. त्यात तुमच्या आमच्या मताची किंमत लोकशाहीसाठी मतदान करणे एवढीच आहे. तुम्हीच ठरवा कोणाला मत द्यायचे ते .
जय महाराष्ट्र ! जय हिंद !