Samarth Athavale चला साहेब तुम्ही जी कामे सांगितली आहेत त्यातले एक तरी ९०% सामान्य जनतेच्या उपयोगाचे आहे काय ? ते आधी सांगा.
पूर्ण देशात दीड लाख सरकारी शाळा बंद करणे आणि गरिबांचा शिक्षणाचा हक्क नाकारणे याला तुम्ही काम म्हणता ?
पूर्ण जगात तेलाच्या किमती नियंत्रणात असताना गेली कित्येक वर्षे जनतेकडून १०० रुपयांपेक्षा महाग पेट्रोल आणि १,००० रुपयांचा गॅस सिलेंडर जबरदस्तीने लाखो कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करणे आणि तो पैसा मोजक्या उद्योगपतींची लाखो कोटी रूपयांची कर्जे माफ करण्यासाठी वापरणे याला काम म्हणता ?
गरिबांची संख्या वाढवणे याला काम म्हणता ?
८० कोटी जनता गरिबी रेषेखाली आहे (हेही मोदींनी स्वतःच सांगितले आहे) याला काम म्हणता का ?
रिटायर माणसांना कोणतीही सवलत न देता पूर्ण वाढीव प्रवासभाडे आकारणे याला तुम्ही काम म्हणता ?
रेल्वे प्लॅटफॉर्म वर केवळ आपल्या आप्तांना सोडण्यासाठी येणाऱ्या लोकांना आधी २ ते ५ रुपये प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करण्यासाठी द्यावे लागत होते ते थेट प्रति व्यक्ती ५० रुपये करणे याला तुम्ही काम म्हणता ? आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी वाटेवरच्या रस्त्यांवर अवाच्या सव्वा दराने आकारलेला महाग टोल भरणे याला तुम्ही काम म्हणता ? एकदा पुणे ते धुळे नाशिक मार्गे प्रवास करा मग बोला की अशा ८०% प्रवासात थर्ड क्लास दर्जाच्या रस्त्यांसाठी टोल का द्यायचा ?
रुपयाचे अवमूल्यन इतके खाली करणारा पंतप्रधान आजपर्यंत कोणी झाला नाही याला तुम्ही काम म्हणता ?
भारताच्या डोक्यावर कर्ज अवघ्या ५ वर्षांत चौपट करणे आणि त्या प्रमाणात रोजगार आणि दरडोई उत्पन्न दोन्ही न वाढणे याला तुम्ही काम म्हणता का ?
२०१३ साली मनमोहन सिंह यांनी १२७ राफेल विमाने खरेदी करण्याचे डील केले होते त्यापैकी ३३ फ्रान्स मध्ये आणि उर्वरित सर्व हिंदुस्थान एरोनॉटिक्स तयार करणार होते. या व्यवहारात अत्याधुनिक विमाने निर्माण करण्याचे तंत्रज्ञान देखील हस्तांतरित करता येणार होते. असे असताना त्याच किमतीत फक्त ३७ राफेल विमाने ते ही मेड इन फ्रान्स आणि विना तंत्रज्ञान हस्तांतरण मोदी सरकारने ते सुद्धा ८/९ वर्षे उशिरा का घेतली ?
करोना काळातील ढिसाळ ॲडमिनिस्ट्रेशन मुळे लाखो नव्हे तर करोडो लोकांना प्राण गमवावे लागले होते. हेच एकमेव कारण होते ज्यामुळे स्वतंत्र भारताच्या इतिहासात मोदींनी २०२० साली दर दहा वर्षांनी होणारी जनगणना अजूनही २०२५ संपत आले तरीही केलेली नाहीये. कारण जनगणना झाली असती तर कोविड काळातल्या मृतांचे खरे आकडे बाहेर आले असते.
अजूनही मी नोटबंदी त्याचे भीषण परिणाम, रेकॉर्डब्रेक बेरोजगारी, ८ वर्षे अमानुषपणे जनतेकडून लुटलेला गब्बर सिंग टॅक्स. इत्यादी इत्यादी .. अशा शेकडो मी गोष्टी सांगू शकेल ज्यामुळे बहुसंख्य सामान्य माणसांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या अशा घटना तुम्ही सांगा ज्यामुळे लोकांना लाभ मिळाले आहेत. मग बोलूया.
No comments:
Post a Comment