दिनविशेष २ ऑगस्ट :
आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात.
१. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलतज्ज्ञ व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. ( १९३०) यांनी गणिताच्या आधारे प्लुटो ग्रहाचा शोध लावला. आणि त्याचे महत्त्व तत्कालीन विद्वानांना पटवूनही दिले. पण अर्थातच भारतीय ज्योतिष पाश्चात्य विद्वान कायमच दुर्लक्षित करत आले आहेत त्यामुळे प्लुटोचा शोध लावण्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही. खगोलशास्त्राच्या इतिहासात व्यंकटेश बापूजी केतकर यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात तरी सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. ग्रहगणित या ग्रंथाचे कर्ते
२. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखाराम बापू बोकील यांचे निधन. ( १७८१ )
३. मुंबईतील ईस्ट इंडिया कंपनी बंद करुन व्हिक्टोरिया राणीने भारताच्या सत्तेची सूत्रे स्वत:कडे घेतली. (१८५८)
४. मराठी थोर साहित्यिक पु. शि. रेगे यांचा जन्म. (१९१०) - यांच्या भावकविता खूप प्रसिद्ध होत्या
५. प्रसिध्द गीतकार आणि शायर शकील बदायुनी यांचा जन्म. त्यांची 'दर्द', 'मदर ईडिया', ';उडन खटोला' , 'मेरे मेहबूब' वगैरे चित्रपटांतील गाणी कमालीची गाजलेली आहेत . (१९१६)
६. नगर जिल्हयातील डॉ. आरोळे पती-पत्नींना मेगॅसेसे अॅर्वॉड जाहिर. (१९७९) यांच्या कार्याची माहिती या दुव्यावर मिळेल
No comments:
Post a Comment