Tuesday, November 19, 2024

महाराष्ट्र राज्यात सत्ता कोणाला मिळणार ? महायुतीला की महाविकास आघाडीला ?

महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाली तेव्हा अमित शाह हे मुंबईत आले होते. त्यांनी भाजपच्या सर्व टीम ची बैठक घेऊन सांगितले होते की साम, दाम , दंड आणि भेद यापैकी जे वापरायचे ते वापरा पण सत्ता आपलीच आली पाहिजे. वरून हवी ती मदत आम्ही करूच. पण यावेळी महाराष्ट्राची सत्ता काहीही झाले तरी आपल्याकडेच पाहिजे.
पडद्याआड काम करणारे आणि रिजल्ट देणारे म्हणून त्यांची ख्याती सर्वश्रुत आहेच.
त्यामुळे महायुती चेच सरकार परत येईल अशी चिंन्हे आहेत.
 

इथे कोण खरा कोण खोटा हा मुद्दा नाहीये.
यापूर्वी असंतुष्ट वेगळे होऊन स्वतःचा पक्ष स्थापन करून किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन स्वतःचे स्थान नव्याने निर्माण करत होते. महाराष्ट्राच्या राजकारणात जे दुसऱ्याच्या घरावर स्वतःचा मालकी हक्क सांगण्याचे जे २ प्रकार झाले ते राजकारणाच्या परंपरेला काळिमा फासणारे झाले आहे. त्यामुळे भाजप जनतेच्या मनातून केव्हाच उतरली आहे.
 
जनतेच्या न्यायाने बघाल तर महाविकास आघाडी सत्तेत यायला पाहिजे.

पण अमित शाह यांच्या रणनीतीची तोड केवळ शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणी काढू शकला तरच अन्यथा पूर्ण देशभर भाजप सत्तेसाठी जे करते आहे ते बघता महाराष्ट्रात भाजप परत येणे थांबवणे कोणाला शक्य नाही.

कारण महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यावर लगेच विदर्भ प्रश्न निकालात लावून वेगळा विदर्भ केला जाईल. त्यानंतर मुंबई केंद्र शासित प्रदेश करणे सोपे पडेल.
महाराष्ट्राला मुंबई गमावण्याची किंमत म्हणून बेळगाव महाराष्ट्राला जोडले जाऊ शकते.

शेवटी खुर्चीचा खेळ आहे लोकहो. त्यात तुमच्या आमच्या मताची किंमत लोकशाहीसाठी मतदान करणे एवढीच आहे. तुम्हीच ठरवा कोणाला मत द्यायचे ते .
जय महाराष्ट्र ! जय हिंद !

Monday, November 6, 2023

महाराष्ट्र शासनाचे मोडी लिपी वर्ग (सविस्तर माहिती)

महाराष्ट्र शासनाचे मोडी लिपी वर्ग (सविस्तर माहिती)


 Courtesy: Facebook Post by Kanchan Karai 

Link: https://www.facebook.com/groups/MoDi.Lipi/posts/24490808933843694/?mibextid=c7yyfP

महाराष्ट्र शासनाचे मोडी लिपी वर्ग (सविस्तर माहिती)
महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागातर्फे आयोजित होणारे मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग एका वर्षात एकदा किंवा दोन वेळा आयोजित केले जातात. दोन प्रशिक्षक आळीपाळीने वर्ग घेतात.
दहा दिवसांचे प्रशिक्षण व अकराव्या दिवशी परिक्षा असे प्रशिक्षण वर्गाचे स्वरुप असते. व्यावसायिक मोडी लिप्यंरकार म्हणून काम करण्यासाठी ही परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे फायदेशीर ठरते.
परिक्षेला बसण्यासाठी उमेदवाराची अभ्यासक्रमाला ८०% उपस्थिती अनिवार्य आहे.
परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयातर्फे प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात येते.
ह्या अभ्यासक्रमाचे शुल्क ₹ ३००/- (अक्षरी रूपये तीनशे मात्र) असून कालावधी एकूण ११ दिवसांचा आहे .१० दिवसांचे प्रशिक्षण व ११ व्या दिवशी परिक्षा असे स्वरूप असते. (कृपया याबाबत संबंधित कार्यालयाकडून अद्ययावत माहिती घ्यावी).
प्रवेश घेते वेळेस आपले फोटो आयडी (आधार किंवा पॅन कार्ड) सोबत घेऊन जावे. प्रवेश अर्ज त्यांच्याकडे उपलब्ध असतात.
अधिक माहितीसाठी पुराभिलेख संचालनालयाच्या महाराष्ट्रातील पाच मुख्य शाखांशी संपर्क साधावा:
(१) मुंबई
Directorate of Archives, Mumbai. (Head Office)
Address: 156, Sir, Cowasjee Jahangir Readymoney Building, Mahatma Gandhi Road, Kala Ghoda, Fort, Mumbai – 400 032
Phone: 02222844268 / 02222843971
Email: directorarchives@gmail.com
(२) पुणे
Pune Archives ( पेशवे दफ्तर)
Address: Pune Archives, Opp. Council Hall, 12 Band Garden Road, Pune – 411 001.
Phone No: 0202612 7307
Email: punearchives@gmail.com
(३) कोल्हापूर
Kolhapur Archives
Address: Hujur Record Building, Opp. Town Hall, Kolhapur – 416 062.
Phone No: 0231-264 4394
Email: archivesoffice84@yahoo.com

(४) मराठवाडा
Marathwada Archives
Address: N-8A, CIDCO Corner, CIDCO, Aurangabad – 431 003
Phone No: 0240248 2193
Email: asst_director@dataone.in
(५) विदर्भ
Vidarbha Archives
Address: Room No.30, Old Secretariat Building, Opp. G.P.O., Civil Line, Nagpur – 440 001.
Phone No: 0712-254 3454
vidharbha_archives@yahoo.co.in

 

Tuesday, September 19, 2023

कोरा वर देखील सत्ताधारी पक्षाचे विरोधी प्रतिसाद देणार्या लेखकांना फिल्टर : अनुशासनपर्वाचा निषेध

 

देशाचे नाव 'India' हे बदलून 'भारत' ठेवण्याच्या नवीन निर्णयावर आपले काय मत आहे?

कोरा (quora.com) वर वरील प्रश्नावर मी पुढील प्रतिक्रिया दिली आणि त्याला देखील सत्ताधारी पक्षाचे विरोधी प्रतिसाद देणार्या लेखकांना फिल्टर लावलेले दिसले. या अनुशासनपर्वाचा निषेध. माझी हि कमेंट ब्लॉग वर त्यासाठीच टाकतो आहे. पुढे मागे ती .कोरा (quora.com) वरून उडवली जाणार हे दिसते आहे 

Link: https://mr.quora.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-India-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/answers/1477743695827484?__filter__=all&__nsrc__=notif_page&__sncid__=44026212394&__snid3__=58858976997 

इंडिया हे नाव ग्रीक लोक सिकंदराच्या आधीच्या काळापासून वापरत असत. एवढेच काय तर भारताचा महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारात २ वर्षे राहून भारताच्या वास्तव्यावर मॅगेस्थेनिस या ग्रीक वकिलाने ग्रंथ लिहिला त्यालाही त्याचे नाव "इंडिका" हेच ठेवावेसे वाटले. इंग्रजी वापरातले इंडिया हे नाव बदलून भारत करणे हा राजकारण्यांना डोके नसल्याचा स्पष्ट पुरावा आहे. डोके असलेच तर ते भारताच्या जनतेला निवडणुकांसाठी पुन्हा एकदा कसे मुर्खात काढायचे ? यात त्यांचा हात जगात कोणी धरू शकणार नाही. त्यासाठी देशाच्या प्रतिमेचा बळी द्यायला देखील हे राजकारणी कमी करत नाहीयेत हे विशेष. जगभरचे राजकारणी स्वार्थी राजकारण करतात पण राष्ट्राची ओळख पुसण्याचे काम आजपर्यंत जगात कोणी केलेले नाही.

आणि या अडाणी अशिक्षित राजकारण्यांना देवत्व दिलेल्या शिकलेल्या लोकांनी देखील स्वतःची बुद्धी त्यांच्या पायाशी गहाण ठेवलेली आहे असे एकंदरीत दिसते आहे.

मुळात इंडिया, भारत आणि हिंदुस्थान ही नावे ब्रिटिश काळात प्रचलित होती आणि वापरात देखील होती. आजही तेच वापरात आहे. या मुद्द्याचा सविस्तर वेध घेतोच आहे. पण नाव बदलण्याची गरजच काय आणि त्यामुळे फरक काय पडतो ? हेही या सरकारने स्पष्ट करण्याची तसदी घेतलेली नाहीये हे इथे विशेष सांगू इच्छितो. या बदलावर केंद्र सरकारची कोणतीही अधिकृत भूमिका अधिकृत स्टेटमेंट नाहीये. असे असूनही या नेत्यांचे भक्त आणि हुजरेगिरी करणारे लोकच त्यांची तळी उचलत आहेत. का ? हे त्यांनाही सांगता येणार नाही. संस्कृती चे लेबल लावून प्रश्न सुटत नाही.

इंडिया हे नाव केवळ इंग्रजी भाषेत वापरले जाते. इंडिया या नावाला भारत म्हणून वापरण्याची सक्ती भारतात करता येऊ शकते पण विदेशी लोक इंडिया हेच नाव वापरतील याची खात्री कोण देणार ? विदेशी लोक लेखनस्वातंत्र्याला जास्त किंमत देतात. त्यांच्यावर सक्ती करता येणार नाही. आणि ते भारताचा उल्लेख इंडिया हाच करणार. लाखो पुस्तके आहेत करोडो दस्तावेज आहेत ज्यात इंडिया हेच नाव वापरले गेले आहे. कारण त्याला एक इतिहास आहे.

पर्शियन भाषेत अवेस्तन संस्कृतीत "स" हा शब्द वापरात नव्हता म्हणून ते सप्त-सिंधू भूभागाचा उल्लेख हप्त-हिंदू असा करत. तसेच ग्रीक लोकांना सिंधू - इंडस नदी माहिती होती. त्यामुळे या नदीपलीकडचा प्रदेश तो इंडिया ही विदेशी लोकांना असलेली भारताची ओळख. आणि त्यांच्यासाठी हीच ओळख कायम राहणार आहे.

मग भारतात त्या इंडियाचे तुम्ही भारत करा हिंदुस्थान करा हिंदुराष्ट्र करा मेलूहा करा की आर्यावर्त करा. त्याने फारसा फरक पडणार नाही. फरक पडेल तो इथल्या लोकांना केंद्र सरकारने काहीतरी गौरवास्पद काम केल्याचा भास निर्माण केल्याचा. पण हे केवळ भ्रामक चित्र आहे. या बदलामुळे सर्वसामान्य लोकांना ना नवीन रोजगार मिळणार ना महागाई कमी होणार. उलट महागाई वाढणारच आहे. कारण सर्व सरकारी कागदपत्रे, देशाच्या चलनी नोटा, लाखो कोटी रुपयांचे स्टँम्प पेपर्स , सरकारी स्टॅम्प्स , इत्यादी सगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चे गव्हर्नमेंट ऑफ भारत करण्याचा जो खर्च आहे तो कित्येक लाख कोटींचा आहे. हा ताण नेहरू गांधींच्या चुकांमुळे तुमच्यावर टाकावा लागतो आहे अशी भाषणबाजी नंतर निवडून आल्यावर केली जाईल आणि मुकाट्याने तुम्हाला पेट्रोल २०० रुपये डिझेल १५० रुपये आणि गॅस २,५०० रुपयांचे झाले तरी तुमचे खिसे रिकामे करावेच लागतील. देशाच्या गौरवाची किंमत म्हणून तुम्हाला हा भर सहन करावा लागेल अशी जाहिरातबाजी होईल आणि जनतेला त्यांच्या खिशावर पडणारे हे दरोडे सहन करावेच लागतील. कारण या अडाणी आणि अशिक्षित नेत्यांना तुम्हीच निवडून दिलेले असेल. बहुमत बरोबरच असते असे नाही. पण भ्रमात बहुसंख्य लोकांना आणणे शक्य असते. आणि त्या भ्रमात जनता या अडाणी अकार्यक्षम नेत्यांना निवडून देऊ शकते. जनतेने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या नेत्यांनाच निवडून देण्याची पद्धत जोपर्यंत देशात पुन्हा सुरु होणार नाही तोपर्यंत संपूर्ण १४० कोटी जनतेला हा त्रास सहन करावाच लागणार आहे.

नावे बदलली म्हणजे जनतेच्या आयुष्यात चांगला बदल होतो का ? हा खरा मुद्दा आहे. नावे बदलण्याचा गाजावाजा कोण करतो ? ज्या नेत्यांकडे ठोस अशी दाखवता येणारी कामे नसली म्हणजे लोकांना भ्रमित करण्यासाठी ढोल ताशांचा गजर (खरे तर गाजर) करावा लागतो. पॅकेज ला रेवडी संस्कृती म्हणून बोंब मारणारे ५६ इंची सीना वाले नेतेच आता प्रत्येक दौर्यात हजारो कोटी लाखो कोटींच्या पॅकेजेस च्या घोषणा करत सुटले आहेत. ही पॅकेजेस त्या शहराला , जिल्ह्याना , राज्यांना मिळाली की नाही याचा हिशोब कोणी मागणारही नाही आणि देणारही नाही. उरतील त्या फक्त घोषणा.

एकूणच इंडिया चे भारत या इंग्रजी भाषेपुरते मर्यादित असलेल्या नामांतराचे कोणतेही नियोजन आणि समर्पक कारण सध्याच्या भाजप सरकारकडे नाहीये हे सत्य नाकारता येणार नाही.

भारताचे नाव "भारत" हे जैन राजा भरत याच्या नावा वरून ठेवण्यात आले आहे. याचे ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत. जे लोक महाभारत काळात देशाचे नाव नेतात त्यांना हे सांगतो की महाभारताचे मूळ ग्रंथाचे नाव देखील भारत नव्हते तर केवळ "जय" होते. आणि मूळ जय महाकाव्यात भरत राजाचे नाव देखील नाहीये. पुढे सौतीने विस्तार करून त्यात राजा भरत जोडला. पण भारत हे नाव जैन राजा भरत यावरून पडले आहे हे ऐतिहासिकदृष्ट्या सत्य आहे.

सामान्य जनता एवढी मेलेल्या मनाची झाली आहे का की त्यांना वाढती बेरोजगारी , वाढती गरिबी , वाढती महागाई, वाढते खर्च , वाढते कर्जाचे हफ्ते हे सर्व दिसत नाहीये ? तर दिसते आहे. जनतेच्या मनातला असंतोषाचा हा लाव्हा ज्वालामुखीचा स्फोट होईपर्यंत आत उकळत असतो. जेव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा मग क्रान्ती होते. ती क्रांती कशी असेल हे कोणीच सांगू शकत नाही. स्फोटाच्या तीव्रतेवर ते अवलंबून असते.

हिंदू मुस्लिम , सवर्ण - मागास , आरक्षणे , अशा लढाया लावून लोकांना त्यातच गुंतवले की अडाणी अशिक्षित नेते चुकीचे मार्ग वापरून निवडून येतात.

मरतो तो सामान्य माणूस.

जोपर्यंत वाढते रोजगार, वाढते उत्पन्न, कमी झालेली गरिबी, जनतेच्या खिशावरचा बोजा कमी करणे असे सकारात्मक राजकारण होत नाही. तोपर्यंत इंडियाचा भारत खऱ्या अर्थाने कधीही होणार नाही. मग कागदी घोडे कोणीही नाचवावे. कागदी घोड्यांनी वाघ मरत नसतो हेच खरे.. एवढेच काय तर भारताचा महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारात २ वर्षे राहून भारताच्या वास्तव्यावर मॅगेस्थेनिस या ग्रीक वकिलाने ग्रंथ लिहिला त्यालाही त्याचे नाव "इंडिका" हेच ठेवावेसे वाटले. इंग्रजी वापरातले इंडिया हे नाव बदलून भारत करणे हा राजकारण्यांना डोके नसल्याचा स्पष्ट पुरावा आहे. डोके असलेच तर ते भारताच्या जनतेला निवडणुकांसाठी पुन्हा एकदा कसे मुर्खात काढायचे ? यात त्यांचा हात जगात कोणी धरू शकणार नाही. त्यासाठी देशाच्या प्रतिमेचा बळी द्यायला देखील हे राजकारणी कमी करत नाहीयेत हे विशेष. जगभरचे राजकारणी स्वार्थी राजकारण करतात पण राष्ट्राची ओळख पुसण्याचे काम आजपर्यंत जगात कोणी केलेले नाही.

आणि या अडाणी अशिक्षित राजकारण्यांना देवत्व दिलेल्या शिकलेल्या लोकांनी देखील स्वतःची बुद्धी त्यांच्या पायाशी गहाण ठेवलेली आहे असे एकंदरीत दिसते आहे.

मुळात इंडिया, भारत आणि हिंदुस्थान ही नावे ब्रिटिश काळात प्रचलित होती आणि वापरात देखील होती. आजही तेच वापरात आहे. या मुद्द्याचा सविस्तर वेध घेतोच आहे. पण नाव बदलण्याची गरजच काय आणि त्यामुळे फरक काय पडतो ? हेही या सरकारने स्पष्ट करण्याची तसदी घेतलेली नाहीये हे इथे विशेष सांगू इच्छितो. या बदलावर केंद्र सरकारची कोणतीही अधिकृत भूमिका अधिकृत स्टेटमेंट नाहीये. असे असूनही या नेत्यांचे भक्त आणि हुजरेगिरी करणारे लोकच त्यांची तळी उचलत आहेत. का ? हे त्यांनाही सांगता येणार नाही. संस्कृती चे लेबल लावून प्रश्न सुटत नाही.

इंडिया हे नाव केवळ इंग्रजी भाषेत वापरले जाते. इंडिया या नावाला भारत म्हणून वापरण्याची सक्ती भारतात करता येऊ शकते पण विदेशी लोक इंडिया हेच नाव वापरतील याची खात्री कोण देणार ? विदेशी लोक लेखनस्वातंत्र्याला जास्त किंमत देतात. त्यांच्यावर सक्ती करता येणार नाही. आणि ते भारताचा उल्लेख इंडिया हाच करणार. लाखो पुस्तके आहेत करोडो दस्तावेज आहेत ज्यात इंडिया हेच नाव वापरले गेले आहे. कारण त्याला एक इतिहास आहे.

पर्शियन भाषेत अवेस्तन संस्कृतीत "स" हा शब्द वापरात नव्हता म्हणून ते सप्त-सिंधू भूभागाचा उल्लेख हप्त-हिंदू असा करत. तसेच ग्रीक लोकांना सिंधू - इंडस नदी माहिती होती. त्यामुळे या नदीपलीकडचा प्रदेश तो इंडिया ही विदेशी लोकांना असलेली भारताची ओळख. आणि त्यांच्यासाठी हीच ओळख कायम राहणार आहे.

मग भारतात त्या इंडियाचे तुम्ही भारत करा हिंदुस्थान करा हिंदुराष्ट्र करा मेलूहा करा की आर्यावर्त करा. त्याने फारसा फरक पडणार नाही. फरक पडेल तो इथल्या लोकांना केंद्र सरकारने काहीतरी गौरवास्पद काम केल्याचा भास निर्माण केल्याचा. पण हे केवळ भ्रामक चित्र आहे. या बदलामुळे सर्वसामान्य लोकांना ना नवीन रोजगार मिळणार ना महागाई कमी होणार. उलट महागाई वाढणारच आहे. कारण सर्व सरकारी कागदपत्रे, देशाच्या चलनी नोटा, लाखो कोटी रुपयांचे स्टँम्प पेपर्स , सरकारी स्टॅम्प्स , इत्यादी सगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चे गव्हर्नमेंट ऑफ भारत करण्याचा जो खर्च आहे तो कित्येक लाख कोटींचा आहे. हा ताण नेहरू गांधींच्या चुकांमुळे तुमच्यावर टाकावा लागतो आहे अशी भाषणबाजी नंतर निवडून आल्यावर केली जाईल आणि मुकाट्याने तुम्हाला पेट्रोल २०० रुपये डिझेल १५० रुपये आणि गॅस २,५०० रुपयांचे झाले तरी तुमचे खिसे रिकामे करावेच लागतील. देशाच्या गौरवाची किंमत म्हणून तुम्हाला हा भर सहन करावा लागेल अशी जाहिरातबाजी होईल आणि जनतेला त्यांच्या खिशावर पडणारे हे दरोडे सहन करावेच लागतील. कारण या अडाणी आणि अशिक्षित नेत्यांना तुम्हीच निवडून दिलेले असेल. बहुमत बरोबरच असते असे नाही. पण भ्रमात बहुसंख्य लोकांना आणणे शक्य असते. आणि त्या भ्रमात जनता या अडाणी अकार्यक्षम नेत्यांना निवडून देऊ शकते. जनतेने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या नेत्यांनाच निवडून देण्याची पद्धत जोपर्यंत देशात पुन्हा सुरु होणार नाही तोपर्यंत संपूर्ण १४० कोटी जनतेला हा त्रास सहन करावाच लागणार आहे.

नावे बदलली म्हणजे जनतेच्या आयुष्यात चांगला बदल होतो का ? हा खरा मुद्दा आहे. नावे बदलण्याचा गाजावाजा कोण करतो ? ज्या नेत्यांकडे ठोस अशी दाखवता येणारी कामे नसली म्हणजे लोकांना भ्रमित करण्यासाठी ढोल ताशांचा गजर (खरे तर गाजर) करावा लागतो. पॅकेज ला रेवडी संस्कृती म्हणून बोंब मारणारे ५६ इंची सीना वाले नेतेच आता प्रत्येक दौर्यात हजारो कोटी लाखो कोटींच्या पॅकेजेस च्या घोषणा करत सुटले आहेत. ही पॅकेजेस त्या शहराला , जिल्ह्याना , राज्यांना मिळाली की नाही याचा हिशोब कोणी मागणारही नाही आणि देणारही नाही. उरतील त्या फक्त घोषणा. 

एकूणच इंडिया चे भारत या इंग्रजी भाषेपुरते मर्यादित असलेल्या नामांतराचे कोणतेही नियोजन आणि समर्पक कारण सध्याच्या भाजप सरकारकडे नाहीये हे सत्य नाकारता येणार नाही.

भारताचे नाव "भारत" हे जैन राजा भरत याच्या नावा वरून ठेवण्यात आले आहे. याचे ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत. जे लोक महाभारत काळात देशाचे नाव नेतात त्यांना हे सांगतो की महाभारताचे मूळ ग्रंथाचे नाव देखील भारत नव्हते तर केवळ "जय" होते. आणि मूळ जय महाकाव्यात भरत राजाचे नाव देखील नाहीये. पुढे सौतीने विस्तार करून त्यात राजा भरत जोडला. पण भारत हे नाव जैन राजा भरत यावरून पडले आहे हे ऐतिहासिकदृष्ट्या सत्य आहे.

सामान्य जनता एवढी मेलेल्या मनाची झाली आहे का की त्यांना वाढती बेरोजगारी , वाढती गरिबी , वाढती महागाई, वाढते खर्च , वाढते कर्जाचे हफ्ते हे सर्व दिसत नाहीये ? तर दिसते आहे. जनतेच्या मनातला असंतोषाचा हा लाव्हा ज्वालामुखीचा स्फोट होईपर्यंत आत उकळत असतो. जेव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा मग क्रान्ती होते. ती क्रांती कशी असेल हे कोणीच सांगू शकत नाही. स्फोटाच्या तीव्रतेवर ते अवलंबून असते.

हिंदू मुस्लिम , सवर्ण - मागास , आरक्षणे , अशा लढाया लावून लोकांना त्यातच गुंतवले की अडाणी अशिक्षित नेते चुकीचे मार्ग वापरून निवडून येतात.

मरतो तो सामान्य माणूस.

जोपर्यंत वाढते रोजगार, वाढते उत्पन्न, कमी झालेली गरिबी, जनतेच्या खिशावरचा बोजा कमी करणे असे सकारात्मक राजकारण होत नाही. तोपर्यंत इंडियाचा भारत खऱ्या अर्थाने कधीही होणार नाही. मग कागदी घोडे कोणीही नाचवावे. कागदी घोड्यांनी वाघ मरत नसतो हेच खरे.

Monday, September 19, 2022

सोफी झांग डाटा सायंटिस्ट हिने फेसबुक चां वापर राजकीय फायद्यासाठी लाखो फेक अकाउंट उघडून केला जातो हे सिद्ध करून डाटा जाहीर केला आहे. त्याचे हे डिटेल्स.

हे महत्त्वाचे आहे. वाचा, शेअर करा, कॉपीपेस्ट करा, इमेलवर, वॉट्सॅपवर पुढे पाठवा.
ट्रोल नेटवर्क्सनी हे रिपोर्ट केल्यानंतर फेसबुकमधले भगवे गुलाम ही पोस्ट कदाचित् काढून टाकतील. कदाचित् असं काही आम्ही करत नाही हे दाखवायला ठेवतीलही. माहीत नाही.
---------------------
आज मला अभिमान वाटतो, एका निर्भय, तत्त्वनिष्ठ स्त्रीने फेसबुक कंपनीचा निगरगट्टपणा चव्हाट्यावर आणला आहे. फेसबुकमधल्या सोफी झांग या डाटा सायन्टिस्टने कंपनीला तिने दिलेला अंतर्गत इशारा प्रसिद्ध झाला आहे. आझरबैजान, होंड्युरास, भारत, युक्रेन, स्पेन, ब्राझील, बोलिव्हिया, आणि इक्वेदॉर या देशांत राजकीय पक्षांची तळी उचलून धरणारे लाखो खोटे- फेक अकाउंट्स फेसबुकवर आहेत, आणि त्यांनी अगदी कट करून राजकीय दृष्टीने असत्य अशा गोष्टींचा फैलाव केला हे लक्षात आणून देऊन सुद्धा फेसबुकने त्याबाबत काहीही पावले उचलणे नाकारले असे तिने उदाहरणांसहित स्पष्ट दाखवून दिले आहे. हा तिचा इशारा किंवा मेमो ६६०० शब्दांचा आहे. असे करणारे लोक नेमके कोण आहेत हे तिला नेहमीच कळले आहे असे नाही, पण इंटरनेट-फेसबुक-फॅन्सची संख्या फुगवून दाखवण्यासाठी खोटी अकाउंट्स हजारोंच्या संख्येने तयार केली गेली होती हे तिला स्पष्टच दिसत होते.
झँग म्हणते गेली तीन वर्षे मी फेसबुकमध्ये काम करताना हे पाहात आले आहे, की इतर परदेशी शासनांकडून फेसबुकचा वापर स्वतःच्या नागरिकांचीच दिशाभूल करण्यासाठी सर्रास केला जातो आहे. याबद्दलच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.
फेसबुकवर तिचे नेमलेले काम होते फेसबुकचा गैरवापर करणारे बॉट्स शोधणे, खोटा प्रचार करणाऱ्या झुंडी शोधणे. हे करत असताना तिने स्वतःहून अनेकदा कारवाई केली आणि असले प्रयत्न थांबवलेही. पण फेसबुकच्या व्यवस्थापनाने मात्र याबाबत आपली जबाबदारी टाळली. जे कर्मचारी स्वतःच्या सत्यनिष्ठेतून असले प्रकार रोखू पाहात होते त्यांना फेसबुकने पाठबळ तर दिलेच नाही, उलट त्रास द्यायला सुरुवात केली. तिने आपल्या मेमोत अशा ज्या उदाहरणांचा उल्लेख केला आहे त्यात भारतातल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दिल्ली निवडणुकांवर प्रभाव टाकू पाहाणाऱ्या फेसबुक फेकआयडींच्या गटाचाही उल्लेख आहे. त्या तो हजारोंचा गट काढून टाकला. पण फेसबुकने त्याची वाच्यता होऊ दिली नाही.
यावर फेसबुकचे अधिकृत म्हणणे असे आहे की “राजकीय गैरवापरासोबतच आम्हाला स्पॅमशीही झगडा करावा लागतो. मिस झँगने मांडलेल्या हेतुपुरस्सर   प्रश्नांसोबत आम्हाला ही शहानिशाही करावी लागते. त्यामुळे आम्ही संपूर्ण माहिती आल्याशिवाय वाच्यता करत नाही.”
झँगने आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की २०२०च्या अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीत समस्या निर्माण होऊ नयेत हे फेसबुकचे प्रयत्न आहेत. त्यात अडथळा येऊ नये म्हणून मी सारेच काही जाहीर करत नाही.
कंपनीबद्दल काहीही नकारात्मक न बोलण्याच्या अटीवर मिळणारी ६४ हजार डॉलर्सची ग्रॅच्युइटी मिळण्याची योजना झँगने नाकारली होती. ६४ हजार डॉलर्स म्हणजे ४७ लाखापेक्षा थोडे अधिक रुपये. (४७ लाख सोडा, ४७हजार रुपयासाठी सुद्धा अनेक लोक सत्याशी तडजोडी करतात). यामुळे तिला फेसबुकच्या कार्यालयातच निर्भीडपणे टीका करण्याचा हक्क प्राप्त झाला. आणि अमेरिका वा योरोपेतर देशांतील फेसबुकी राजकीय कारस्थानांना पायबंद घालण्यासाठी तिने या हक्काचा वापर केला.
फेसबुकवरील फेक अकाउंट्सची नेटवर्क्स शोधून काढण्यात झँगने प्रावीण्य मिळवले होते. पण फेसबुकला सत्यापेक्षा वाढत्या पसाऱ्यातून मिळणाऱ्या वाढत्या उत्पन्नाची हांव अधिक आहे असे आत्ता तरी दिसते आहे.
आपण पाहिले आहे, असल्या खोट्या आयडींच्या नेटवर्क्समधून विरोधकांच्या पोस्ट्स रिपोर्ट करून त्या खाली काढायला फेसबुकला सांगितले जाते. आणि अगदी विषारी वक्तव्ये मात्र रिपोर्ट करूनही- छे छे, आम्हाला यात आमच्या कम्युनिटी स्टॅन्डर्डच्या विरुद्ध जाणारे काहीही सापडले नाही अशी उत्तरे येतात. अत्यंत द्वेषी फेसबुक पेजेस फेसबुक सुखेनैव सुरू ठेवते. भारतीय संदर्भात या कामात आता फेसबुक कर्मचाऱ्यांतही भगवे चोर शिरले आहेत ही बातमी आहेच. फेसबुकची कर्मचारी अंखी दास ही भाजपच्या रश्मी दासची जुळी बहीण असल्यामुळे भारतातील फेसबुक भाजपाबाबत सैल आहे याची चर्चा आहेच.
एकेका नेटवर्कमध्ये सहासात लाख खोटी अकाउंट्स असतात, १० कोटी फेक कमेन्ट्स आणि फेक फॅन्स असतात. यांचा वापर करून जगभरात निवडणुकांवर, सार्वजनिक चर्चांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न चालतो ही एक जगड्व्याळ समस्या आहे.
फेसबुक जबाबदारी काम करते आहे ते केवळ अमेरिका आणि युरोपमध्ये. बाकी जगात वाट्टेल ते लोक, झुंडीने हैदोस घालत आहेत असे झँग म्हणते.
तिने आपल्या कामाच्या ठरल्या वेळेपेक्षा जास्त काम करून भारतासहित काही देशातील असली नेटवर्क्स शोधून काढली आणि रिपोर्ट केली. तेव्हा तिला सांगण्यात आलं की अखेर जनसंपर्क महत्त्वाचा आहे... तिने हे काम असं एकटीच्या जबाबदारीवर करू नये असंही तिला सुचवण्यात आलं. या गोष्टी मोठ्या वृत्तपत्रांत आल्या तर बघू म्हणाले...
तिचा अंतर्गत संघर्ष तिने तरीही सुरूच ठेवल्यानंतर या महिन्यात तिला कामावरून काढण्यात आले तेव्हा तिने आपला ६६०० शब्दांचा मेमो लिहिला. तिने आपल्या सहकाऱ्यांना फेसबुकमध्ये राहून फेसबुक सुधारण्याचा प्रयत्न करत रहायला सांगितलं आहे. ती म्हणते, फेसबुक हा फार प्रचंड मोठा प्रकल्प आहे, तो नीट चालावा यासाठी प्रयत्न करणं हे एकट्यादुकट्याचं काम नाही. तत्त्वनिष्ठा ठेवून अनेकांनी मिळून हा संघर्ष सुरू ठेवणे आवश्यक आहे.
खरोखर, जगभरात पोहोचलेले हे माध्यम बंद तर होणार नाहीच. पण ते ताळ्यावर रहावे म्हणून काम केले पाहिजेच. झँगने आपल्याला मिळणाऱ्या भरघोस पगाराचीच पर्वा करून गप्प बसायचे ठरवले असते, आणखी काही लोकांनी गेल्या महिन्यात जसा आवाज उठवला तसा उठवला नसता तर सारे छपून राहिले असते.
काही निर्भय लोकांमुळे सत्य नेहमीच उसळून वर येते आणि मग पसरत रहाते, कधी ना कधी असत्याला पराभूत करते.
झँग या तरुणीला सलाम.
फेसबुक सुधारेल अशी आशा.
 
मुग्धा कर्णिक

Sunday, December 26, 2021

अभी अभी बना हूं इंसान

विख्यात कवी आणि गीतकार मनोज मुंतशीर  यांच्या हिंदू कट्टरपंथी विचारधारेच्या ट्विट केलेल्या कमेंट बघून सुचलेल्या ओळी  

कुछ अभी अभी नए हिंदू हुए है ।
तो कुछ हो गए है नए मुसलमान ।
इनकी वजह से आज आंखे खुली है ।
मैं भी अभी अभी बना हूं इंसान ।।


कलम की आजादी अब हिंदू हो गई है ।
प्यार की आजादी अब लव जिहाद बनी है ।
इंसान के अंदर सोच का शैतान बसा है ।
और बदनाम धर्म को किया जा रहा है ।।

- सागर
🙏

Sunday, December 12, 2021

सिटीझन अमेंडमेंट बिलाचे पडद्यामागचे सत्य

सिटीझन अमेंडमेंट बिलावर समीर गायकवाड यांनी लिहिलेला खालील लेख अवश्य वाचा...आपण कोठून कोठे नेले जात आहोत यावर गांभिर्याने विचार करावा. जेंव्हा तुम्हालाही तुम्ही या देशाचे नागरिक आहात हे कागदोपत्री सिद्ध करावे लागेल तेंव्हा आजची उन्मादी प्रतिक्रिया कशात बदलेल हे तुम्हीच ठरवा. 

.....

संसदेत एका महत्वाच्या विधेयकावर चर्चा सुरु आहे. सिटीझनशिप अमेंडमेंट बिल (CAB).
हे विधेयक म्हणजे दाखवायचे दात आहेत आणि खायचे दात म्हणजे एनआरसी आहे (नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप NRC - नागरिकत्वाची राष्ट्रीय नोंद)
हे कसे ते पाहुयात -
आपल्या देशाचे नागरिकत्व कुणाला द्यायचे याच्या मसुद्यात सुधारणा करणारं विधेयक असं या CAB बद्दल ढोबळमानाने म्हणता येईल.

देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी काही अटी आहेत जसे की त्या व्यक्तीचा भारतात जन्म झालेला असावा वा त्याच्या जन्मदात्यापैकी एकाचा जन्म भारतात झालेला असावा किंवा ज्याचा सामान्यतः अकरा वर्षांचा रहिवास पूर्ण असावा. या खेरीज फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात विस्थापित झालेल्या लोकांसाठी काही उपकलमे आहेत.

आता या महत्वाच्या विधेयकाद्वारे नागरिकत्व बहाल करण्याच्या अटीत दुरुस्ती केली जातेय.
काय आहे ही दुरुस्ती -
या दुरुस्तीनुसार देशात त्या हिंदू, शीख, पारशी, बुद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांना नागरिकत्व मिळेल जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेले असतील. या खेरीज ११ वर्षे रहिवासाची अट शिथिल करून ६ वर्षे करण्याची शिफारस यात आहे.
आता यात केवळ मुस्लिमांना सरकारने वगळले आहे.

सरकारचा यावरचा युक्तिवाद असा आहे की या तीनही देशात मुस्लिम बहुसंख्यांक आहेत आणि अन्य धर्मीय अल्पसंख्यांक आहेत त्यामुळे या देशातील मुस्लिम व्यक्तींना नागरिकत्व देण्यात काही हशील नाही.

तर विरोधकांचे म्हणणे आहे की न्याय सर्वाना समान लावला पाहिजे, त्या देशातल्या एका ठराविक धर्माच्या व्यक्तीस सोडून तुम्ही अन्य धर्मीयांना नागरिकत्व देऊ नये. खेरीज धर्म पाहून नागरिकत्व देणे हे घटनाबाह्य आहे, घटनेतील तरतुदीनुसारच नागरिकत्व दिले जावे.
विरोधकांच्या युक्तिवादावर सरकार प्रतियुक्तिवाद करताना मागील दाखले देत आहे. जसे की बांगलादेश निर्मितीच्या वेळेस इंदिरा गांधी यांच्या सरकारने काही लाख लोकांना भारताचे नागरिकत्व बहाल केलं. तर एलटीटीईच्या विद्रोहप्रसंगी श्रीलंकेतून आलेल्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यात आलं.

सरकारकडे बहुमत आहे आणि त्याच्या जोरावर हे विधेयक दोन्ही सदनात मंजूर होईल हे उघड सत्य आहे.
विरोधकांचे म्हणणे आहे की हे विधेयक संमत झाल्यास घटनेच्या १४ व्या आणि १५ व्या कलमाचे उल्लंघन होईल.
या दोन्ही कलमांचा गोषवारा थोडक्यात असा आहे -
Article 14 of Indian Constitution states that “The state shall not deny to any person equality before the law or the equal protection of the laws within the territory of India.”
Article 15 of Indian Constitution Explained - “the state shall not discriminate against any citizen on grounds only of religion, race, caste sex, places of birth or any of them".
१४ वं कलम सांगतं की कायद्यापुढे सगळे सामान आहेत. सर्वांना कायद्याचे समान संरक्षण असेल.
१५ वं कलम सांगतं की धर्म, वंश, जाती, लिंग, जन्मस्थळ यांच्या आधारे भेद करता येणार नाही.
यावर सरकार सांगतं की ही कलमे भारतातील सर्व नागरीकांना लागू असतील यात कुठलाही भेदभाव केलेला नाही. आम्ही हा पाया बदललेला नाही तो आहे तसाच ठेवत आहोत.

तर मेख इथे आहे.
घटनेच्या तरतुदी भारतीय नागरीकांना लागू होतात.
आपण या देशाचे नागरिक आहोत हे आपल्याकडील शासकीय नोंदी आणि डोमिसाईलच्या कागदपत्रांवरून सिद्ध होते.
सरकारचे धोरण आहे की संपूर्ण देशात २०२४ पर्यंत एनआरसी राबवायची आहे : नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप - नागरिकत्वाची राष्ट्रीय नोंद
हे का गरजेचे आहे हे सांगताना सरकारचा युक्तिवाद आहे की देशातील घुसखोर शोधून काढून जे भारतीय नागरिक आहेत त्यांनाच ठेवून घ्यायचे आहे आणि नागरिक नसलेल्या लोकांना / घुसखोरांना हाकलून द्यायचे आहे.
घुसखोरीच्या मुद्दयांवर पूर्वोत्तर राज्यातले राजकारण चालत आलेय. त्यातही आसाम यामध्ये होरपळून निघाला आहे.

आसाममध्ये एनआरसी लागू केली गेलं तेंव्हा त्याचा आधार होतं घटनेतील परिशिष्ट ६ अ -
Section 6A says all Indian origin persons, including from Bangladesh who entered Assam before January 1966, are deemed citizens. Those who came between January 1, 1966, and March 25, 1971, can also get citizenship after registering themselves and living in India for 10 years. Everyone who entered after March 25, 1971, is to be identified as foreigner by the Tribunals and deported.

एकट्या आसाममध्ये लागू झालेल्या एनआरसीच्या यादीत दोन वेळा पुनःतपासणी झाल्यानंतर नऊ लाखाहून अधिक लोक सध्याच्या नागरिकत्वाच्या व्याख्येनुसार अपात्र ठरत आहेत. यात सर्व धर्माचे लोक आहेत. यांचे जीवन दोलायमान झालेलं आहे.
आताचे संसदेत मांडले गेलेले CAB विधेयक मंजूर झाले तर आसाममध्ये काय होईल याचे उत्तर असे येईल - या नऊ लाख लोकानांपैकी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, बुद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांना नागरिकत्व मिळेल. म्हणजेच या देशातून आलेल्या मुस्लिमाना नागरिकत्व मिळणार नाही. या नऊ लाखाहून अधिक असलेल्या लोकांत पाच लाख चाळीस हजार बांगलादेशी हिंदू आहेत, त्यांना सहज नागरिकत्व मिळेल. यात स्पष्ट आहे की उरलेल्या लोकांतील मुस्लिम वगळता सर्वांना नागरिकत्व मिळेल.

विरोधकांचा घटनाबाह्यतेचा आरोप खोडताना सरकारकडून युक्तिवाद होतोय की देशाचे नागरीक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल आम्ही भेदभाव करत नाही परंतु जे या देशाचे नागरीक सिद्ध होत नाहीत त्यांना देशाचे संविधान लागू होत नसल्याने धर्माधारित भेदभावाचा प्रश्नच येत नाही.

इथे मेख अधिक स्पष्ट होते. वर उल्लेखलेल्या ३ देशातील मुस्लिम वगळता अन्य नोंदीत धर्मीयांना नागरिकत्व द्यायचे, ज्यांचा रहिवास सहा (प्रस्तावित बदलानुसार) वर्षांहून अधिक असेल त्या सर्वांनाच नागरिकत्व द्यायचे मात्र ज्यांचा रहिवास याहून कमी काळाचा असेल त्यातील मुस्लिम वगळता इतरांना नागरिकत्व द्यायचे. थोडक्यात जे मुस्लिम सहा वर्षाहून कमी काळासाठी भारतात रहिवास करून आहेत आणि ज्यांच्याकडे एनआरसीमध्ये नोंद होण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे नसतील अशा सर्व लोकांना देश सोडावा लागेल. नागरीकांना समान न्याय देत असून जे नागरीक नाहीत त्यांचा प्रश्नच नाही असा हा मामला आहे. मात्र नागरीक ठरवण्यासाठी मुस्लिम वगळण्याची जी मेख आहे ती केवळ नागरिकत्व बहाल करण्यापुरती नसून ती प्रामुख्याने एनआरसीसाठी शस्त्र म्हणून वापरली जाईल.

संपूर्ण देशात जेंव्हा एनआरसी राबवली जाईल तेंव्हा देशभरातील मुस्लिम वगळता अन्य धर्मीय जे उपरोक्त तीन देशातून आले आहेत त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही. मात्र ज्या मुस्लिमांचे नाव एनआरसीत येणार नाही त्यांना देश सोडावा लागेल.
CAB च्या दृष्टिकोनातून पाहू जाता हा मुद्दाच समोर येत नाही मात्र एनआरसीच्या नजरेतून पाहिले की यात मुस्लिमांशी उघडपणे भेदभाव केल्याचे दिसून येते.
ज्या ईशान्येकडील राज्यांपायी हे सगळं केलं गेलं तिथले लोक मात्र एनआरसी आणि CAB दोन्हीवर नाराज आहेत. मणिपूरची अंतर्गत परवाना पद्धत जारी राहील असं सांगत त्यांना यातून वगळलं आहे. आसाममध्ये मात्र या दोन्ही बाबींवरून प्रचंड असंतोष आहे. तिथे लोक रस्त्यावर आलेत पण आपल्या मीडियाने त्यांचे आणि त्यांच्या सबस्क्राईबर्सचेही डोळे झाकलेत.

काय हवं होतं -
भारतात नागरिकत्व देताना त्या व्यक्तीने त्याच्या मूळ देशात काय पराक्रम गाजवला आहे, तो कर्जबाजारी आहे का, त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत का, त्याने आर्थिक घोटाळे केले आहेत का, त्याला कुठले आजार रोग वगैरे आहेत का, त्याची सामाजिक पार्श्वभूमी कशी आहे, त्याला आपल्या देशात कशासाठी यायचे आहे, त्याला नागरिकत्व देण्याने देशाचे कोणते नुकसान होते आहे का, तेढ निर्माण होते आहे का, इथे तो कायम राहणार आहे का, इथल्या साधनसंपत्तीचा उपभोग घेऊन तो माघारी जाणार आहे का अशा अनेक बाबी तपासून त्याचे हेतू, उद्दिष्ट यांची कठोर चिकित्सा होऊन त्याला नागरिकत्व दिले जाणे अपेक्षित आहे. तो गैरमुस्लिम आहे म्हणून त्याला दारे उघडी करण्यातही अर्थ नाही आणि तो मुस्लिम आहे म्हणून त्याला अडवण्यात अर्थ नाही. मुळात आपल्या देशातील साधनसंपत्ती किती आहे, आपल्याकडे लोकसंख्येचा भस्मासुर तोंड काढून उभा आहे, रोजगारापासून ते जीवनविषयक मूलभूत गरजांच्या उपलब्धतेपर्यंत आपण प्रचंड पिछाडीवर आहोंत. आपली अर्थव्यवस्था उतरत्या आलेखात आहे. पाश्चात्य देशात जिथे मुबलक साधनसंपत्ती आणि भौतिक मूलभूत गरजा भागवणं सहज शक्य असूनही तिथे नागरिकत्व देताना अनेक कठोर कसोट्यांचे नियम लावले जातात त्या नंतर मग कुठे नागरिकत्व मिळते. आपण या सर्व न्याय्य मुद्द्यांना हरताळ फासून केवळ धर्माच्या आधारे नागरिकत्व देणार असू तर त्याने केवळ धार्मिक तेढ वाढत जाईल. वरील तीन देशात अल्पसंख्यांकांना वाईट वागणूक मिळते ज्यांच्यासाठी आमच्या मनात सहानुभूती आहे म्हणून आम्ही त्यांना आपली दारे खुली करत आहोत आणि मुस्लिम हे तिथलं बहूसंख्यांक आहेत म्हणून आम्ही त्यांना नाकारत आहोत हा वरवरचा भाग आहे, या खाली दडली आहे एनआरसीत अपात्र ठरलेल्या केवळ मुस्लिमांनाच या देशातून हाकलून लावण्याची नीती. CAB विधेयक दोन्ही सदनात मंजूर होईलच. त्या नंतर देशभरात एनआरसीचे काम सुरु होईल. मग या देशात एकच मुख्य मुद्दा चर्चेत उरेल तो म्हणजे हिंदू मुस्लिम भेदभाव. हिंदूंना वाटेल की हे सरकार आपलेच आहे आणि मुस्लिमांना वाटेल की हे आपला द्वेष करतात. कित्येक दशके इथे राहिलेल्या एनआरसीत अपात्र ठरलेल्या मुस्लिमांना कुठे पाठवणार ? ज्या देशात यांची रवानगी करायची आहे त्यांनी यांना नाकारल्यास त्यांनी कुठे ठेवणार ? आजघडीला मागील दहा वर्षापासून सुरु असलेल्या आसाममधील सिल्चर येथील डिटेन्शन कॅम्पमध्ये ३५ बाय २५ फुटांच्या खोलीत २५ माणसं या हिशोबाने कोंबण्यात आलेल्या खुराड्यात हजारो माणसांची जी अवस्था झालीय तिच यांची ही होईल. हे सर्व घडत असताना देशातील शांतता आणि शासनव्यवस्था पणाला लागेल, या लोकांना सांभाळण्याचा आर्थिक बोजा पडेल. महत्वाचे म्हणजे गेले कित्येक वर्षापासूनचा हिंदूमुस्लिम भाईचारा धोक्यात येऊन राष्ट्रीय एकात्मकतेची वीण उसवत राहील.

इतकं महत्वाचं विधेयक मांडलं जात असताना त्यावर देशात साधक बाधक चर्चा न होता निम्म्याहून अधिक लोक आपल्या स्वमग्नतेच्या कोषात दंग आहेत तर अन्य बहुसंख्य धार्मिक उन्मादात व्यग्र आहेत. नोटबंदीच्या काळात नेमके हेच झाले होते, अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत होत्या. तेंव्हा समर्थन करणारे आता मिठाची गुळणी धरून असतात. आताही तेच होते आहे. विरोधाचा आवाज क्षीण आहे. काहींची बालिश भूमिका अशी आहे की नेपाळ आणि श्रीलंकेत मुस्लिम अल्पसंख्य आहेत त्यांनाही या नागरिकत्वाची खिरापत देण्यात यावी. या देशात कुणाला हिंदूंचा मसीहा व्हायचंय तर कुणाला मुस्लिमांचा तारणहार व्हायचं आहे त्यासाठीची ही रस्सीखेच आहे आणि ही रस्सी तुमच्या आमच्या गळ्याला आवळली जाणार आहे हे माहिती असूनही आपण निवांत बसून आहोत. कुठल्याही धर्माच्या नागरिकासाठी काहीही शिथिल वगैरे केले जाऊ नये. कुणाचेही फाजील लाड केले जाऊ नयेत, नागरिकत्व देताना धर्म हा आधार न मानता देशहित हा आधार मानला जावा ही भूमिका असायला हवी. आपल्याच देशाच्या नागरिकत्वासाठी महत्वाचे बदल असणारं एक विधयेक मांडलं जातंय आणि बहुसंख्य जनता कुंभकर्णी निद्रेत आहे. ही अनास्था या देशाला कधी तरी नक्की महागात पडेल.

- समीर गायकवाड Sameer Gaikwad

Wednesday, November 10, 2021

" जय श्री राम" आणि "जय भीम"

" जय श्री राम" आणि "जय भीम"
जय श्रीराम आणि जय भीम हे फक्त शब्द नाहीत किंवा फक्त कोणत्या घोषणा नाहीत. या दोन भिन्न, विरुद्ध टोकाच्या विचारधारा आहेत. 
मी स्वतः एक हिंदू आहे मात्र मी आयुष्यात कधीही कुणाला जय श्रीराम म्हटलो नाही. याचे सोपे कारण म्हणजे मला ही घोषणा कधीही आपलीशी वाटली नाही. ही घोषणा सर्व हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाही. तर फक्त काही कट्टरवादी, ब्राह्मण्यवादी लोकांचे प्रतिनिधित्व करते. या घोषणेला सर्व हिंदुंच्या माथी मारणे हेच या कट्टरवाद्यांचे काम. 
जय श्रीराम ही घोषणा वरकरणी रामाशी निगडीत वाटत असली धर्माशी निगडित वाटत असली तरी ती फसवी आहे.
ती एक द्वेष पसरवणारी, विभाजनकारी, कट्टरवादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करते.
विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षा सारखा राजकीय पक्ष आणि त्याच्या कट्टरवादी संघटना म्हणजेच बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद वगैरेच या घोषणेचा वापर करतात.
ही विचारधारा वरकरणी मुस्लिम विरोधी वाटत असली तरी
हा फक्त या विचारधारेचा मुखवटा आहे.
तिच्या अंतरंगात मात्र तीन स्पष्ट चेहरे दडलेले आहेत.
पहिला प्रचंड भांडवलवादी चेहरा. जिथे आर्थिक नाड्या फक्त काही ठराविक लोकांच्या हातात असतील. जे नागरिकांना गरीब बनवून त्यांना गुलामगिरी कडे घेऊन जातील. गरीब कामगारांचे शोषण करणार आहे. एक शोषित, पीडित, गुलाम समाज बनवणे या चेहऱ्याचे अंतिम ध्येय.
दुसरा चेहरा प्रचंड जातीयवादी आहे.
जो मनुवादावर आधारित समाज उभारू इच्छितो.
जिथे उच्चवर्णीयांचे साम्राज्य असेल. राजकीय सत्ता फक्त तेच उपभोगतील. सत्ताकेंद्र त्यांच्याच अवतीभवती फिरत राहिल आणि मागासवर्गीयांवर अत्याचार करण्याचा हक्क त्यांना प्राप्त होईल.
जिथे प्रचंड विषमता असेल. 5% लोक 95 % लोकांवर राज्य करतील.
आणि तिसरा चेहरा म्हणजे कट्टर पुरुष प्रधानता.
जिथे स्त्री म्हणजे फक्त उपभोगाची वस्तू असेल.
तिला काहीही किंमत राहणार नाही.
स्त्रियांना हवी तशी उपभोगण्याचा हक्क त्या पुरुषांना प्राप्त
होईल. शिक्षण, स्वातंत्र्य, समता, राजकारण वगैरे स्त्रियांचे सर्व हक्क हिरावून घेण्यात येतील.
अशा या तीन चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी विचारधारा म्हणजे जय श्रीराम.
ही विचारधारा हिंदुत्ववाद्यांची आहे, हिंदूंची नाही.
हे प्रत्येक हिंदूने लक्षात घ्यायला हवे.
म्हणून तिला व्यापक न होऊ देता हिंदुत्ववाद्यांपर्यंत सिमीत ठेवणे हे आपले ध्येय असायला हवे. 

दुसरीकडे या विचारधारेच्या अगदी विरुद्ध टोकाला "जय भीम" ही विचारधारा आहे. 
जय भीम ही व्यक्तीकेंद्रीत किंवा जाती केंद्रित व्यवस्था नाही.
ती सर्वव्यापक, सर्वसमावेशक विचारधारा आहे.
"जय भीम" म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता.
जिथे जय श्रीराम या विचारधारेला विषमता हवी आहे तिथे जयभीम या विचारधारेला समता नांदवायची आहे.
जाती, धर्म, लिंग, प्रांत, भाषा या सर्वांच्याच समतेसाठी जय-भीम विचारधारा कसोशीने प्रयत्न करते. 
जिथे समता असते तिथेच एकता असते, तिथेच शांतता नांदते.
"प्रेम, सद्भाव, भाईचारा, समता, बंधुता, स्वातंत्र्य, शांतता असणारा समाज निर्माण करणे" हे जय भीम विचारधारेचे अंतिम ध्येय. 

जय श्रीराम ही विचारधारा तुम्हाला अराजकतेकडे घेऊन जाते
तर जय भीम विचारधारा तुम्हाला शांततेकडे घेऊन जाते.

जय श्रीराम या विचारधारेला सर्व हिंदूं पर्यंत व्यापक होऊ देऊ नका. तर जय भीम या विचारधारेला एका जाती-समाजापर्यंत सीमित राहू देऊ नका. ती मानवतेची विचारधारा आहे तिला व्यापक बनवा. 
यातच आपले आणि आपल्या देशाचे सौख्य सामावले आहे.

निवड तुमची आहे. तुमच्या निवडीवर तुमचे, येणाऱ्या पिढ्यांचे आणि संपूर्ण देशाचे भविष्य अवलंबून आहे एवढे लक्षात राहू द्या.

मी प्रेम, सहिष्णुता, आपुलकी, समतेची जय-भीम विचारधारा स्वीकारली आहे. तुम्हालाही सस्नेह आमंत्रण. 

तुम्हा सर्वांना प्रेमाचा "जय भीम". 

अजय पाटील
जळगाव.

Monday, November 8, 2021

नोट बंदी चे परिणाम : २०२१ मध्ये घेतलेला आढावा

होय २०१६ मध्ये मोदी सरकारने घेतलेला नोट बंदी चा निर्णय अत्यंत अयोग्य निर्णय होता. हे आता ५ वर्षांनंतर सिद्ध झाले आहे. 
१. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला मोठा ब्रेक लागला
२. भारताला कोणत्याही मंदीतून सावरण्यासाठी मदत करणारी एक समांतर रोखीने चालणारी अर्थव्यवस्था होती ती पूर्ण बरबाद झाली. मजुरांचे रोजंदारी , किरकोळ खरेदी सर्व रोखीने व्हायची डिजिटल सक्तीमुळे या सर्व व्यवहारांवर , रोजगारावर, नोकऱ्यांवर , उद्योगधंद्यां वर खूप गंभीर परिणाम झाला. 
३. २,००० ची नवीन नोट सुरू केल्यामुळे नोट बंदी पूर्वी असलेल्या रोख चलना पेक्षा अडीच पटीने अधिक रोख रक्कम बाजारात आली. त्यामुळे काळया पैशाला ब्रेक लावण्याची स्कीम पण  पूर्ण फसली.
४. कोणत्याही नव्या नोटा पैसे काढायच्या मशीन मध्ये calibar कराव्या लागतात. हे आर बी आय ला माहिती आहे. त्यात नवे असे काही नाही. तरीही निर्णय रातोरात आणीबाणीच्या पद्धतीने कोणतीही तयारी न करता राबवला गेला. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. यात हजारो नागरिकांचे प्राण देखील गेले. हा सरकारचा मोठा बेजबाबदारपणा झाला.
५. अतिरेक्यांची भीती दाखवली गेली होती. नव्या नोटा सरकारने उपलब्ध करून दिल्यावर जम्मू काश्मीर मध्ये अतिरेक्यांनी थेट ४/५ बँका लुटून नव्या नोटांचा हा प्रश्न १ महिन्यात सोडवला. सबब हेही कारण पोकळ निघाले.
५. काळा पैसा अडवण्या साठी आणि बाहेर काढण्याची मोठी मोहीम असा दावा मोदींनी केला होता तो पण फुसका बार निघाला. करून ९९.७०% नोटा बँकेत परत आल्या. त्यामुळे काळा पैसा बाहेर आलाच नाही. तो येणारच नव्हता
६. आर. बी आय. ने सल्ला दिला होता की काळा पैसा सोने हिरे दागिने जमिनी या स्वरूपात जास्त आहे. नोट बंदी मुळे हा उद्देश साध्य होणार नाही आणि उलट देशाच्या विकासाला मोठा ब्रेक लागेल. तरीही मोदी सरकारने देशाची गंगाजळी सांभाळणाऱ्या संस्थेचे न ऐकता स्वतःचेच घोडे  दमटले. त्याची फळे आजही भारतातील जनता भोगत आहे. 
७. नोट बंदी मुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीची दरी अजूनही भरून निघालेली नाहीये. देशात स्वातंत्र्य मिळाल्या नंतरची सर्वात मोठी बेरोजगारी निर्माण करणारे सरकार म्हणजे मोदी सरकार इतिहासात अजरामर झाले आहे. महामारी अलीकडे आली. बेरोजगारी रेकॉर्ड स्तरावर महामारी येण्या आधीच गेलेली होती. 
अशी अनेक शेकडो कारणे आहेत. ज्यांचा कोणताही अभ्यास न करता मोदी सरकारने नोटबंदी चां अयशस्वी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची खूप मोठी हानी करणारा निर्णय घेतला हे सिद्ध होते. 
अजूनही सरकारने तज्ज्ञ लोकांचे ऐकून चुका सुधाराव्यात. इंधनाच्या  अवाजवी २३०% टॅक्स गोळा करून तुम्हाला तात्कालिक पैसे मिळतील. पण त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बेरोजगारी या समस्या  कधीही सुटणार नाहीत. मोदी सरकारने वेळेवर या चुका सुधाराव्यात ही अपेक्षा 🙏🙏

Wednesday, October 21, 2020

मोदी फेल का आहेत ?

मनमोहन सिंह यांचे काम चुकीचे असते तर देशाचा जी डी पी वाढला नसता
माल्या नीरव मोदी चोकसी यांना कर्जे जरी काँग्रेस काळात दिली गेली असली तरी त्यांची परतफेड ते वेळेवर करत होते.  
हे लोक विदेशात पळून गेले ते मोदींच्या काळात हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल.
कागदोपत्री हे सिद्ध झालेले आहे की नीरव मोदी चोकसी व्हिडिओकॉन यांची सर्व कर्जे कोणतेही तारण नसताना मूळ कर्जांच्या वीस ते दोनशे पट जास्त पुन्हा दिली गेली ते २०१४ ते २०१७ या काळात. मग त्या कारभाराचा दोष पण काँग्रेस चा? 
मोदींच्या मागच्या ६ वर्षांच्या काळात मोजक्या उद्योगपतींची २५ लाख कोटी रुपयाची कर्जे माफ झालेली आहेत जी आजपर्यंत कोणत्याही सरकारने केली नव्हती.
आपण सामान्य लोकं जे पेट्रोल आज ७० /८० रुपयांनी भरतो आहोत त्यांची प्रत्यक्ष किंमत २० ते २२ रुपये आहे. जागतिक तेलाचे भाव पत्त्यासारखे कोसळून तो फायदा सामान्य माणसांना दिला जात नाहीये. यातून सरकारने गेल्या ४ वर्षांत ५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे. लोकांना लाभ न देता कोणाला लाभ मिळाला हे तुमच्या आता लक्षात आले असावे.
 मागच्या तिमाहीत जी डी पी -२४% एवढा जोरात कोसळला आहे. सरकारचे टॅक्स द्वारे होणारे उत्पन्न कमी झाले आहे. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे इन्कम टॅक्स आणि पी एफ फंडात येणारी रक्कम कमी झालेली आहे. हे सर्व असताना परिस्थिती सुधारत आहे असे वाटते तुम्हाला ?
 मनमोहन सिंग यांच्यासारखा गोल्ड मेडलिस्ट अर्थतज्ज्ञ पंतप्रधान होता म्हणून २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीतून देशाला त्यांनी वाचवले होते. ती आर्थिक अडचण आजच्या पेक्षा भयंकर होती. मी स्वतः त्यावेळी सविस्तर अनुभवले आणि अभ्यासले पण आहे. 
एका डिग्री चां पत्ता नसलेल्या पी एम च्या आर्थिक ज्ञानावर तुमचा विश्वास आहे पण जगातील सर्वात प्रगत देशांत ज्या अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांच्या पुस्तकांचा, लेक्चर्स चां, त्यांनीं घेतलेल्या निर्णयाचा आदर्श म्हणून अभ्यास केला जातो त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही हे समजण्या पलीकडे आहे. 
मोदी सरकारने ६ वर्षांचा काळ पूर्ण केला आहे हे ही बघा. अजून किती वाट बघायची ? ६ वर्षे हा खूप मोठा काळ असतो कामाची फळे दिसण्यासाठी. 
नोट बंदी आणि चुकीची जी एस टी यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्ण कोसळली आहे.
जी एस टी कलेक्शन मधले राज्यांना देण्यासाठी केंद्र सरकार आज हात वर करत आहे.
एकट्या महाराष्ट्रातून केंद्र सरकारला देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ३८% टॅक्स मिळतो. आणि जेव्हा राज्याला गरज आहे तेव्हा ते पैसे मिळत नाही आणि थकवले जातात. राज्याचे उत्पन्न नसेल तर कोणते राज्य काम करू शकेल ? हे एक उदाहरण आहे.
तुम्ही जी माहिती सांगितली ती मी संघ आणि भाजप ने व्हॉटसअप द्वारे पसरलेली माहिती आहे. सत्य नाही एवढे सांगून थांबतो.
स्वतः बघा काय होत आहे ते. मोदी केवळ १ ते २ टक्के गोष्टींवर लक्ष देत आहेत.
प्रत्यक्षात देशासाठी सर्वात महत्त्वाचे आहे रोजगार, नोकऱ्या, आरोग्य सुविधा, शिक्षण, अन्न , वस्त्र निवारा ... या सर्व गोष्टी उत्तम झाल्यावर मोदींनी हवे तेवढे पुतळे आणि मंदिरे बांधावीत. कोणाचीही त्यावेळी हरकत नसेल. 
आत्ता गरज काय आहे आणि मोदी काम काय करत आहेत हे ही तपासून बघण्याची गरज आहे. 

Saturday, June 27, 2020

भारतात सध्या आर्थिक अराजकता का पसरली आहे?

मुळात सध्याच्या सरकारने गेल्या ६ वर्षांत आधीच्या सरकारांनी केलेली कामे पुढे नेली नाहीत. आणि आधी जे जे निर्माण झाले तो ढांचा उध्वस्त करत सुटले आहेत. हजारो कोटी रुपये नफा देणाऱ्या सरकारी कंपन्या विकून दुभती गाय कापण्याचे काम सध्याच्या सरकारने गेली ६ वर्षे केले आहे.
तो पैसा सरकारने कशासाठी वापरला याचा कोणताही ठोस डाटा उपलब्ध नाहीये. पण ३ हजार कोटी रुपयांचा पुतळा, मोठ मोठ्या घोषणा आणि त्यांना जाहीर केलेली पॅकेजेस अशा गोष्टीतून सध्याच्या सरकारला देश कसा चालवतात याचे प्राथमिक ज्ञान सुद्धा नाहीये हे अगोदरच सिद्ध झालेले आहे. 
चुकीच्या निर्णयामुळे सरकारकडे वापरण्यासाठी पैसा कमी पडतो तेंव्हा सरकार कडे तत्काळ निधी उपलब्ध होण्यासाठी पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमती वाढवणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. 
पण प्राप्त परिस्थितीत मागील काही वर्षांत झालेल्या घटना पाहिल्या तर या सरकारने आर बी आय कडून कित्येक लाख कोटी रुपये घेतले आहेत. जे या आधी कोणत्याही सरकारांनी इतक्या प्रमाणात घेतले नव्हते. पी एम केयर फंडात जनतेने खूप उदार मनाने दान दिलेले आहे. तो पैसा कित्येक लाख कोटी रुपयांचा असेल असा अंदाज आहे. पण माहिती अधिकार क्षेत्रात या फंड ला सरकारने वगळले असल्यामुळे याची नेमकी माहिती जनतेला मिळणे कठीण आहे. 
पेट्रोल डिझेल गॅस यांच्या वाढीव टॅक्स वरून सरकारने आतापर्यंत गेल्या ६ वर्षांत जवळपास २५० लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
असो तर ही झाली पार्श्वभूमी.
कित्येक लाख कोटी रुपये सरकारने जमा केलेले असताना 
ज्या पेट्रोल ची किंमत ३० रुपये लिटर ठेवून सुद्धा सरकार कित्येक लाख कोटी रुपये नफा कमावू शकते असे असतानाही ७५ ते ८० रुपये या दराने वाढीव किमती वसूल करणे याला जनतेच्या खिशावर टाकलेला राजरोस दरोडा यापलीकडे चांगले नाव देता येणे शक्य नाही. 
लोकांनी सध्याच्या सरकारला २०१४ मध्ये खूप मोठ्या आशेने निवडून दिले आणि असे लोकांना वाटले होते की हे सरकार लोकांच्या हितांची कामे करतील. पण असे झाले नाही. विकास नावाच्या बाळाचे गाजर दाखवून सत्तेवर आलेले विद्यमान सरकार चे हेतू पूर्ण वेगळे आहेत. त्यांना देशात धार्मिक दुफळी माजवून फोडा आणि झोडा या इंग्रजांच्या राजकारणाचा आदर्श ठेवून काम करायचे आहे. 
सध्याच्या सरकारने इतक्या लाख कोटी रुपयांचा निधी कोणत्याही विकास कामांसाठी वापरला असता तर तो विकास डोळ्यांना दिसला तरी असता. पण सध्याच्या सरकारने काही केले आहे असे कुठेही दिसत नाही. जनतेचा हा विश्वास पूर्ण गमावलेला असताना २०१९ मध्ये हेच सरकार पुन्हा कसे निवडून आले हा एक संशोधनाचा आणि वादाचा मुद्दा देखील आहे. 
पण मुद्दा आर्थिक विषयापुरता मर्यादित ठेवूया. 
देशातील जनतेचे उत्पन्न गेल्या ६ वर्षांत वाढणे अपेक्षित होते ते कमी झाले आहे. 
पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमतीवर वाढ करून सरकारला तात्कालीक उत्पन्न मिळत आहे खरे. पण देशाला एका भयानक आर्थिक संकटाच्या दिशेने अगोदरच सध्याच्या सरकारने ढकलून दिलेले आहे. 
वाढत्या इंधन भावा मुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढणार आहेत. आणि जनतेचे उत्पन्न कमी झालेले आहे.
अशा परिस्थितीत बाजारात लोक आवश्यक वस्तूंवर च पैसा खर्च करत आहेत. अशा परिस्थितीत देशाचे आर्थिक चक्र संथ झालेले आहे. जवळपास थांबलेले आहे. त्यामुळेच लोक कोणत्याही नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी हात आखडता घेत आहेत. 
बाजारात मागणी नसेल तर लाखो उद्योग आणि करोडो लोकांचे उत्पन्न होणार नाही. ते उत्पन्नच नसेल तर बाजारात गती येणार नाही. देशाचे आर्थिक चक्र वेगवान झाले नाही तर देशाचा आर्थिक विकास कसा होणार ?
त्यात सरकारने अजून एक चुकीची गोष्ट केली ते जानेवारीत भारतात करोना महामारी येऊ दिली. जी अडवणे सहज शक्य होते. आता या महामारी मुळे वस्तूंच्या किमती अवाच्या सव्वा झाल्या आहेत. जनतेला आतापर्यंत केलेली बचत आरोग्य या कारणासाठी अनावश्यक पणे खर्च करावी लागत आहे. हे सर्व अडवता आले असते. पण सध्याच्या सरकार मध्ये हे सर्व थांबवण्याची इच्छाशक्ती दिसत नाहीये. सध्याच्या सरकारला देशात सर्वत्र त्यांचे झेंडे फडकवण्यात जास्त रस आहे.
देशाचा जी डी पी शून्याच्या खाली अगोदरच गेला आहे. अशा परिस्थितीत भारताचा विकास पुढील ५ ते १० वर्षांत होणे केवळ अशक्य गोष्ट आहे. हीच गोष्ट जगभरातले तज्ज्ञ देखील सांगत आहेत की २०२२ पर्यंत भारताने परिस्थिती आटोक्यात आणली नाही तर भारतात एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आपण आहोत. सरकारने राजकारण करायचे तर करावे पण स्वतःच्याच जनतेच्या खिशावर दरोडे टाकून देशाचा विकास होणार नाही. हेही सरकारने लक्षात घेतले पाहिजे. सध्याच्या सरकारने केवळ आर्थिक पॅकेज च्या घोषणा करण्यापेक्षा देशाचे अर्थ चक्र चालवणाऱ्या वर्गाचे उत्पन्न वाढवण्यासाठी तत्काळ पावले उचलली पाहिजेत. तरच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. अमेरिका सारखा देश १०० बिलियन डॉलर्स फक्त देशाच्या जनतेच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी निधी उपलब्ध करून ठेवतो आहे. पण आपल्या सरकारने केवळ ५०० रुपये महिन्याला एवढेच पॅकेज तेही अत्यंत मर्यादित लोकांना (देशाच्या १०% पेक्षा कमी नागरिकांना) दिले आहे. ते सुद्धा हा पैसा कोणाला मिळाला कोणाला नाही याची स्पष्टता नाहीये. 
एकूण देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी देशाला एक कुशल अर्थतज्ज्ञा ची गरज आहे. आणि ते उपाय अमलात आणण्याची सरकारची इच्छाशक्ती सुद्धा हवी. अन्यथा आपण काळाच्या मागे जातो आहोत. सरकारला हे धोके माहिती आहेत. पण त्यासाठी सरकार काय करते ते बघत बसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. अपेक्षा मात्र करू शकतो की सरकार वेळीच चुका सुधारेल.