Wednesday, November 10, 2021

" जय श्री राम" आणि "जय भीम"

" जय श्री राम" आणि "जय भीम"
जय श्रीराम आणि जय भीम हे फक्त शब्द नाहीत किंवा फक्त कोणत्या घोषणा नाहीत. या दोन भिन्न, विरुद्ध टोकाच्या विचारधारा आहेत. 
मी स्वतः एक हिंदू आहे मात्र मी आयुष्यात कधीही कुणाला जय श्रीराम म्हटलो नाही. याचे सोपे कारण म्हणजे मला ही घोषणा कधीही आपलीशी वाटली नाही. ही घोषणा सर्व हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाही. तर फक्त काही कट्टरवादी, ब्राह्मण्यवादी लोकांचे प्रतिनिधित्व करते. या घोषणेला सर्व हिंदुंच्या माथी मारणे हेच या कट्टरवाद्यांचे काम. 
जय श्रीराम ही घोषणा वरकरणी रामाशी निगडीत वाटत असली धर्माशी निगडित वाटत असली तरी ती फसवी आहे.
ती एक द्वेष पसरवणारी, विभाजनकारी, कट्टरवादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करते.
विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षा सारखा राजकीय पक्ष आणि त्याच्या कट्टरवादी संघटना म्हणजेच बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद वगैरेच या घोषणेचा वापर करतात.
ही विचारधारा वरकरणी मुस्लिम विरोधी वाटत असली तरी
हा फक्त या विचारधारेचा मुखवटा आहे.
तिच्या अंतरंगात मात्र तीन स्पष्ट चेहरे दडलेले आहेत.
पहिला प्रचंड भांडवलवादी चेहरा. जिथे आर्थिक नाड्या फक्त काही ठराविक लोकांच्या हातात असतील. जे नागरिकांना गरीब बनवून त्यांना गुलामगिरी कडे घेऊन जातील. गरीब कामगारांचे शोषण करणार आहे. एक शोषित, पीडित, गुलाम समाज बनवणे या चेहऱ्याचे अंतिम ध्येय.
दुसरा चेहरा प्रचंड जातीयवादी आहे.
जो मनुवादावर आधारित समाज उभारू इच्छितो.
जिथे उच्चवर्णीयांचे साम्राज्य असेल. राजकीय सत्ता फक्त तेच उपभोगतील. सत्ताकेंद्र त्यांच्याच अवतीभवती फिरत राहिल आणि मागासवर्गीयांवर अत्याचार करण्याचा हक्क त्यांना प्राप्त होईल.
जिथे प्रचंड विषमता असेल. 5% लोक 95 % लोकांवर राज्य करतील.
आणि तिसरा चेहरा म्हणजे कट्टर पुरुष प्रधानता.
जिथे स्त्री म्हणजे फक्त उपभोगाची वस्तू असेल.
तिला काहीही किंमत राहणार नाही.
स्त्रियांना हवी तशी उपभोगण्याचा हक्क त्या पुरुषांना प्राप्त
होईल. शिक्षण, स्वातंत्र्य, समता, राजकारण वगैरे स्त्रियांचे सर्व हक्क हिरावून घेण्यात येतील.
अशा या तीन चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी विचारधारा म्हणजे जय श्रीराम.
ही विचारधारा हिंदुत्ववाद्यांची आहे, हिंदूंची नाही.
हे प्रत्येक हिंदूने लक्षात घ्यायला हवे.
म्हणून तिला व्यापक न होऊ देता हिंदुत्ववाद्यांपर्यंत सिमीत ठेवणे हे आपले ध्येय असायला हवे. 

दुसरीकडे या विचारधारेच्या अगदी विरुद्ध टोकाला "जय भीम" ही विचारधारा आहे. 
जय भीम ही व्यक्तीकेंद्रीत किंवा जाती केंद्रित व्यवस्था नाही.
ती सर्वव्यापक, सर्वसमावेशक विचारधारा आहे.
"जय भीम" म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता.
जिथे जय श्रीराम या विचारधारेला विषमता हवी आहे तिथे जयभीम या विचारधारेला समता नांदवायची आहे.
जाती, धर्म, लिंग, प्रांत, भाषा या सर्वांच्याच समतेसाठी जय-भीम विचारधारा कसोशीने प्रयत्न करते. 
जिथे समता असते तिथेच एकता असते, तिथेच शांतता नांदते.
"प्रेम, सद्भाव, भाईचारा, समता, बंधुता, स्वातंत्र्य, शांतता असणारा समाज निर्माण करणे" हे जय भीम विचारधारेचे अंतिम ध्येय. 

जय श्रीराम ही विचारधारा तुम्हाला अराजकतेकडे घेऊन जाते
तर जय भीम विचारधारा तुम्हाला शांततेकडे घेऊन जाते.

जय श्रीराम या विचारधारेला सर्व हिंदूं पर्यंत व्यापक होऊ देऊ नका. तर जय भीम या विचारधारेला एका जाती-समाजापर्यंत सीमित राहू देऊ नका. ती मानवतेची विचारधारा आहे तिला व्यापक बनवा. 
यातच आपले आणि आपल्या देशाचे सौख्य सामावले आहे.

निवड तुमची आहे. तुमच्या निवडीवर तुमचे, येणाऱ्या पिढ्यांचे आणि संपूर्ण देशाचे भविष्य अवलंबून आहे एवढे लक्षात राहू द्या.

मी प्रेम, सहिष्णुता, आपुलकी, समतेची जय-भीम विचारधारा स्वीकारली आहे. तुम्हालाही सस्नेह आमंत्रण. 

तुम्हा सर्वांना प्रेमाचा "जय भीम". 

अजय पाटील
जळगाव.

No comments:

Post a Comment