Saturday, September 8, 2012

भारतीय अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र


सुप्रसिद्ध लेखक श्री. संजय सोनवणी यांनी फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवर येथे एक आगळ्या वेगळ्या खालून वर जाणार्‍या अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडलेली आहे. त्या अनुषंगाने मी मांडलेले काही विचार

संजय सर अतिशय उत्तम मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. खालून वर जाणार्‍या अर्थव्यवस्थेची पाळे-मुळेदेखील घट्टच असतील. मला येथे काही मुद्दे सुचवावेसे वाटतात ते असे १. किमान वेतनश्रेणी ठरलेली असावी. पण ती अशी असावी की त्यात प्रत्येक व्यक्तीला कष्टाच्या साहाय्याने पुढे प्रगती करण्याची समान संधी उपलब्ध असावी. २. करदत्यांसाठी किमान मोबदला प्रकार असावा. म्हणजे अचानक काही कारणास्तव एखाद्याची नोकरी गेली तर पैशाच्या अडचणीमुळे त्याने आत्महत्या करण्या सारखा मार्ग स्वीकारायला लागू नये विदेशांत सलग ५ वर्षे टॅक्स देणार्‍यांना अचानक बेरोजगार व्हावे लागले तर न सांगता न मागता सरकार त्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम जमा करते, ज्यातून त्या व्यक्तीचे कर्जांचे हफ्ते फेडले जाऊ शकतात व जगण्यासाठी किमान अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेपुरते) आवश्यक पैसा मिळतो. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने सर्व क्षेत्रांत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी जी भविष्यनिर्वाह निधीची व्यवस्था केली आहे ती एवढी तकलादू आहे की त्या रकमेचा रिटायरमेंटच्या वेळी काडीचाही उपयोग होत नाही. महागाई ज्या वेगाने वाढते आहे त्या वेगाने बाकीच्या गोष्टी पण बॅलन्स व्हायला हव्यात.

उदाहरणार्थः महागाई (सरकारी आकडे काहीही म्हणोत पण) आत्तापर्यंत ८०० ते १००० पटींनी वाढली आहे. पण भांडवलदारांनी श्रमिकांची पिळवणूक करत पगारातली वाढ मंदीच्या नावाखाली केवळ १ ते ५ टक्केच केलेली आहे. फार तर १०% असेल. सध्या खाजगी क्षेत्रांतून कष्ट करणारे कर्मचारी सध्या फक्त मनी-मशिनचे काम देशासाठी करत आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की देशातला सर्वात जास्त इन्कम टॅक्स हा खाजगी क्षेत्रांतून येत असूनही सरकारने याबाबत अतिशय उदासीन धोरण स्वीकारलेले आहे. म्हणजे फक्त ओरबाडायचे. त्या ओरबाडण्याने सर्व-सामान्यांच्या आतड्यावर किती ओरखडे उमटले? याचा विचारदेखील सरकार करत नाही. अशी परिस्थिती दुर्दैवाने आहे. त्यांना स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही पगारातली ८०% रक्कम कर्जाचे हफ्ते फेडण्यापायी जाते. उरलेल्या २०% रकमेत घरखर्च कसा निघेल?
कर्जाचे डोंगर सर्वसामान्याच्या डोक्यावर मणा-मणाच्या ओझ्याने वाढत आहेत, हा असंतोषाचा स्फोट जेव्हा होईल तेव्हा जागृती येण्याचा काळ आणि वेळ हातातून निघून गेलेली असेल व आपण पुन्हा गुलामीकडे वाटचाल केलेली असेल. भविष्यकाळातील येत्या ५ ते १० वर्षांत सरकारने सर्वसामान्यांच्या हातात पैशाची मुबलकता उपलब्ध करुन दिली नाही तर भारतीय अर्थव्यवस्था एवढी जोरात कोसळेल की त्यातून सावरणे मी मी म्हणवल्या जाणार्‍या अर्थतज्ज्ञांना कालत्रयीही शक्य होणार नाही. जशा भारतीय कंपन्या विदेशी कंपन्या टेक-ओव्हर करतात त्याप्रमाणे एखादा श्रीमंत देश भारताची अर्थव्यवस्था टेकओव्हर करेन. त्यानंतर आपल्यापुढे आयुष्य म्हणून जगण्याचा पर्यायच शिल्लक असणार नाही एवढे हे भीषण चित्र आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे असे धिंडवडे भविष्यकाळात निघतील की २०२० च्या उज्ज्वल भारताचे स्वप्न विकणार्‍या लोकांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आहे, जोर जबरदस्ती आहे. आपल्या देशात लोकशाही नावालाच आहे. सरकार विरोधी जाणार्‍या सर्वांची वाट लावण्यात येते हे लोकशाहीचे लक्षण आहे? प्रामाणिकपणे काम करणारे खूप जण आहेत, पण कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचणार्‍यांचेच राज्य भारतावर आहे. तूर्तास एवढे पुरे. पण जाता-जाता काही प्रश्न. मोलमजुरी करुन वर्षानुवर्षे पोट भरणार्‍यांनी मरेपर्यंत फूटपाथवरच झोपायचे का? भीक मागत उदरनिर्वाह करणार्‍यांनी बेवारस म्हणूनच मरायचे का? स्वत:चे हक्काचे घर असावे , बायकोच्या व मुलांच्या चेहर्‍यावर स्वतःच्या घरात रहात असल्याचे समाधान देणार्‍या सर्व-सामान्य व्यक्तीने त्या घराच्या कर्जाचा बोझा घेऊनच मरायचे का?
अत्यंत मानसिक तणावाखाली खाजगी क्षेत्रात काम करणारा हा नोकरपेशी वर्ग भर तारुण्यातच हृदयविकार, ब्लडप्रेशर, मधुमेह अशा दुर्धर व्याधींच्या तडाख्यात सापडतो आहे, ही सरकारला चिंतेची बाब वाटत नाही का?

Wednesday, August 1, 2012

भ्याडांनो हा घ्या वाघ्याच्या अस्तित्त्वाचा प्रत्यक्ष छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळातलाच पुरावा


वाघ्याचे अस्तित्त्व नाकारणार्‍या भ्याडांनो हा घ्या वाघ्याच्या अस्तित्त्वाचा प्रत्यक्ष छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळातलाच पुरावा. एक बहुमोल ऐतिहासिक ठेवा नष्ट केल्याचा तीव्र निषेध. :


लेखक : संजय सोनवणी

Source : http://sanjaysonawani.blogspot.in/2011/05/blog-post_9325.html

इ.स.१६७८ साली शिवाजी महाराजांनी दक्षीण दिग्विजय केला, परततांना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गढीला वेढा घातला होता. हे काम त्यांनी सखोजी गायकवाड या आपल्या सरदारावर सोपवले होते. बेलवडीचा ठाणेदार येसाजी प्रभु देसाई मारला गेला. तथापि त्याची पत्नी मल्लाबाई हिने लढाई सुरुच ठेवली. तिने पुढे शिवरायांसोबत तह केला. शिवरायांनी तिचे राज्य तिला परत दिले आणि तिला सावित्रीबाई या किताबाने गौरवले. शिवरायांच्या या ऐतिहासिक घटनेची आठवण कायम स्वरुपी कोरून ठेवण्यासाठी सावित्रीबाईने अनेक गावांच्या दरवाज्यांत व मंदिरांसमोर शिवरायांची पाषाणशिल्पे उभी केली. त्यातील एक शिल्प धारवाडच्या उत्तरेस असलेल्या यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षीनाभिमुख देवळाच्या पस्चिमेस असून त्याची उंची ३ फुट व रुंदी अडीच फुट आहे. शिल्पाचे दोन भाग असून खालच्या भागात शिवरायांनी मांडीवर बसवले आहे. शिल्पाच्या वरच्या भागात घोड्यावर स्वार असलेली शिवरायांची प्रतिमा आहे. या शिल्पात शिवरायांसोबत चाललेला एक कुत्रा दाखवला आहे. हे शिल्प शिवरायांच्याच हयातीत बनवले असल्याने शिवरायांच्या जीवनात कुत्रानव्हता हे म्हनने निराधार ठरते. एवढेच नव्हे तर शिवरायांच्या कुत्र्याची महती त्यांच्या हयातीतच कर्नाटकापर्यंत पोहोचली होती हे यावरून सिद्ध होते.

२. छत्रपती शिवरायांचे नातू शाहु महाराज (सातारा) यांच्या संगम माहुली येथील त्यांच्या खंड्या या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे आणि ती जवळपास शिवरायांच्या वाघ्या सारखीच आहे. आणि हे स्मारक शिवरायांच्या निधनानंतरच सुमारे ४०-ते ५० वर्षांनी बनवले गेले होते. याचाच अर्थ असा होतो कि तत्कालीन सुस्थीतीत असलेल्या वाघ्या स्मारकाचीच प्रेरणा या स्मारकामागे असावी. खंड्याने एकदा शाहु महाराजांचे प्राण वाचवले होते याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रांत आहे. यावरुन असे अनुमान निघते कि रायगडावरील वाघ्याचे स्मारक हे शाहु महाराजांच्या खंड्याचे स्मारक बनण्याची प्रेरणा ठरले आणि कालौघात नश्ट झालेल्या वाघ्याचे स्मारक बनायला शाहूंचा खंड्याचे स्मारक प्रेरणादायी ठरले. याचाच दुसरा अर्थ असा कि कुत्रयाचे स्थान शिवेतिहासात जेवढे महत्वाचे आहे तेवढेच त्यांच्याही वंशजांत होते.

याचाच अर्थ असा आहे कि प्रस्तूत वाद हा शिवरायांना, होळकरांना आणि तमाम मराठी मानसांना फसवण्याचा आणि आपले पोट जाळण्याचा धंदा आहे. वाघ्या इतिहासात होता. शाहू महाराजांचा खंड्याही इतिहासात होता. वाघ्या आणि खंड्या हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचीच रुपे आहेत. कर्नाटकातील शिल्प तर शिवरायांच्याच हयातीतील आहे...तेथे गडकरींचा संबंध कोठे येतो? गदकरींच्या "राजसन्यास"च्या ही आधी चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकातही (१९०५)वाघ्याचा उल्लेख यावा याला योगायोग म्हणता येत नाही. याचाच अर्थ असा निघतो कि वाघ्या हे शिवजीवनातील एक अविभाज्य असे पात्र होते आणि त्याचा यथोचित सन्मान राखला गेला पाहिजे.
लेख संशोधन : श्री. संजय सोनवणी

हा पुरावा खोटा आहे हे सिद्ध करायची हिम्मत तरी दाखवायची होती या नामर्दांनी. ही पाठीत खंजिर खुपसण्याची अतिरेकी वृत्ती एक दिवस समस्त मराठा समाजाला त्याची फळे भोगायला लावील हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
मराठा समाजातील विचारवंतांनी ब्रिगेडसारख्या अतिरेकी वृत्तीला पायबंद घालण्यासाठी पुढे आले पाहिजे. अन्यथा बहुजनांत वेदनेची आग पेटली की त्यात किती निरपराध होरपळले जातील याचा सर्वांनीच डोके थंड ठेवून सामाजिक ऐक्याच्या भावनेतून विचार केला पाहिजे.
वाघ्याचे स्मारक सुरक्षा असतानाही नष्ट केल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचा निषेध. अशा संघटनेवर सरकारने बंदी आणण्याची कारवाई केली पाहिजे. ब्रिगेडचे जे ७ सदस्य पकडले गेले आहेत त्यांना या कृत्याची फळे भोगावी लागतीलच. पण अशा समाजात फूट पाडण्याच्या कारवाया करण्यापेक्षा बहुजन समाजाच्या हातात हात मिळवून ऐक्य भावनेतून सत्य शोधले तर अवघा बहुजन समाज तुमच्या बरोबर उभा राहिला असता तुम्ही सांगता तोच खरा इतिहास ही अरेरावी खपवून घेण्याइतका आजचा बहुजन समाज लेचापेचा नाहीये याचे तरी किमान अशा विध्वसंकांनी भान ठेवले पाहिजे होते. या घटनेचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झालेली आहेच. पण लवकरच तुमच्या अस्तित्वावर या गोष्टी कशा परिणाम करतील याचीही तयारी ठेवा. वाघ्याच्या समाधीवर भ्याड हल्ला करुन ती नष्ट केल्याबद्दल तीव्र निषेध.

Monday, July 9, 2012

सगळे शेतकरी मरायची आपण वाट बघतो आहोत का?

आजच दै. सकाळ मध्ये अपंग शेतकर्‍याच्या आत्महत्येची ही एक बातमी वाचली. कान्हेरी गवळी या छोट्याश्या गावातील अपंग शेतकऱ्याची आत्महत्या

फक्त अठरा हजार पाचशे रुपयांच्या कर्जासाठी लाखमोलाचा शेतकरी गेला. त्यातही हा शेतकरी अपंग होता. अपंग शेतकर्‍यांना कर्जात एवढ्या छोट्या रकमेसाठी सरकार काही करु शकत नाही का? किमान अशी काही धोरणात्मक अंमलबजावणी झाली तर अशा शेतकर्‍यांचे निरर्थक जाणारे प्राण तरी वाचतील. एकेक शेतकरी असा कमी झाला तर खायचे काय हा भीषण प्रश्न एक दिवस नक्की येईल. समाजाचे नेतृत्त्व करणार्‍यांनी या मूलभूत गोष्टींकडे काणाडोळा करु नये असे मनापासून वाटते... यासाठी प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या देणगीचा फायदा कोणत्या शेतकर्‍याला झाला आहे व त्या शेतकर्‍याचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक देणगी देणार्‍या प्रत्येकाला कळेल अशी व्यवस्था निर्माण केली गेली तर माझी खात्री आहे की देणगीदार स्वतःहून पुढे येतीलच पण सढळ हाताने मदतही करतील

अपण स्वतःला सुशिक्षित म्हणवतो. कुठे चाललो आहोत आज आपण? एकीकडे आपण डिस्को, दारु, पार्टी, दागदागिने, भरमसाठ कपडे, बुटं यांच्यावर हजारो रुपये उधळतो. आपण कमावतो व त्या नैतिक अधिकाराने चैन करण्याचा हक्क आहे की आपल्याला. चैनही केलीच पाहिजे. नाही असे नाही. पण कुठपर्यंत? आपल्या पैकी काही लोकांच्या ४-५ दिवसांच्या खर्चाएवढी रक्कम आपल्याला अन्न पुरवठा करणार्‍या एका शेतकर्‍याचा जीव जाण्यासाठी कारणीभूत होणार असेल तर नक्कीच विचार करण्याची वेळ संपलेली आहे. आता कृतीची वेळ आलेली आहे. समाजाचे नेतृत्त्व करणार्‍या सर्वच जणांनी, राजकारणी, नेते, समाजसेवी संस्था, नगरसेवक, आमदार, खासदार, तुम्ही आम्ही सर्वांनीच सखोल आत्मपरिक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. झाडे वाचवा... प्राणी वाचवा... अशा ढीगाने उपलब्ध असणार्‍या समाजसेवी संस्थांनी अशा मूलभूत प्रश्नांवर एकत्र येण्याची गरज आहे. आधी माणूस वाचवा मग झाडे आणि इतर प्राण्यांचे बघता येईल. उद्या खायला अन्न मिळाले नाही तर ही समाजसेवा करण्यासाठी उभे तरी रहाल का तुम्ही? शेतकरी रिलिफ फंड असा एक तरी फंड आहे का? त्यातून देणग्या घ्या आणि अशा गरजूंना मदत करा. किमान त्या बिचार्‍यांचे जीव तरी वाचतील. पैसे कमावण्याच्या नित्य नव्या कल्पनांच्या शोधात असणार्‍या काही जणांना ही कल्पना म्हणजे एक सुवर्णसंधी वाटेल. पण इथे हजारो गरजूंच्या प्राणांचा प्रश्न आहे. त्यांच्यावर अवलंबून राहणार्‍या कुटुंबाचा प्रश्न आहे. इथेतरी सडकेपणा आणू नका.

मी एक चित्रपट पाहिला होता. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' - मकरंद अनासपुरेने या चित्रपटात अगदी जिवंत भूमिका केली आहे. अभिनय हा शब्द न वापरता येथे मी भूमिका हा शब्द हेतुतः वापरलाय हे लक्षात घ्यावे. कारण हा मकरंद अनासपुरे त्याच भागातून आलेला आहे. त्याला या प्रश्नाची अतिशय योग्य जाणीव होती, त्यामुळेच या चित्रपटात त्याने जे अनुभवले वा पाहिले तीच भूमिका साकारली आहे. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या ज्वलंत प्रश्नावर अगदी मनाला त्याची धग पोहोचेल अशा ताकदीचा हा चित्रपट आहे. या चित्रपटातले एकच वाक्य तुम्हाला सांगतो म्हणजे वस्तुस्थितीची कल्पना येईल. जिवंत माणसाला पेरणीसाठी काही हजार रुपये मिळत नाही आणि मेल्यावर मात्र १ लाख रुपये मिळतात. तेच पैसे सगळ्या शेतकर्‍यांना वेळच्या वेळी दिले तर कशाला शेतकरी कर्जबाजारी होईल? तुमच्या आमच्यासारख्या शहरातल्या लोकांना साधी २ तास लाईट गेली की अरे बापरे आता काय होणार हा प्रश्न पडतो. विचार करा शेती हा ज्यांचा प्राण आहे त्या शेतकर्‍यांच्या गावागावांतून १२-१२ ते १६-१६ तास लोड शेडिंग असते. पाणी मोटारने खेचायला रात्री अडीच तीन च्या पुढे वीज येते. अशा विपरित परिस्थितीत आपण एक दिवस तरी राहू शकू काय? माझे हे विचार वाचून कोणी खरा समाजहितैषी जागा झाला तर मला आनंदच आहे. पण मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांसाठी काही करता येणार असेल तर सोबत येणार्‍या प्रत्येक हातामागे शेतकर्‍यांचे लाखो आशिर्वाद असतील .

जाता जाता एकच सांगतो. महाराष्ट्र हा शेतकर्‍यांच्या सर्वात जास्त आत्महत्या होणारे राज्य आहे. मुख्य म्हणजे शेतीच्या पार्श्वभूमीतून वर आलेले मोठे मोठे नेते देखील या देशात महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणार्‍या शेतकर्‍यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन पैसा कमावण्याकडेच लक्ष देतात. प्रश्न खूप गंभीर होत चाललेला आहे. वेळीच शेतकरी आणि शेती वाचवली नाही तर अन्नासाठी दुसर्‍यांकडे हात पसरायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

दैनिक सकाळला धन्यवाद की अशा बातम्यांना त्यांच्या संकेतस्थळावर पहिल्या पानावर स्थान देत आहेत. किमान अशा घटनांच्या माहितीमुळे तरी समाज जागा करण्याचे काम सकाळ करत आहे. आज मला या बातमीने लिहायला प्रेरित केले उद्या लाखो हात शेतकर्‍यांच्या मदतीसाठी उभे राहतील

धन्यवाद,
सागर भंडारे
बंगलोर

Sunday, July 1, 2012

सर्वात सुंदर 'शुभम् करोति'

आज कित्येक महिन्यांनंतर माझ्याजवळचा गाण्यांचा संग्रह चाळत होतो. त्यातच एका गाण्याच्या शीर्षकाने माझे लक्ष वेधून घेतले. "शुभम् करोति कल्याणम् , आरोग्यम् धनसंपदा".
बालवाडीच्या शाळेत जात असल्यापासून शुभम् करोति शिकवले व पाठांतर करुन घेतले जात होते. ते सहजच आठवले. म्हटले ऐकून पाहूया ही ध्वनिफीत.
या आधीपण ऐकलेली होती. पण आज हे शुभम् करोति ऐकताना मन अगदी प्रसन्न झाले. आजपर्यंत मी शुभम् करोति च्या कित्येक वेगवेगळ्या आवाजात व चालीच्या ध्वनिफीती ऐकलेल्या आहेत. पण या शुभम् करोति ची नजाकत काही वेगळीच होती. पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत डोळे मिटून ही 'शुभम् करोति'ची ध्वनीफीत ऐकताना चित्त स्थिर होत होते. व पुन्हापुन्हा ऐकावे असे वाटत होते. त्याप्रमाणे मी ही 'शुभम् करोति' किमान ४ वेळा तरी ऐकली.

जुन्या काळातील गायिका आहे. दुर्दैवाने माझ्याकडे या गायिकेची माहिती उपलब्ध नाहिये. पण आवाज अगदी परिचयाचा आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कित्येकांना लगेच लक्षात येईल.

एवढे सुंदर 'शुभम् करोति' वाचकांबरोबर वाटून घ्यायची इच्छा झाली म्हणून ब्लॉगवर टाकतो आहे.

संगीत रसिकांसाठी 'शुभम् करोति' चा हा दुवा :

https://dl.dropboxusercontent.com/u/75853279/MARATHI_SONGS/OLD/Shubham%20Karoti%20Kalyanam.MP3
किंवा
https://www.dropbox.com/home/Public/MARATHI_SONGS/OLD

हे 'शुभम् करोति' ऐकून झाले की नक्की सांगा कसे वाटले ते.

धन्यवाद,
सागर.

Tuesday, May 15, 2012

चीन

चीनबरोबरच्या आपल्या तंट्याचा शेवट कसा होईल? या सुधीर काळे यांच्या या ब्लॉगवरील लेखाच्या अनुषंगाने जो वैचारिक संवाद झाला त्यात मी मांडलेली मते :


हिएतनाम आपल्याबरोबर ठामपणे उभा राहील कीं बलवान शत्रूपुढे नांगी टाकून पळ काढेल?

चीन या समुद्राच्या खूपच मोठ्या भागावर सार्वभौमत्वाचा दावा करतो पण अलीकडे या समुद्रावर चीनसारखाच व्हिएतनामही दावा करू लागला आहे.

सुधीर काका वरील २ मुद्द्यांबाबत थोडेसे मत-

१.
व्हिएतनाम हा नांगी टाकून पळ काढणारा देश नाहिये हे इतिहासातून सिद्ध झालेले आहेच. प्रदीर्घ काळ चाललेल्या व्हिएतनाम युद्धात अमेरिकेची जगापुढे चांगलीच नाचक्की झालेली आहे. असे असले तरी सध्याच्या व्हिएतनामी शासनव्यवस्थेत अमेरिकेचे हितसंबंध गुंतलेले आहेच. भारत हा स्वावलंबी व समर्थ देश असला तरी आक्रमण ही त्याची संस्कृती नाहिये हे देखील जगाला माहिती आहे. एव्हाना चीनने पाकीस्तानला गुदगुल्या करायला सुरुवात केली असल्यामुळे आपल्या ऐन वेळी दगा देण्याच्या प्रवृत्तीच्या पाकीस्तानने उघड उघड अमेरिकेला झटकून टाकायला सुरुवात केली आहे. अमेरिकेवर आर्थिक मदतीवर अवलंबून असणार्‍या पाकीस्तानकरिता अमेरिकेचे महत्त्व आता संपत आले आहे. त्यामुळे अमेरिकेने मदत बंद केली तरी चीनसारखा शक्तीशाली देश उघडपणे पाकीस्तानच्या बाजूने जातो आहे. अमेरिकेला शह देण्याचा हा चीनचा प्रयत्न यशस्वी झाल्यात जमा आहे.

पाकीस्तान आणि चीन या दोघा राष्ट्रांतील कुटील संस्थांमध्ये असा करार झालेला असण्याची देखील शक्यता आहे की पाकीस्तानला काश्मीर मिळवून देण्यात चीनने मदत करावी आणि पाकीस्तानने भारताला अस्थिर करण्याची भूमिका अधिक कार्यक्षमतेने बजावावी. उद्या युद्ध सदृश परिस्थिती (जी चीन पुढे निर्माण करणारच आहे) उद्भवलीच तर चीनला थेट आखाती देशांतून पाकीस्तानमार्गे तेलाचा हवा तितका साठा मुबलक प्रमाणात मिळवता येणार आहे. अलिकडेच चीनने पाकीस्तानच्या एका बंदरापर्यंत थेट रेल्वेमार्गाने जोडणी केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून चीनने आंतरराष्ट्रीय बाजारांतून तेलाची खूप मोठ्या आणि वाढत्या प्रमाणावर खरेदी केलेली आहे. चीनने अलिकडेच पाठवलेले अवकाशस्थानक हा देखील या योजनेचा भाग आहे. अंतराळातून थेट भारतावर नुसता डोळाच ठेवण्यापेक्षा चीनच्या हद्दीत भारतीय वायुसेनेला वा सैन्यातील कोणत्याही दलाला प्रवेश करण्यापासून सहज रोखता येणार आहे. चीनने स्वतःच्या या अंतराळस्थानकांतून अण्वस्त्रे भारतावर रोखली तर भारताची काय तयारी आहे?

चीनचे म्हणाल तर चीन अगदी आजही युद्धाला पूर्ण तयार आहे. भारताची ही तयारी आहे काय? तर त्याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. भारताच्या राजकारण्यांना पंचवार्षिक योजनांमध्ये काम करण्यातच धन्यता लाभते त्यामुळे अगदी मोक्याची ठिकाणे देखील आज आपण हवी तेवढी सुरक्षित नाही करु शकलेलो. वर्तमानपत्रांतून योजना २०२० , २०२५ अशी वर्षे गृहीत धरुन जाहीर झालेल्या वाचावयास मिळतात. भारताला समुद्रातील बेटांची सुंदर देणगी लाभलेली आहे. अंदमान निकोबार बेटांवर हवाई तळ असला तरी त्याचे सामर्थ्य चीनच्या बलाढ्य वायुदलाच्या तुलनेत किरकोळच आहे. इतिहासात आपण चीनला दणके दिले असले तरी इतिहासात रमून चालणार नाही. चीनचे सध्याचे धोरण पाहता अतिशय संथपणे आपल्या सावजाभोवती जाळे विणून त्याला गिळंकृत करण्याची प्रवृत्ती वाढीला लागली आहे. तिबेट हे उत्तम उदाहरण आहे. पन्नास हजार तिबेटींना भारतात आश्रय दिल्यानंतर तिबेट हा चीनचा सार्वभौम भाग आहे हे भारताने मान्य करणे यातच आजच्या राजकारण्यांचा षंढपणा दिसून येतो. ज्यांनी भ्रष्टाचाराने देशाला विकायला काढले आहे अशा सत्ताधारी नेत्यांकडून देशाच्या सुरक्षेबद्दल गंभीरपणे कार्यवाही करण्याची अपेक्षा सामान्य जनतेने करणे हेच चुकीचे आहे.
थोडे विषयांतर झाले पण हा मुद्दा कळीचा व महत्त्वाचा आहे.

२.
राहिले "चीन या समुद्राच्या खूपच मोठ्या भागावर सार्वभौमत्वाचा दावा" बद्दल तर ते चीन फक्त स्वतःच्या लष्करी व आर्थिक शक्तीच्या जोरावर करतो आहे. त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने व शेजारी राष्ट्रांनीही भीक घालण्याची गरज नाही. कारण सुधीर काकांनी दिलेला नकाशा बघूनच कळते की चीनपेक्षा अधिक हक्क कोणत्या राष्ट्रांचा आहे ते हास्य


नकाशामुळे चीनचे विनाकारण चाललेले आकांडतांडव सहजच ध्यानात येते. खूप सोप्या पद्धतीचे नकाशे तुम्ही दिले आहेत. आणि शिवाय ओएनजीसी व तत्सम भारतीय कंपन्यांनी ज्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आहे त्याचा तर चीनशी दूरान्वयानेही संबंध दिसत नाहिये.

शेर पंतप्रधानाच्या बाबतीत तुम्ही म्हणता ते खरे आहे.
दुर्दैवाने भारताकडे आज असे सक्षम नेतृत्त्व नाहिये.
नरेन्द्र मोदी यांनी चीनला भेट देण्याचे कारण वेगळेही असू शकते.
कदाचित चीनने एवढी प्रगती कशी केली?, स्वस्तात उद्योगधंदे कसे निर्माण केले? ज्या मॉडेलचा वापर मोदींना भविष्यात करता येऊ शकेल. वस्तुस्थिती माहित नसताना हे इमॅजिनेशन करण्यात अर्थ नाही. हास्य
सध्याच्या राजकारणात मोदीच भारताला बलवान नेतृत्त्व देण्यास थोडे फार सक्षम दिसत आहेत. इतर नेत्यांमध्ये तेवढा दम नाहिये. युद्धसद्दृश परिस्थिती आली की शेपूट घालतील हे सगळे नेते.

चीनशी कोणत्याही प्रकारचे संबंध चीनचा विस्तारवादी दॄष्टीकोन बदलत नाही तोपर्यंत घातकच आहे.
परवाच्याच सकाळ मध्ये बातमी होती की चीन आणि भारत एकत्र रित्या युद्ध अभ्यास करणार आहेत.

आता याला कोणता करंटेपणा म्हणायचा? एकत्र युद्धाभ्यास करुन आपल्या क्षमतेची, युद्धकौशल्याची आणि युद्धमर्यादांची प्रत्यक्ष शत्रूला माहिती पुरवायची. बर हा युद्ध अभ्यास चीनमध्ये झाला असता तर आपण थोडे तरी म्हणू शकतो की भविष्यकालीन युद्धात त्याचा उपयोग होईल. पण भारतातच हा युद्धाभ्यास करण्याचे औचित्य काय? याचे कारण हा कार्यक्रम ठरवणारे कूटनितीतज्ज्ञ देऊ शकतील काय?


या भांडवलशाहीवाद्यांना चीन कधी भीक घालणार नाही. पण थोडा इथे धोका आहे. चीन स्वावलंबी होईल ते आपल्याच फायद्याचे होईल असे मात्र मला वाटत नाही. का त्याचे कारणही सांगतो. चीनचे वैचारिक धोरण पाहिले तर आस्ते आस्ते तो आपली शक्ती वाढवत होता. शक्ती वाढल्यावर चीनने त्याचे पंख पसरवायला सुरुवात केली आहे. हाँगकाँग ताब्यात घेताना केलेल्या दर्पोक्ती आठवत असतीलच. त्यानंतरचे ताजे उदाहरण तिबेट गिळंकॄत केला. आपल्या करंट्या राजकारण्यांनी तिबेटच्या खुनाला जाहीर मान्यता दिली. अगदी १०० % नसले तरी ९५% तिबेटवासी तरी चीनच्या विरोधातच होते. आजही त्यांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरु दलाई लामा स्वतःच्या देशात पाय ठेवू शकत नाही.

पुढचा मुद्दा चीनने घेतला आहे तो तैवानचा तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे आणि त्याने चीनमध्ये सामील व्हावे यासाठी चीनने प्रचंड दबाव टाकला होता. पण तैवान अजूनही चीनच्या विरोधातच उभा आहे. अलिकडेच अमेरिकेने तैवानला प्रचंड मोठ्या प्रमाणावर शस्त्रे विकली त्यावर चीनने प्रचंड विरोध केला होता. कारण अमेरिकेच्या या कूटधोरणामुळे तैवान गिळण्याचे चीनचे मनसुबे लांबणीवर पडले.

तैवान मोहीम थंड पडल्यावर चीनने व्हिएतनाम मोर्चा उघडला आहे.

भारत अजूनही अक्साई चीन मुक्त करु शकला नाही.

जास्तीत जास्त जमीन बळकावणे हा ज्या देशाचा प्राथमिक हेतू आहे त्या देशाकडून भारताला धोका नाही , ते ही भारत हे शेजारी राष्ट्र असल्यामुळे, हे अजिबात शक्य वाटत नाही.

तवांग, अरुणाचल प्रदेश हे आमचेच आहेत हे चीनने आधीही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
आता तर अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांचेच चीन ब्रेनवॉशिंग करतो आहे. ही बातमी वाचली की डोक्यात संताप आल्याशिवाय रहात नाही. तुम्ही मंगोलियन वंशाचे आहात त्यामुळे तुम्ही चीनीच आहात असे त्यांच्या मनावर बिंबवले जाते आहे. ही पावले शांततेच्या दॄष्टीने नक्कीच जात नाहियेत.

अर्थात चीनला भारताबरोबर युद्ध अजिबात परवडणारे नाहिये हे ही तितकेच खरे आहे. युद्धामुळे चीन कित्येक दशके पुन्हा मागे जाईन. भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध चीनपेक्षा जास्त विश्वासार्ह आहेत. तुम्ही म्हणता तसे मानवशक्तीची क्रयशक्ती ओळखून तिचा व्यवहारात उपयोग करणे' ही गोष्ट अजूनही भारताने युद्धपातळीवर अंमलात आणली तर येत्या ५-१० वर्षांत चीनला दहशत बसेल अशी वाटचाल आपण करु शकू. पण हे धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करणार्‍या थिंक टँकला कळायला हवे.
तसेच चीनचे इतरही आघाड्यांवर त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. झिन्जिआंग प्रांत चीनसाठी डोकेदुखी ठरतो आहे. तसेच देशांतर्गत विरोधही वाढतो आहे. पण चीन दडपशाहीच्या जोरावर हे सर्व नियंत्रित करतो आहे. जास्तीचे दुखणे चीनच्या महत्त्वाकांक्षांना पायबंध घालू शकेल.

युद्ध पेटल्यावर इतर देश आपल्या बाजूने लगेच उभे राहतील ही अपेक्षा करणेच मुळी चूक आहे.

कारण जगातल्या शक्तीशाली म्हणवल्या जाणार्‍या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या चीनच्या हातात आहेत.
उदा: एकट्या चीन ने स्वतः कडील सगळे अमेरिकेचे चलन विक्रीस काढले तर अमेरिकेच्या डॉलरची पत आंतरराष्ट्रीय बाजारात निम्म्याहून कमी होईल. याचा दुसरा अर्थ असा की अमेरिकन अर्थव्यवस्था पार कोसळून जाईल.
दुसरे असे की अमेरिका हा उत्पादन निर्माण करणारा देश कधीच नव्हता. तेव्हा अमेरिकेला रोज लागणार्‍या बहुसंख्य वस्तू चीनवरुनच तयार होऊन येतात. मालाचा हा पुरवठा चीन एकदम अडवू शकतो, तेव्हा अमेरिकेला केवळ लष्करी रुबाबवर भारताच्या बरोबर लगेच येता येणार नाही. हे चीन आणि अमेरिका दोघेही ओळखून आहेत. भारताचे खरे मित्र कोण? तर याचे उत्तर खूप अवघड आहे. ब्रिटन अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर आहे. तेव्हा तीही अपेक्षा करणे चुकीचे आहे. युरोपियन देश सध्या प्रचंड आर्थिक तंगीच्या तणावातून जात आहेत. तेव्हा युद्ध कोणत्याही देशाला उपयोगी पडणार नाहियेत.

याउलट चीनची गोष्ट आहे. पाकीस्तानला स्वतःचे दूध पाजून चीन ने मिंधे करुन ठेवले आहे. आणि आखाती देशांकडून पाकीस्तानमार्गे मदत मिळवण्याचा मार्गदेखील चीनने तयार ठेवला आहे. चीनला कोणा मित्र राष्ट्रांची गरजच नाहिये एवढा तो स्वयंपूर्ण आणि शक्तीशाली आहे.

त्यामुळे मानवतेच्या दॄष्टीकोनातून देखील कोणतेही राष्ट्र भारताच्या मदतीला लगेच येईल ही शक्यता मला तरी धूसर वाटते आहे. स्वतःचे घर उघडे करुन दुसर्‍याचे घर कोणी झाकायला जात नाही हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला न्यायच आहे. तेव्हा युद्ध झालेच तर ते स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवरच आपल्याला लढायला लागणार आहे.
चीनने भारताविरुद्ध युद्ध जाहीर केले की पाकीस्तानने आपले सैन्य लगेच काश्मीरमध्ये घुसवलेच समजा.

शेजारी राष्ट्रांशी शत्रूत्व भारताला केवळ आणि केवळ स्वतःच्या क्षमतेवरच लढून जिंकावे लागणार आहे. नाहीतर भारताच्या अस्तित्त्वालाच धोका निर्माण होऊ शकेल.

अर्थात युद्ध झालेच तर ते चीन दीर्घ काळ चालवेल असे मलाही नाही वाटत. अरुणाचल प्रदेश व जेवढ्या भूभागाची तहान चीनला आहे तेवढा भाग बळकावला की चीन (पुढील योजना निर्माण होईपर्यंत) थांबेल. कारण इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारताने जगाला आपल्या बौद्धीक संपदेने दिपवून टाकले आहेच. त्यामुळे भारताशी मोठे युद्ध कोणी करु लागले तर मात्र अमेरिका व युरोपियन देश मधे पडून समेट घडवतील. कारण भारताच्या मोठ्या युद्धामुळे या देशांना तंत्रज्ञान क्षेत्रात कित्येक दशके मागे जावे लागेल. ते कोणालाही परवडण्यासारखे नाहिये.


अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष : भाग - २

अमेरिकेने जर (इराक प्रमाणे)इराणही कब्जात घेतला तर तुर्कमेनिस्तानची भूमिका

अरब्-इस्राइल ह्या वादात रशिया आणि अमेरिका पन्नास वर्षापूर्वीच्या भूमिकेच्या विरुद्ध दिशेने जात आहेत.

या अनुषंगाने थोडी (कदाचित विरोधी) मते मांडू इच्छितो.


तुर्कमेनिस्तान हा इराणच्या तुलनेत अजिबात महत्त्वाचा नाहिये. अन्यथा इराणशी एवढे दबावतंत्र वापरण्याचे अमेरिकादि भांडवलशाही राष्ट्रांना काहीच कारण नव्हते. तेच दबावतंत्र तुर्कमेनिस्तानवर वापरणे त्यांना तुलनेने जास्त सोपे होते. आखातात इराण हा मध्यभागी असल्यामुळे तो भौगोलिकदॄष्ट्या, सामरिकदृष्ट्या, दळणवळणदृष्ट्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीदृष्ट्या तुर्कमेनिस्तानपेक्षा कैक पटींनी वरचढ आहे. त्यामुळे
पहिली गोष्ट ही की तुर्कमेनिस्तान ही इराणची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही.
दुसरी गोष्ट ही की क्षेत्रफळाच्या तुलनेत इराणचा जगात १८ वा तर तुर्कमेनिस्तानचा ५२वा क्रमांक लागतो. (लोकसंख्येत तुर्कमेनिस्तान ११८व्या क्रमांकाचा देश आहे)
तिसरे आणि अतिमहत्त्वाचे - तुर्कमेनिस्तानचे वार्षिक उत्पन्न ३५ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या आसपास आहे तर इराणचे वार्षिक उत्पन्न ७४७ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या आसपास आहे. या फरकावरुनच लक्षात येते की साधनसामग्रीच्या तुलनेत कोण जास्त समृद्ध आहे ते. तेव्हा तुर्कमेनिस्तान हे नवे सावज कोणाच्या पारड्यात झुकेल हा प्रश्न येथे कमी महत्त्वाचा आहे. इराण प्रकरणात मला महत्त्वाचाही वाटत नाही. कारण राजकारण ज्या मुद्द्यांवरुन खेळले जाते आहे त्यांच्या तुलनेत तुर्कमेनिस्तान फक्त प्यादं असलं तरी त्याची भूमिका फक्त उभे राहण्याची आहे. निकालावर परिणाम करण्याची क्षमता तुर्कमेनिस्तान मधे नाही.

इराण ताब्यात घेणं हे इराकएवढे सोपे नाहिये. इराक हा हुकुमशाही (एकहाती सत्ता केंद्रीत असलेला) देश होता. इराणची प्रतिमा आखातात अतिशय आदराची आहे. शेजारी राष्ट्रांशी इराणचे संबंध हा प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे जो अमेरिका विचारात घेते आहे असे मला वाटत नाही. आखातात नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनेच अमेरिकेच्या सर्व हालचाली सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर इराणचे शेजारी राष्ट्रांशी संबंध समजून घेतले पाहिजेत.

तुर्कमेनिस्तान (९०% मुस्लिम बाहुल्य),
अफगणिस्तान (अलिकडेच याने पाकीस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध असणे ही त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचे जाहीर केले आहे - हा ही इराणचा दबाव - कारण इराण आणि पाकीस्तान यांचे व्यापारिक दिसत असलेले संबंध आता एकमेकांच्या हितसंबंधांचे जास्त आहेत हे आता जगाला माहिती झालेले आहे.
पाकीस्तानः कट्टर इस्लामी राष्ट्र. कट्टरतावादाबरोबरच इराणच्या मुबलक तेलपुरवठ्यामुळे आणि चीनच्या मदतीसाठी केलेल्या मध्यस्थीमुळे, व अमेरिकेला वापरुन घेऊन झटकून टाकल्यामुळे इराणच्या गळ्यातील ताईत झालेले राष्ट्र.
बाकी सिरिया, लिबिया, सौदी अरेबिया इत्यादी राष्ट्रांचा इराणला छुपा पाठींबा आहेच. फक्त उघड उघड कोणाच्या विरोधात सौदी अरेबिया जायचे धारिष्ट्य करणार नाही. कारण तेल व्यापारावर अवलंबून असलेल्या या देशाला स्वतःचे अस्तित्त्व पणाला लावायची ताकद नाहिये.

आखाती राष्ट्रांचे अस्तित्त्व पणाला लागायची वेळ आलीच तर सर्व देश इराणच्याच बाजूने उभे राहतील.
कारण मुळात आखातात अमेरिकेचे वर्चस्व कोणालाच नको आहे.

येथेच रशिया प्रकाशझोतात येतो आहे. रशियाचा इतिहास पाहिला तर योग्य संधीची वाट पहात आपल्या कारवाया गुप्तपणे करण्यात ते तज्ज्ञ आहेत. पण सध्याच्या इराण प्रकरणात रशिया अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रसंगी आखाती राष्ट्रांना गुप्तपणे मदतही देतो आहेच आहे. कारण इराण प्रकरण अमेरिकेच्या बाजूने गेले तर रशियाच्या डोक्यावर अमेरिकेची टांगती तलवार अगदी उंबरठ्याच्या बाहेरच्या अंगणातच उभी असेल. त्यामुळेच अरब - इस्त्रायल वादात ५० वर्षांपूर्वीच्या विरुद्ध भूमिकेत रशिया जातो आहे असे एकंदरीत दिसत असले तरी ती वस्तुस्थिती नाहिये हे लक्षात ठेवावे. कोणतीही कृती रशिया करत नाहिये याचा अर्थ तो स्वस्थ बसून आहे असे अजिबात समजू नये. उलट रशियाचे प्रत्येक घटनेवर अतिशय बारकाईने लक्ष आहे.

इस्त्रायलचे अस्तित्त्व हे आखाती देशांसाठी अश्वत्थाम्याच्या कपाळावर कायम भळभळत असणार्‍या जखमेसारखे आहे. त्यामुळे इस्त्रायलचे अस्तित्त्व हे (इस्त्रायलचा युद्धाच्या खुमखुमीचा दृष्टीकोन आहे तोपर्यंत) आज ना उद्या संपणार हे नक्की. इराण प्रकरणाने युद्धाच्या दिशेने प्रयाण केले तर हे लवकरच बघायला मिळेल.

युद्धासाठी अमेरिका तयार आहे का? याचे उत्तर नाही असे आहे
आणि इराण? तर उत्तर होय असे आहे. कारण इराणकडे जमेच्या बाजू खूप आहेत त्या पाहूयात
- कित्येक अब्जांत असलेला अमेरिकन डॉलर्सचा कॅश रिझर्व
- देशांतर्गत उभारलेल्या स्वयंपूर्ण यंत्रणा (जगाशी संपर्क तुटला तरी इराण स्वतःच्या बळावर अन्न पुरवू शकतो)
- शेजारी देशांशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांचे तळ अमेरिकेला वापरु न देण्यास दबाव आणू शकतो. युद्धाच्या निर्णयाची आधी खात्री नसलेला कोणताही देश अमेरिकेच्या बाजूने न जाण्याचीच शक्यता खूप आहे. कारण भौगोलिक सीमा बदलणे हे कोणाच्याही हातात नसते, त्यामुळे भविष्याचा विचार करुन इराणचे सर्व शेजारी इराणच्याच बाजूने आहेत हे नक्की.
- अमेरिका व युरोपची बाजारपेठ बंद झाली तरी भारत व चीन हे खरेदीदार देश इराणला अगदी पुरेसे आहेत.
- अफगणिस्थान-पाकिस्तानमार्गे चीनची थेट मदत मिळवू शकतो
- अगदी वेळ आलीच तर कट्टरतावादी देशांतून जिहादची हाक देऊन योद्धे इराणमध्ये आयात करु शकतो. पाकीस्तान-अफगणिस्तान या देशांपेक्षा तेथील तालिबान, अल्-कायदा, लश्कर-ए-तैबा, जमात उद दावा अशा कट्टरतावादी संघटना येथे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या संघटनांना अमेरिकेशी दीर्घ काळ लढण्याचा अनुभव आहेच. इराणचे सैन्य जास्त शिस्तबद्ध असल्यामुळे अशा संघटनांची इराणला साथ अमेरिकेला प्रचंड नुकसानीत ढकलणारी आहे.
- सर्वात शेवटी असे मानू की इराण युद्ध हरते आहे, त्यावेळी तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला या विचाराने इराणने सगळ्या तेलसाठ्याला आग लावली तर? युद्धामुळे त्यावेळी अगोदरच भडकलेल्या किंमती भारतासारख्या किंवा चीनसारख्या देशालाही परवडतील?

अगदी अमेरिकेचे सुद्धा दिवाळे वाजेल. युरोपियन राष्ट्रे आत्ता अमेरिकेच्या हो ला हो करत आहेत. पण जेव्हा या देशांचेही दिवाळे निघायची वेळ येईल तेव्हा?

अजून खोलात मी गेलो नाही (जाण्याची आवश्यकता नाही) एवढे मोठे मुद्दे असताना युद्ध अमेरिका करणार नाही हे नक्की. प्रयत्न केलाच तर इस्त्रायलला छोटे युद्ध करायला भाग पाडेल (केवळ इराणवर दबाव आणण्यासाठी)
नंतर अमेरिका मधे पडते आहे असे दाखवून इस्त्रायल आणि इराण यांच्यात (तथाकथित) पेटलेले युद्ध थांबवेल.
हा अमेरिकेचा बेत आहे, आणि हे इराण पुरेपुर ओळखून आहे. म्हणूनच अहमदीनेजाद अमेरिकेविरुद्ध प्रक्षोभक पण ठाम भूमिका मांडणारी विधाने करत आहेत. आणि इराण प्रकरणात एक प्रकारे अमेरिकाच खरे तर घाबरली आहे. उलटपक्षी इराणच्या सर्वच बाजू जमेच्या असल्यामुळे त्यांना घाबरायचे कारणही नाही आणि आपण स्वतः अगदी बिनधास्त आहोत हेही दाखवता येत आहे.

अणूउर्जेच्या नावाखाली इराणने जे जगाला दाखवले आहे. त्याला मिळालेली मदत ही नेमकी कोणत्या मार्गाने झाली आहे हे समजणे जरा अवघड आहे. पण केवळ शक्यता पाहिल्या तरी (येथेच रशियाबद्दल मला दाट शंका आहे) रशिया, चीन, पाकीस्तान, उझबेकीस्तान, तुर्कमेनिस्तान असे अनेक मार्ग आहेत. त्यामुळे इराण अण्वस्त्रांच्या बाबतीत नेमका किती तयार आहे याचा अंदाज अमेरिका बांधू शकत नसल्याने युद्धाचे पाऊल उचलायला अमेरिका घाबरते आहे. अमेरिकेची नेमकी हीच अवस्था ओळखून इराण गुपचूप आहे. अण्वस्त्रे इराणकडे असतीलही किंवा नसतीलही. युद्ध करा मग तुम्हाला काय ते कळेल अशी इराणची भूमीका आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची या नात्याने इराणने अमेरिकेला युद्धाअगोदरच धोबीपछाड दिलेला आहे.

आता बघायचे आखातात तेलाच्या धुरांचे लोट बघायला मिळतात का अमेरिकेची मानहानी. हास्य

बातमी : http://epaper.dnaindia.com/story.aspx?id=10651&boxid=26726606&ed_date=2012-02-27&ed_code=820040&ed_page=9


माझ्या तर्काला बळकटी देणारी घटना.

सौदी हा जरी सुन्नी बाहुल्य देश असला तरी शेवटी इस्लाममधील २ पंथांतील तो अंतर्गत वाद आहे.
धार्मिक कडवेपणा हा दोघांमधेही आहेच. इराण शियाबाहुल्य असल्यामुळे तो वरचढ ठरु नये यासाठी सौदी अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर होणे कदापि स्वीकारु शकणार नाही.
सौदी आत्तापर्यंत अमेरिकेच्या दबावाखाली असण्याचे प्रमुख कारण व्यावसायिक आणि लष्करी क्षमतेचा अभाव हे होते. पण आखातात युद्धसदृष परिस्थिती उद्भवलीच तर सौदी स्वतःच्या घरातील सोन्याचा धूर कोणत्याही परिस्थितीत पणाला लावणार नाही.

दिलेली बातमी याच दिशेने आखातातले राजकारण जात असल्याचे दर्शवित आहे.

दुसरे असे की अमेरिकेला तालिबान्यांना गोंजारणे आधीइतके सोपे तर नाहीच नाही. पण अगदी बिकट झालेले आहे
अल-कायदा चा सर्वेसर्वा लादेनला अमेरिकेने ज्या पद्धतीने संपवले त्यामुळे तालिबानी अमेरिकेच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत हे नक्की. अमेरिकेला मदत करण्यापेक्षा इराणशी लागेबांधे ठेवणे तालिबान्यांच्याही हिताचेच आहेत. त्यामुळे एकंदरीत सर्व आघाड्यांवर अमेरिकेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळतो आहे. यामुळेच अमेरिका जास्त चवताळलेली आहे. पण अमेरिकेने कितीही माथापच्ची केली तरी त्यांना आखातातील देशांचे पाठबळ मिळवण्यात यश येणं अशक्य दिसते आहे. आखातातील एकही देश इराणच्या थेट विरोधात जाईल अशी कोणतीही कृती टाळेल ते याच कारणामुळे. शेवटी उद्या अमेरिका तिथले बस्तान एका रात्रीत हलवेल. पण अमेरिकेला मदत करणारे राष्ट्र भौगोलिक सीमांची बंधने तोडू शकत नसल्याने (थेट झळ बसू नये या कारणास्तव) कोणताही आखाती देश तात्कालिक विचार न करता दूरदृष्टी ठेवून विचार करतील अशी परिस्थिती सध्या तरी आहे.

तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला या विचाराने इराणने सगळ्या तेलसाठ्याला आग लावली तर?

हा बागुलबोवा कुवेतच्या लढाईतही उभा केला गेला होता. सद्दामने आगी लावल्याही. पण अटकळी होत्या त्या मानाने त्या अगदीच सहजपणे विझविण्यात आल्या.

इराकने लावलेल्या आगींपैकी कुवेतमधील कित्येक तेलविहिरी कित्येक महिने जळत होत्या. त्यांची आग विझवणे शक्य झाले नसल्यामुळे बुजवल्या गेल्या. असे वाचल्याचे आठवते आहे.

या अनुषंगाने यावेळची परिस्थिती वेगळी आहे. इराकच्या तुलनेत आता इराणची लष्करी स्फोटके वापरायची क्षमताही अफाट आहे. इराणने स्फोटके वापरुन या तेलाच्या साठ्याचे नुकसान केले तर? कारण समोर पराभव आणि अस्तित्त्वाचा प्रश्न समोर दिसत असताना इराणसारखे कडवे राष्ट्र जास्त घातक ठरु शकते.

आणि इराणने खरोखर अण्वस्त्र मिळवले असेल तर? ( याची शक्यता मला वाटते आहे. स्वतःच्या बळावर नाही पण कोणा अमेरिकाविरोधी राष्ट्राने छुपी मदत नक्की केलेली आहे. चीन, शिया आणि पाकीस्तान यांपैकीच कोणाचे तरी हे काम असावे. शिवाय रासायनिक शस्त्रे हा एक मार्ग आहेच. प्रश्न हा आहे की या युद्धात एकही अण्वस्त्र वापरले गेलेले अमेरिकेला आणि जगालाही परवडणारे नाहिये. इराण अमेरिकेला जुमानत नाहिये तो याचमुळे. आपलेच घोडे पुढे दामटताना पाऊल मागे कोण घेतो हा प्रश्न सध्या आहे. पण इराण त्या मूडमधे नाहिये हे त्याच्या हालचालींवरुन अगदी स्पष्ट आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रकारण हे अगदी फसलेले आहे. हिलरी क्लिंटन बाई याबाबतीत सपशेल अपयशी ठरल्या आहेत. आखाती प्रकरणात त्यांची भूमिका नाहिये यावरुन हे लक्षात यावे. अमेरिकेतील अंतर्गत राजकीय कलह त्यांच्या कूटनीतीतज्ज्ञांना अडथळे आणत आहे, तरी सुद्धा इराणने अमेरिकेशी सर्वच आघाड्यांवर दोन हात करायची तयारी ठेवली असल्यामुळे प्रत्येक लढाईत त्यांचे पारडे सध्या तरी जड दिसते आहे.

आखातात युद्ध एकदा सुरु झाले की ते संपवणे ना सुरु करणार्‍याच्या हातात राहीन ना युद्ध अंगावर ओढवून घेणार्‍या देशाच्या. तेव्हा आखातातील थरारनाट्यावर बारकाईने लक्ष ठेवणे क्रमप्राप्त आहे.

----

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष : भाग - १

होर्मूझच्या सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षावर थोडे विचार :

मुळात हा सगळा खेळ चालू आहे तो तेलासाठी. (असे अमेरिका भासवते आहे) अमेरिकेचा खरा डाव हाच आहे की इराणला नमवता आले तर इतर आखाती राष्ट्रांवर अमेरिकेला चांगलाच वचक निर्माण करता येईल. जगाच्या आर्थिक नाड्या आपल्याच हातात ठेवायचा अमेरिकेने आजपर्यंत केलेला सर्व प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. पण सुंभ जळाला तरी पीळ जात नाही या उक्तीप्रमाणे अमेरिका इराण प्रकरणात खूप रस घेतो आहे.

सद्दाम हुसेन नी जेव्हा कुवेत आपल्या पंजाखाली घेतला तेव्हाही अमेरिका सरसावली कारण तेलाची बाजारपेठ त्यामुळे प्रभावाखाली आली असती. अर्थात अमेरिकेच्या मूर्खपणामुळेच आज सगळे जग तेलाची किंमत प्रतिबॅरल १०० डॉलर पेक्षाही जास्त मोजते आहे. कुवेत युद्धातून अमेरिका शहाणपणा शिकली नाही हेच यातून सिद्ध होते.

चीन इराणच्या बाजूने का आहे? त्याचे कारण अगदी उघड आहे. पाकीस्तानच्या मार्गे थेट इराण पर्यंत चीनने पाईपलाईन टाकली आहे. जगानी बंदी टाकली तरी इराणला फरक पडत नाही कारण चीन हा एकमेव ग्राहक इराणला पुरेसा आहे. चीनची इराणला कूटनीतीक फूस देखील आहेच. याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिका ही चीनची प्रमुख बाजारपेठ असली तरी चीनविरोधक निती अमेरिकेने वापरु नये यासाठी दबावतंत्र चीन वापरु लागला आहेच. चीनने तिबेट राजरोसपणे गिळला तेव्हा अमेरिकेच्या घशातून आवाजही फुटला नाही. तेव्हा मानवाधिकार संरक्षणकर्त्या अमेरिकेला तिबेटची दया का आली नाही? ती येण्याचे अमेरिकेला काहीच कारण नव्हते कारण चीन हा एक समर्थ देश होता आणि दुसरे म्हणजे तिबेटप्रकरणापासून अमेरिकेला लाभ काहीच नव्हता. उलट त्यावेळी अमेरिकेच्या दबावाखाली भारतानेही तिबेट हा चीनचा अविभाज्य अंग असल्याचे मान्य केले.

इराण प्रकरण वरुन दिसते तेवढे साधे नक्कीच नाहिये.
इस्त्रायल नुसत्या बाता करतो असे वाटून घेण्याइतकी परिस्थिती नक्कीच नाहिये. पॅलेस्टाईन मधे इस्त्रायलचे सैनिक जो अमानुषपणा करतात ते पाहता युद्धाची खुमखूमी इस्त्रायलला आहेच आहे. इस्त्रायलच्या सगळ्या उड्या अमेरिकेच्या जिवावर आहेत, त्यामुळे युद्धाची सुरुवात इस्त्रायल अमेरिकेला न सांगता करूच शकणार नाही. नेमकी हीच गोष्ट इराणने हेरली आहे. अण्वस्त्राची जय्यत तयारी इराण करत असेलही, किंवा एव्हाना अण्वस्त्रे इराणने तयारही केली असतील. पण इराण इराक, सिरिया या देशांबरोबरच आखाती राष्ट्रांना कट्टरवादाची फुस लावून आपल्या बाजूला वळवू पाहतो आहे. अमेरिकेचे वर्चस्व आखातातील कोणत्याही राष्ट्रांना मान्य नाहियेच. पण उघडपणे अमेरिकेशी शत्रुत्व देखील ते पत्करु शकत नाहीत. वेळ आली तर हे आखाती देश इराणबरोबर उभे राहू शकतील, पण मग त्यातून जागतिक महायुद्ध सुरु होईल. कारण इराण तेलाचा सौदा चीनशी केवळ लष्करी मदतीच्या आश्वासनाचा भरवसा मिळाल्यावरच करु शकतो. चीनने जेव्हा पाईपलाईन टाकली त्याच्या कितीतरी अगोदर चीन आणि इराण यांच्या राजकीय नेत्यांच्या गुप्त चर्चा झाल्या असतील. चीनच्या पाठींब्याचा पर्याय उपलब्ध असल्याशिवाय इराणही थेट अमेरिकेशी टक्कर घेण्याचे धाडस करणार नाही.

तुम्ही लढा आम्ही तुम्हाला हवे ते आणि हवे तितके देऊ ही चीनची नीतीच आहे.


पण इस्रायल हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेस विश्वासात घेईलच असे नाही - हा माझा मुद्दा आहे.

हे होऊ शकते असे आपल्याला वाटू शकते. पण इस्त्रायलचे आर्थिक हितसंबंध अमेरिकेत अडकलेले आहेत. आधी केवळ लष्करी संबंध होते. अर्थकारण हा मोठा मुद्दा नव्हता. आता जागतिक अर्थकारणाच्या प्रवाहापासून इस्त्रायालही वेगळा राहू शकत नाही. अमेरिकेला विश्वासात न घेता थेट एखादे युद्ध छेडणे इस्त्रायलला परवडणारे नाही. कारण जगाचे अर्थकारण सध्या खूप नाजूक अवस्थेतून जाते आहे. या पार्श्वभूमीवर युद्ध हे खुद्द इराणला देखील परवडणारे नाही. युद्ध झालेच तर इराण मोठ्या प्रमाणावर तेलवाहतूक होणार्‍या या "होर्मूझच्या सामुद्रधुनी" ला लक्ष करेल हे उघड आहे. अगदी कितीही निकराचे युद्ध अमेरिका, मित्रराष्ट्रे व इस्त्रायलने केले तरी तेलपुरवठ्यात पडणारा खंड कोणत्याच देशाला परवडणार नाही. भारतासारख्या मोठ्या देशाकडे फक्त १२ दिवस पुरेल एवढाच तेलसाठा असतो. फार तर कसेबसे ३० दिवस थकवता येतील. त्यापुढे? हे प्रश्न प्रत्येक राष्ट्रासाठी अत्यंत गंभीर स्वरुपाचे ठरतील.

याची परिणीती म्हणून चीनला उघडपणे इराणच्या बाजूने यावे लागेल. तसे झाले तर तिसर्‍या महायुद्धाची ती सुरुवात असेल. मग पाकीस्तान उघड उघड आपले लष्करी आणि राजकीय हेतू साधून घेईल हे वेगळे सांगायला नकोच.

त्यामुळे व्यक्तीशः मला तरी अमेरिकेने गो म्हणेपर्यंत इस्त्रायल कोणतेही युद्ध अचानक सुरु करणार नाही असे वाटते.

सरे असे की इस्त्रायल हा आर्थिक अडचणींशी देखील झुंजतो आहे.
नेस टेक्नॉलॉजीज् ही इस्त्रायलच्या लष्कराबरोबर राष्ट्रीय सुरक्षिततेचे प्रोजेक्ट्स बघणारी कंपनी.
याच बरोबर अमेरिकेतीलही अनेक महत्त्वाची कंत्राटे या कंपनीकडे आहेत.
अलिकडेच त्यांनी ही कंपनी सिटी वेंचर कॅपिटल इंटरनॅशनल या कंपनीला (मर्जरचे गोंडस बाळ पुढे करुन) विकून टाकली (जरी या कंपनीचे हेडक्वार्टर अमेरिकेत असले तरी कंपनीचे मालकी हक्क इस्त्रायलींकडे होते . हे केवळ एक उदाहरण आहे. असे अनेक आर्थिक व्यवहार (इस्त्रायलमधे कॅश फ्लो वाहता राहण्यासाठी) इस्त्रायलचा बेस असलेल्या कंपन्यांनी केले आहेत. अनेक मोठ मोठे उद्योगपती ज्यू आहेत आणि इस्त्रायलला यांच्याकडून मोठी मदत नेहमी होत असते व होत राहील. पण सध्या ही मदत अपुरी पडू लागली आहे. असे वरील प्रकारच्या आर्थिक व्यवहारांवरुन लक्षात येते.

अशा सर्व आघाड्यांवर इस्त्रायलने स्वतःच्या हिमतीवर युद्ध सुरु केले तर तिसरे महायुद्ध अटळ असेल. आणि इस्त्रायलचे हे पाऊल केवळ हाराकिरी असेल. अमेरिकेला इस्त्रायलला कोणत्याही परिस्थितीत मदत ही करावीच लागेल. इस्त्रायलला वार्‍यावर सोडणे अमेरिकेला परवडणारे नाहिये. आणि नेमके याच गोष्टीचे भान असल्यामुळे अमेरिका इस्त्रायलच्या प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टींवर बारीक नजर ठेवून आहे.

अवांतरः इराणने अलिकडेच एक उपग्रह आकाशात सोडल्याची बातमी वाचली. या उपग्रहाद्वारे इराणच्या आसपासच्या सर्वच प्रदेशात अगदी बारकाईने इराणला लक्ष ठेवता येणार आहे. इराण युद्धासाठी अगदी तयार आहे हे दाखवणारे हे पाऊल अमेरिकेच्या उरात धडकी भरवणार हे नक्की हास्य

इस्त्रायलच्या दुतावासाच्या जवळ स्फोट झाला : (१३-फेब्रुवारी-२०१२)

ही २ दिवसांपूर्वी इस्त्रायलने गाझा पट्टीत विमानातून बॉम्बफेक केल्याची रिएक्शन असू शकेल.
कारण भारतासारख्या (अतिरेकी कारवाया करणे सोपे असलेल्या) देशात एवढ्या तडकाफडकी प्रतिक्रिया देणे अगदी सोपे आहे याची जाणीव इराणलाही आहे.
इराण आणि अल्-कायदा हे संबंध लपलेले नाहियेत. कारण धार्मिक कडवेपणा हे या दोघांना एका पातळीवर आणून ठेवते. अल् कायदाला एक इशारासुद्धा पुरेसा ठरू शकतो. भारतात त्यांचे नेटवर्क तयार आहेच.

अमेरिकेला आता इस्त्रायलला ताब्यात ठेवण्यासाठी कोणती खेळी खेळावी लागेल हे आता बघणे कदाचित थरारक असू शकेल. इस्त्रायल त्यांच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचे प्रसंगी मोठी किंमत देऊनही रक्षण करण्यास प्राधान्य देते, तेव्हा भारतातल्या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर उमटणार हे नक्की.

बँकॉक मधे बाँब नेतानाच फुटला. त्यात इराणी पाय गमवून बसला. (१४-फेब्रुवारी-२०१२)

भारतानंतर बँकॉक,

इस्त्रायलींना टारगेट करणार्‍या २ स्पष्ट घटना
दुसर्‍या घटनेत इराणी तरुण सापडला आहे.

भारतात इराणी लोकांनी कष्ट घ्यायची गरज नव्हतीच हे मी आधी वरच्या प्रतिसादात म्हटले होतेच.
एक्शन की रिएक्शन शुरु हो गई है हास्य

इस्त्रायलला अमेरिका शांत बसवू शकतो का नाही ते बघणे आता (आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने) मजेशीर ठरेल.

खाली ने दिलेला कुबेरांचा लेख वाचला. खरेच त्या माणसाचे कौतुक वाटते. प्रचंड अभ्यास आहे गिरिश कुबेरांचा आखाती तेलाच्या राजकारणाबाबत. तो लेख वाचून बरीच भर ज्ञानात पडली. पण माझी काही मते बदललेली नाहित ती देतोय. वर्तमानकाळातील घटनांचे अवलोकन करताना इतिहासात रमून चालत नसते याचे कायमच भान ठेवावे लागते. कारण गरजा बदलतात तशी आंतरराष्ट्रीय पटावरच्या राजकारणाची दिशा बदलत जाते. -

भारतातील हल्ल्यामागे इराण असेलच असे स्पष्ट सांगता नाही येणार. पण असण्याचीच शक्यता जास्त आहे कारण त्या हल्ल्यात इस्त्रायलींनाच थेट टारगेट करण्यात आलेले होते. या मुद्द्यावरुन भारत आणि इराणच संबंधांवर परिणाम होण्याचे काहीच कारण नाही. भारत आणि इराण हे दोन्ही देश असल्या (इस्त्रायलसाठी महत्त्वाच्या असलेल्या) भावनिक मुद्द्यावरुन एकमेकांच्या संबंधावर परिणाम होऊ देतील असे कोणत्याच दृष्टीकोनातून वाटत नाही. त्यात मागच्या आठवड्यातील इराणशी केलेल्या आर्थिक व्यवहारामुळे इराण आणि भारत हे संबंध कधी नव्हे ते जास्त दृढ झालेले आहेत हे स्पष्ट आहे.

माझ्यामते आत्ता सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की भारताने आपले सर्व इंटेलिजन्स पणाला लावून इराण आणि चीन यांच्या संबंधातील बारकावे शोधणे अतिशय गरजेचे आहे. कारण चीनने अगोदरच पाकीस्तानमार्गे थेट इराणपर्यंत आपली तेलाच्या अखंड पुरवठ्याची सोय करुन घेतली आहे. चीनची विस्तारवादी भूमिका सर्वांनाच माहिती आहे. त्या अनुषंगाने भारत आणि चीन या दोन देशांत अचानक युद्ध झाले तर इराणची भूमिका काय असेल हेही या पार्श्वभूमिवर माहिती करुन घेणे अत्यावश्यक ठरते.

भारताच्या सुरक्षेला घातक असे हे २ प्रश्न डोक्यावर टांगत्या तलवारीसारखे उभे असताना भारताने इराणशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात धोका आहे की दूरदृष्टी? हे येथे तपासून घ्यायची गरज आहे. भारतीय गुप्तहेर खाते आणि सर्व कूटनीती तज्ज्ञ या गोष्टींचा विचार करणार का? हा खरा प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाली की भारताने प्रसंगी कडक भूमिका ठेवून स्वत:ची सुरक्षा आधी जपून सर्व कृतीयोजना अंमलात आणाव्यात. कारण देशाचे अस्तित्त्व उरले तरच त्या देशाला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर वजिराची भूमिका बजावता येऊ शकेल. नेमके हेच जर आपण ओळखू शकलो नाही, तर काही होणार नाही या अत्याधिक विश्वासापोटी इराणच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे काहीच कारण नाहिये.

भारत इराणशी थेट शत्रुत्त्व घेणार नाही.

अमेरिका इस्त्रायलला शांत बसवू इच्छित नसली तरी दुसर्‍याचे हितसंबंध जपण्यासाठी स्वतःचे घर कोणी पणाला लावत नाही या उक्ती प्रमाणे इस्त्रायलचे नेत्तृत्त्व सर्व बाबींचा विचार करेल असे वाटते. कारण सद्दाम हुसेनसारखी इस्त्रायलमधे एकहाती सत्ता नसल्यामुळे त्यांचे अंतर्गत राजकीय , सामाजिक, आर्थिक आणि लष्करी असे सर्व प्रकारचे दबाव असतीलच असतील. त्यामुळेच इस्त्रायल हे स्वतःच्या जिवावर आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्धसदृश धोक्याच्या परिस्थितीत आणण्याचा प्रयत्न करणार नाही. अर्थात अमेरिकेची फूस आणि इच्छा असली तरी इस्त्रायल आधी स्वतःच्या अस्तित्त्वाचा आधी विचार करेल. कारण ही सर्व अरब राष्ट्रे इस्त्रायलला वेढून आहेत अमेरिकेला नाहीत. पण हाराकिरी करायचीच असे इस्त्रायलने ठरवले तर त्याला कोण अडवणार? तसे झाले तर एक मोठे युद्ध आखातात अटळ आहे.

या सर्व घडामोडींत रशिया काय भूमिका घेतो याकडेही लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.

अहमदीजिनाद सत्तेवर आल्यानंतर मात्र अमेरिकेशी इराणने उघड शत्रुत्त्व जोपासले आहे.

याचे प्रमुख कारण म्हणजे अहमदीनेजाद सत्तेवर आले तेच मुळी धार्मिक भावनेच्या लाटेवर. मुस्लिम जगतात अमेरिकेला क्र. १ चा शत्रू मानतातच. प्रत्यक्ष इराणमध्ये अमेरिकेविरोधी वातावरण आधी तितके नव्हते जेवढे आत्ता आहे. अमेरिका तसेही अहमदीनेजाद यांना स्वस्थ बसू देत नाहिये. इराणमधे त्यांचेही हस्तक आहेतच, त्यांच्याद्वारे त्यांनी अहमदीनेजाद यांना संसदेकडून गेल्या आठवड्यात एक समन्स बजावले होते. त्यानुसार त्यांनी संसदेसमोर १ महिन्यांत हजर व्हायचे आहे. पुढील महिन्यांत संसदेच्या निवडणुका आहेत. अहमदीनेजाद हे त्याच्या तयारीत गुंतले असणार हा अंदाज अमेरिकेने करायला हवा होता. जेथे अमेरिकेचे गुप्तहेरखाते कमी पडले आणि अहमदीनेजाद यांनी बुधवारी स्वतःच्या उपस्थितीत परमाणु कांड्यांचे रिएक्टरमध्ये रोपण करुन दाखवले. इराणच्या अणुशास्त्रज्ञांवर हल्ला करण्याचे प्रयत्न करुनही इराणने अत्यंत गुप्ततेने जगाला आपली शक्ती दाखवली आहे.

आता अहमदीनेजाद यांची लोकप्रियता इराणमधेच अधिक वाढीला लागणार हे सांगायची गरजच नाही. उलटपक्षी आखाती इस्लामी राष्ट्रांमध्ये देखील अहमदीनेजाद यांनी एक आदर मिळवला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलची तेलसाठ्यावरील नियंत्रण मिळवण्याची योजना एकंदरीत धुळीस मिळायला लागली आहे. युद्धाशिवाय या २ देशांना दुसरा मार्गच नाहिये.

अशा परिस्थितीत इराण युरोपातील फ्रांस, इटली आणि स्पेन सकट ६ प्रमुख राष्ट्रांना तेलपुरवठा करणार नाही अशी अहमदीनेजाद यांनी एकतर्फी घोषणाही केली आहे. हा युरोपियन राष्ट्रांना थेट इशारा आहे की या भानगडीत पडू नका नाहीतर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील.

अशा पार्श्वभूमीवर युद्धाचा प्रमुख भार पडेल तो अमेरिकेवर. जे अमेरिका इतर देशांना भरीस पाडून टाळू पहात होती. युद्धाचा प्रमुख भार उचलणे अमेरिकेला आजच्या आर्थिक अडचणींत शक्य नाहिये. त्यामुळे इराण प्रकरण स्थगित करायचे का युद्धाचा धोका पत्करायचा. हा अमेरिकेसमोर सध्या इकडे आड तिकडे विहिर असा बिकट प्रश्न उभा राहिला आहे.

घटनाक्रम सध्या वेगात चालू आहे, तेव्हा लवकरच या इराण प्रकरणावर आपल्याला अचंभित करणार्‍या हालचाली पहावयास मिळतील. अमेरिकेविरुद्ध शाब्दिक गरळ ओकून अहमदिनेजाद यांनी सध्या तरी बाजी मारली आहे असेच चित्र आहे. अणुचाचणी इराण करणार नाही हे नक्की. वेळ आलीच तर थेट युद्धात ही सामग्री इराण वापरेल पण चाचणी नाही करणार.

------

इराणला इराकसारख्या लढाऊ सैन्याशी (या इराकच्या सैन्याला भारतीय लष्करानेही प्रशिक्षण दिलेले होते) सातत्याने ८ वर्षे युद्ध करण्याचा अनुभव आहे. इराककडून अमेरिकेला त्यांचे हितसंबंध धोक्यात येत आहेत असे दिसताच त्यांनी सद्दाम हुसेनचा खातमा केला. मनोबांनी आखाती देशांचे समर्पक वर्णन केले आहे. सैनिक क्षमतेत इराण समर्थ आहे. आणि इराकशी सातत्याने ८ वर्षांचे युद्ध केले असल्यामुळे दीर्घकालीन युद्धाचा अनुभवही इराणच्या पदरी आहेच. इराकच्या सैन्याला भारतीय सैन्याने प्रशिक्षण दिलेले होते तरी त्यामुळे इराणने भारताशी संबंधात कटुता कधीच निर्माण होऊ दिली नव्हती हेही येथे लक्षात घ्यावे लागेल. तद्वतच भारतही इराणशी तेलव्यवसायामुळे घनिष्ठ असलेले संबंध कोणा अमेरिकेच्या दबावाखाली संपुष्टात आणणार नाही.

अलिकडेच झालेल्या बॉम्ब स्फोटांच्या निमित्ताने इस्त्रायल व अमेरिका दोघांनीही भारतावर खूप दबाव आणला होता व अजूनही ते सुरुच आहे. (यामुळेच भारतातील स्फोट हा अमेरिका व इस्त्रायलचा संयुक्त कट असण्याची शक्यता बळावते) पण बँकॉक मधील ३ स्फोट हे इराणने अमेरिकेला भारतातील स्फोटाचा वापर करण्यासाठी दिलेले उत्तर नक्कीच असावे. कारण भारतासारख्या मित्र राष्ट्रात स्फोट करण्यापेक्षा आम्ही कोठेही स्फोट करु शकतो हे त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असू शकेल.

सौदी अरेबियाने भारतासाठी अतिरिक्त तेलसाठा उपलब्ध केल्याची घोषणा म्हणजे निव्वळ अमेरिकेने आणलेल्या दबावाची रिएक्शन आहे. कारण आकार मोठा पण आवाका लहान अशी सौदीची गत आहे. आखातात इराण प्रचंड प्रबळ आहे आणि त्याची सद्दी मोडायचीच असा अमेरिकेचा बेत आहे हे उघड दिसते आहे. कालच सिरियातील एका मोठ्या तेलवाहक पाईपलाईनला उडवण्यात आले. हा सिरियावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. पण सिरिया अशा कारवायांना भीक घालेल असे वाटत नाही. इराण हा भौगोलिकदृष्ट्या शेजारी आहे आणि तो केव्हाही सिरियाला मदत देऊ शकतो. असे असताना कधीही पाठीत खंजिर खुपसणार्‍या नव्या मित्रांपेक्षा सिरिया परंपरागत शेजारी इराणची सोबत करणे जास्त पसंत करेल असे वाटते.

कालच इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतः इंधनाच्या छड्यांचे उद्घाटन केले आणि ४ नवीन अणुभट्ट्या निर्माण करण्याची घोषणा केली आहे. ही अमेरिकेच्या व इस्त्रायलच्या थेट थोबाडीत मारलेली आहे. आता अमेरिका त्यांच्या (गुप्त व कुटील) कारवाया अधिक जोमाने करायला सुरुवात करेल. युद्ध अमेरिकेला परवडणार नाही. कारण युद्ध झाले तर ओबामांच्या आर्थिक सुधारणा पत्रकाला हरताळ फासला जाईल व त्याचा परिणाम निवडणूकीत दिसून येईल. अलिकडेच ओबामांनी नासाचे महत्त्वाकांक्षी मंगळ अभियान स्थगित करवून मोठी रक्कम वाचवल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणशी युद्ध त्यांना आगीतून फुफाट्यात पाडेल.

इराण विश्वासू आहे की नाही हे जगाला दाखवण्यापेक्षा तो सध्या स्वतः स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर जास्त लक्ष केंद्रीत करतो आहे. इराणमधील धार्मिक उन्माद एकदा पेटला की ही आण्विक शक्ती संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरु शकते. म्हणूनच इराण प्रकरणावर भारतानेही अगदी बारीक लक्ष ठेवले पाहिजे. प्रसंगी आपले मित्रत्वाचे संबंध वापरुन दोघांच्या आणि जगाच्या हिताचे सल्ले इराणला देऊ केले पाहिजे. अमेरिका जोपर्यंत पाकीस्तानला मदतीचा ओघ सुरु ठेवेल तोपर्यंत भारत आपल्या बाजूने पूर्णपणे येणार नाही हे अमेरिकेलाही माहिती आहे. भारत ही उद्याच्या जगातील महासत्ता होण्याकडे वाटचाल करते आहे. त्यामुळे अमेरिकेला भारताचे हे आर्थिक वर्चस्व पचत नाहीये. दुसरीकडे अमेरिकन कंपन्यांना भारतातील मोठमोठी कंत्राटे मिळावीत यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.

भारताने फ्रान्सच्या डसॉल्ट राफेल ची निवड करुन अमेरिकेला मोठा दणका दिला आहेच (जे अत्यावश्यक होते)
या घटनेमुळे खवळलेल्या अमेरिकेने ब्रिटनमार्फत विरोध करण्याचा प्रयत्न केला होताच. पण भारताने फ्रान्सच्या कंपनीला दिलेल्या कंत्राटाचा फेरविचार होणार नसल्याचे एकदम ठणकावून सांगितल्यामुळे अमेरिकेच्या इशार्‍यावर चालणार्‍या ब्रिटिश कूटनितीतज्ज्ञांना त्यांचा हेका सोडावा लागला.

नेमका हाच धडा अमेरिकेला देण्यासाठी भारत इराणची सोबत सोडत नाहिये. अशा नाजूक प्रसंगात इराणला भारतासारखा मित्र असणे हे इराणला जसे अत्यावश्यक आहे त्याच प्रमाणे भारताला देखील इराणची गरज अमेरिकेला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आहेच.

भारताने इराणची साथ सोडावी अशी अमेरिकेची इच्छा असेल तर त्यासाठी सौदी अरेबियाच्या माध्यमातून तुकडे फेकण्याची प्रवृती अमेरिकेला बदलावी लागेल. शिवाय भारताचा सन्मान जपून मोठी किंमत अमेरिकेला मोजावी लागेल. जे अमेरिका करणे अवघड आहे (पाकीस्तान प्रकरण). त्यामुळे इराणविरुद्ध संघर्ष पेटला तर अमेरिकेला भारताकडून कोणतीही मदत मिळणार नाही हे उघड आहे. व अमेरिकेला त्यांच्या जिवावरच सर्व युद्ध लढावे लागेल.

याचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला अफगणिस्थानच्या माध्यमातून मिळू शकतो. अफगणिस्थान हा भारताचा मोठा मित्र आहे. इराण मोहिमेत अफगणिस्थान खूप महत्त्वाचा असणार आहे. तसेच इराणला लागून असलेल्या तुर्कमेनिस्तानची भूमिका काय असेल हेही पाहणे येथे रोचक ठरेल. पण एकंदरीत इराण सर्व आघाड्यांवर युद्ध लढण्यास सक्षम आहे. मुद्दा हा असेल की इस्त्रायल आणि अमेरिका यांच्याबरोबर किती देश युद्धाचे संकट अंगावर ओढवून घेतील. युरोपिय देशांपैकी एकही देश युद्धात योगदान देण्यास सध्या तरी सक्षम नाहिये. याचे कारण म्हणजे युरोपियन देशांची अत्यंत बिकट असलेली आर्थिक अवस्था. युद्धात सहभागी झालेल्या देशांना ग्रीसच्या वाटेवर जाण्याचा धोका दिसतो आहे, म्हणूनच अमेरिका भारतावर दबाव आणू पहात आहे.

चीन हा केवळ स्वतःच्या फायद्याची सौदेबाजी करणारा आहे त्यामुळे अमेरिकेला चीन परवडण्यासारखा नाहिये.
तरी चीनचे उपराष्ट्रपती सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. व कम्युनिस्ट चीन कोणती सौदेबाजी करतो हे बघावे लागेल. माझ्यामते चीनच्या पुढच्या योजनांकडे दुर्लक्ष करण्याच्या किंमतीवर चीन इराणशी संबंध केवळ तेलआयातक देश एवढ्याचपुरते मर्यादित करु शकतो...

बघूयात काय होते ते हास्य

---

सौदीची ही मदत भारताला परवडणारी नक्कीच नाहिये. इराणला पैसे कसे द्यायचे हा मुद्दाही भारत सातत्याने सोडवत असल्यामुळे आणि तेलाच्या आयातीचा खर्च नियंत्रणात असल्यामुळे इराण हा भारतासाठी सौदीपेक्षा खूप महत्त्वाचा आहेच. पण मी वर म्हटल्याप्रमाणे भारताने आधी इराण आणि चीन या संबंधावर कठोर परिश्रम घेऊन सत्य हुडकले पाहिजे. अशा पार्श्वभूमीवर सौदीने देऊ केलेली मदत आर्थिक आघाडीवर थोडी महाग पडली तरी देशाची सुरक्षा जपण्याच्या दृष्टीने परवडू शकते. पण हा इंटेलिजन्स चा भाग आहे. आपले परराष्ट्रकारण मुत्सद्दी काय करतात हे पाहणे हे खरेतर थरारक ठरेल.




लावणीचा शोध - २

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

मागे मी "लावणीचा शोध - १" या लेखात मराठी लावणीचे मूळ शोधायचा प्रयत्न केला होता. माझा हा शोध अजूनही अविरत चालूच आहे, याकामी माझे अनेक मित्र मदत करत आहेत. खास करुन माझे ख्यातनाम लेखक व संशोधक मित्र श्री. संजय सोनवणी हे देखील त्यांच्या संशोधनाने मदत करत आहेत. शोध घेता घेता मला मराठी 'तमाशा' चे मूळ थेट सातवाहन काळापर्यंत असल्याचा एक दाखला मिळाला आहे. गाथासप्तशति ही हाल सातवाहनाने संपादित केली होती हे तर आता सिद्ध झालेले आहेच. त्यामुळे मराठी तमाशाचे मूळ सातवाहन कालात जात असेल तर त्याची माहिती सर्वांना होणे अगत्याचे आहे. म्हणूनच मूळ लेख मी जसाच्या तसा येथे देत आहे. याचे मुख्य कारण त्या अनुषंगाने चर्चा मला अपेक्षित आहेच, शिवाय चर्चेद्वारे माहितीत भर पडावी हा ही प्रमुख हेतू आहे. या व्यतिरिक्त वाचकांना मराठी तमाशा च्या इतिहासाची अधिक माहिती मिळावी हाही हेतू आहेच हास्य

शिवाय महान्यूजच्या संकेतस्थळावरच असे आवाहन आहे की हा लेख कुठेही प्रकाशित केला तरी चालेल, फक्त त्यांचा उल्लेख हवा. लेखाच्या शेवटी मूळ दुवा दिला आहे.

---------------------------
खडीगंमत:

'तमाशा'ला एकेकाळी खडीगंमत म्हटले जायचे. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागात तमाशा प्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रात तखतरावाचा तमाशा आहे. संगीतबारीचा तमाशा आणि ढोलकीफडाचा तमाशा असे तमाशाचे दोन स्वतंत्र प्रकार असले तरी विदर्भातील खडीगंमत आणि प. महाराष्ट्रातील तमाशा हे एकाच प्रकृतीपिंडाचे प्रयोगात्मक लोककला प्रकार आहेत.

विदर्भातील बुलढाण्यापासून गोंदिया पर्यंत खडीगंमत सादर केली जाते. घरोघरी फिरणारी खडीगंमत ही दंडार नावाने ओळखली जाते. खडीगंमत आणि दंडार या विदर्भातील लोककला प्रकारांवर डॉ. हरिश्चंद्र बोरकर आणि प्रा. हिरामण लांजे यांनी संशोधन केलेले आहे. खडीगंमत सादर करणार्‍या कलावंतांना विदर्भात शाहीर म्हणूनच संबोधले जाते. खडीगंमत ही पूर्णत: पुरुषप्रधान लोककला आहे. या प्रकारात नृत्याचे काम करणारा 'नाच्या'म्हणून संबोधले जाते.

विदर्भात दर्या, पांगूळ, डहाका, झडती, मंत्रगीते, दंडीगान, भिंगी सोंग, राध, डरामा, दंडार आदी लोककला प्रकार प्रसिद्ध आहे. त्यातील खडीगंमत हा प्रकार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून खडीगंमतची मोहिनी जनमानसावर आहे.

'गाथासप्तशती' या ग्रंथात 'खडीगंमत'ला पुष्टी देणारे उल्लेख आहेत. गोपिकेची वेशभूषा करुन पुरुष लुगडी नेसून फाल्गुन मासात जनरंजन करीत असत, असा उल्लेख 'गाथासप्तशती'त आहे. 'राधानाट' किंवा 'राधानाचा'ची परंपरा बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांतही आहे. स्त्रीवेशधारी पुरुषतज्ज्ञ कलावंतांचा उल्लेख दशावतारासंबंधी संत रामदासांनी केलेल्या उक्तीतही आढळतो. समर्थांनी स्त्रीवेशधारी पुरुषांना 'अवघेचि धटिंगण' असे म्हटले आहे. हे धटिंगण 'खडीगंमत' मध्ये आढळतात. मुकुंदराज यांच्या विवेकसिंधू या ग्रंथातील उल्लेख पाहा

सोंग संपादिता तोखलेपणें
नटासि दीजेती वस्त्रे भूषणें
तो सोंग लटिका, परि ती भूषणे
नटासिची अर्पिती

दंडार, डफगाण, खडीगंमत आदी लोकनाट्ये ही एकाच परंपरेतील आहेत. मनोरंजन करणार्‍यास 'गमत्या' असे म्हटले जाते. तमाशात जसा सोंगाड्या तसा खडीगंमत या लोककला प्रकारात 'गमत्या' असतो. 'गमत्या' म्हणजे 'गमज्या' मारणारा. 'गमज्या' म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण बडबड करणारा.

'गमत्या' च्या 'गमज्या' या अर्थहीन बडबड वाटत असली तरी त्यामागे लक्ष्यार्थ आणि व्यंगार्थ असतो. 'गमत्या' सारखे पात्र लळित, दशावतार, भागवतमेळे या सारख्या भक्ती नाट्यांमधून आढळते. लळितातील 'वनमाळी' दशावतारातील संकासूर, भागवत मेळ्यातील विदूषक आदी पाने 'गमती' करीत असतात.

'खडीगंमत' मध्ये ढोलकी, डफ, चोनका (म्हणजे प.महाराष्ट्रातील चौंडक) टाळ ही वाद्ये वापरली जातात. त्यातील ढोलकी, डफ ही तालवाद्ये तर तुणतुणे, चोनका ही सूर देणारी वाद्ये होत. पूर्वरंग आणि उत्तररंग या विभागात विभागलेल्या खडीगंमत चा आकृतीबंध खालीलप्रमाणे -

पूर्वरंगात गण व गवळण यांचा समावेश होतो. उर्वरित भाग उत्तररंगात येतो.

गण : दंडार, गोंधळ आणि तमाशा या महाराष्ट्रातील अन्य लोकनाट्य प्रमाणे खडीगंमत देखील गणाने सुरु होते. शाहिर गण गातो व अन्य पात्रे स्थिर उभी राहतात. गणामध्ये श्रीगणेशाची स्तुती असली तरी शंकर पार्वतीचाही उल्लेख येतो.

गवळण : गण आटोपल्यावर गवळण गायली जाते. यात नाच्याला चांगलाच वाव असतो. त्याच्या विविध विभ्रमातून प्रेक्षकांना आकर्षित केले जाते. मथुरेला जाणार्‍या गौळणी आणि पेंद्या व आपल्या सवंगड्यासह त्यांना अडविणारा श्रीकृष्ण खडीगंमतच्या गवळणीमध्ये सादर होतो. गोंधळ तमाशा या अन्य लोकनाट्याप्रमाणे खडीगंमतही गवळण सादर करुन आपल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवीत असते.

सरन व रुसवा : गवळण सादर करतांना शाहिर तात्पुरता श्रीकृष्ण बनतो तर त्याचा साथीदार पेंद्या होतो. नाच्या राधेचा वेश घेतो तर गमत्या डोईवर पदर घेवून मावशीचे रुप धारण करतो. गवळणीचा शेवट सरण किंवा 'शरण' या वेगळ्या पद्य प्रकाराने होतो. रस्ता अडविणार्‍या श्रीकृष्णाला अथवा त्याच्या सवंगड्यांना गोपिकांनी केलेली विनवणी म्हणजे 'सरण'

गवळण गातांना 'रुसवा' हा एक अन्य रचनाप्रकार आढळून येतो. आपल्या नवर्‍याशी किंवा खोडी काढणार्‍या कृष्णाशी गोपिकेने धरलेला अबोला म्हणजे 'रुसवा' हे स्वतंत्र नाव देण्याचा पायंडा. केवळ खडी गंमत लोकनाट्याने पाडलेला दिसून येतो.

उत्तर रंग :
उत्तररंगात छिटा व दोहा, धमाळी व पोवाडा बैठी गंमत, बैठी दंडार व मुजरा अर्थात भरतवाक्याने खडी गंमतीचा उत्तररंग रंगतो त्यामुळे खडीगंमत पाहण्यास आलेला प्रेक्षक उत्तररंगाचीच वाट पाहत असतो.

छिटा व दोहा :
खडीगंमत अधिक आकर्षक होत असतांना कलगी व तुरा या दोन घटाण्याच्या द्वंद्वात्मक कार्यक्रमांमुळे मास दुय्यम असा झाडी शब्द खडीगंमत वापरते. यात सवाल-जवाब प्रामुख्याने असतात. शिवाय छिटा हा स्वतंत्र प्रकार वापरला जातो. चार ओळीचा 'दोहा' यास फार महत्त्व असते. 'जवाबी दोहा' हा त्याचाच एक प्रकार असतो. झगडा हा अन्य रचना प्रकार ऐकायला मिळतो. जवाबी झगडा 'जोड झगडा' हे त्याचे अन्य प्रकार असतात. खडी गंमत गद्याला अत्यल्प स्थान देते. कडव्याच्या एका लावणीत प्रश्न असतो दुसरी उत्तराची लावणी तेवढ्याच विस्ताराने गायली जाते. तर कधी एकत्र उत्तर सादर केले जाते.

धुमाळी व पोवाडे :
'धुमाळी व पोवाडा' हे दोन अन्य रचनाप्रकार खडीगंमत वापरत असते. धुमाळी हा शब्द परंपरागत संगीतातील असला तरी झोपेची डुलकी घेत असलेल्या प्रेक्षकाला खडबडून जागे करण्याचे कार्य ही खडीगंमतची धुमाळी करीत असते. कोणतीही महत्त्वाची लावणी प्रारंभ करण्यापूर्वी शाहीर आपल्या अत्युच्च स्वरात या धुमाळीचा सूर लावतो.

पोवाडा:
खडी गंमत गात असलेला पोवाडा हे दिर्घकाव्य असते. तब्बल एक-दोन तास चालणारे हे प्रदीर्घ गीत असते. यामध्ये एखादे कथानक निवडून त्या संदर्भातील चरित्र आख्यान गायले जाते. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे 'सत्यवान सावित्री, चिलिया बाळ' भक्त ध्रुव, अभिमन्यू वध अशा पौराणिक कथाशिवाय ऐतिहासिक व सामाजिक घटनावरही प्रतिभावंत ग्रामिण लोककलावंतांनी प्रदीर्घ पोवाडे रचले आहेत. उदा. टिळकांचा पोवाडा, गांधीवधाचा पोवाडा, नर्मदेच्या पूराचा पोवाडा, खाण्याचा पोवाडा... इत्यादी

बैठी गंमत -बैठी दंडार :
पोवाडा हा रचना प्रकार उभ्याने गाण्यापेक्षा बसून गाण्यात खरी मजा असते. म्हणूनच खडी गंमत ही अनेकदा बैठी गंमत रुपातही सादर केली जाते.

विशिष्ट सणाच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने कोणाच्या वाड्याच्या ओसरीवर निवडक श्रोत्यांच्या उपस्थित ही बैठी गंमत रात्रभर सादर केली जाते. नागपंचमी, जन्माष्टमी, पोळा, होळी, गौर, शिवरात्री ही त्याकरिता निमित्ये असतात.

संपादणूक अर्थात बतावणी :
लावणीचे गायन आपल्या खड्या आवाजात शाहीर करीत असतो. त्या लावणीतील वर्णनानुसार अन्य पात्रे संवाद व अभिनय यांच्या सहाय्याने संपादणूक करीता असतात, तीला बतावणी म्हणतात.

बतावणी हा खास झाडीबोलीतील शब्द असून तो कृत्रिम आचरण अथवा सोंग यास पर्याय म्हणून व्यवहारात वापरला असतो. बताव इतकाच बतावणी हा शब्द जुना आहे.

मुजरा :
रात्र संपायला येते. प्रभातरंग दिसायला लागतो. तरी खडी गंमत आपला पसारा आवरता घेते. शेवटला निरोप द्यायची तयारी करु लागते. भरतवाक्य गायला प्रारंभ करते. अर्थात तेव्हा आपल्या देवदेवतांचे आणि गुरुचे स्मरण करायला ती विसरत नाही. या भरतवाक्याला खडी गंमत मध्ये 'मुजरा' हे स्वतंत्र नाव आहे.

खडीगंमत या विदर्भातील लोकप्रिय रंजनप्रकाराचा समारोप सूर्याच्या प्रार्थनेने होतो असे उमरी येथील डोमाजी कापगते खडीगंमत सादर करणारा तत्कालीन शाहीराने सांगीतले आहे.

लेखकः डॉ.प्रकाश खांडगे
लेखाचा मूळ दुवा

लावणीचा शोध - १

मराठीतील पहिली लावणी
१. कधी लिहिली गेली?
२. कोणी लिहिली?
३. कोणावर लिहिली गेली?

या प्रश्नांच्या साहाय्याने लावणीच्या उगमाचा शोध घ्यायचा आहे.


लावणीचे एकूण तीन प्रकार आहेत :
शाहिरी लावणी : ही डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहीरच सादर करतो
बैठकीची लावणी : ही दिवाणख्यान्यात मोजक्याच रसिकांसमोर बैठकीच्या स्वरूपात सादर केली जाते
आणि
फडाची लावणी : ही म्हणजे ढोलकीची लावणी. आज लोकांना जी भुरळ पडली आहे, ती याच ढोलकीच्या तालावर रंगणा-या लावणीची wink

पहिली उपलब्ध लावणी ही चौदाव्या शतकातली असून ती मन्मथ शिवलिंग यांनी कराडच्या भवानीवर लिहिलेली आहे. आजच्या लावणीचा उगम मात्र उत्तर पेशवाईत झालेला आहे.
हे सर्व शोधण्याचे मुख्य कारण म्हणजे मला मराठीतील पहिली लावणी हवी आहे हास्य
पठ्ठे बापुरावांच्या तमाशाच्या फडात पवळा हिवरगावकर नाचायला उभी राहिली नि पुन्हा एकदा लावणी तुफान गाजू लागली

पठ्ठे बापुरावांबरोबर - पवळा हिवरगांवकर चे पण लावणी लोकप्रिय होण्यात मोठे योगदान आहे

पठ्ठे बापुराव,पवळा हिवरगावकर - असे एक भन्नाट पुस्तकच आबासाहेब आचरेकर यांनी लिहिले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य वाचावे. लावणी लोकप्रिय कशी झाली याचा छान इतिहास यातून वाचायला मिळेल .

पुढील भागात लावणीचा शोध घ्यायचा प्रयत्न करुयात

~सागर~

सृष्टीज्ञान मासिक

मित्रांनो,

आजच मी "सृष्टीज्ञान" मासिकाच्या ऑफिसात फोन करुन डिटेल्स विचारुन घेतले. व ही माहिती सर्व मीमराठीकरांच्या उपयोगी पडेल असे वाटल्याने देत आहे.

आजच्या विज्ञान युगात घरात एक तरी विज्ञानविषयक मासिक दर महिन्याला यायला हवे. त्यातून चांगल्या मासिकाची निवड करणे अवघडच असते. पण कित्येक वर्षे अखंडपणे विज्ञानयज्ञ चालवणारे "सृष्टीज्ञान" मासिक खूप स्वस्त आणि उत्कॄष्ट दर्जाचे असे उपलब्ध आहे.

१९२८च्या जानेवारी महिन्यात सुरू झालेले "सृष्टीज्ञान" मासिक अजूनही तितक्याच कार्यक्षमतेने सुरु आहे.

प्रा. गोपाळ रामचंद्र परांजपे, डॉ. वि. ना. भाजेकर, प्रा. प्र. रा. आवटी(सर्व मुंबई), प्रा. दिनकर धोंडो कर्वे , स. बा. हुदलीकर(पुणे), प्रा. श्री. ल. आजरेकर,(अहमदाबाद)आणि शं. ब. सहसबुद्धे यांना शाळा-महाविद्यालयांतील विज्ञान शिक्षणाला पूरक असे ज्ञान मराठीतून देण्याची आवश्यकता भासली आणि त्यांनी एप्रिल, १९२८मध्ये पुण्यात 'सृष्टिज्ञान' मासिकाचे प्रकाशन सुरू केले. १९४८ साली प्रा. गो. रा. परांजपे एकदा नोकरीतून निवृत्त होऊन पुण्यात आले आणि तेथेच स्थायिक झाल्यावर परत एकदा 'सृष्टिज्ञान'ला बळकटी आली. पण मुंबईत असले तरी प्रा. गो. रा. परांजपे यांनी लेखनाद्वारे 'सृष्टिज्ञान'ला भक्कम पाठिंबा दिला.

पुण्याच्या 'महात्मा फुले वस्तू संग्रहालया'ने 'सृष्टिज्ञान' मासिकाला वेळोवेळी मदत केल्याने त्यांना हा डोलारा सांभाळता आला, तरीही पैशाच्या दृष्टीने मासिकाला भरभराट आली नाही. पण तरी व्रत म्हणून हे मासिक वेळोवेळीच्या संपादक मंडळाने पाळले. मराठी समाजात आता विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे हजारो लोक आहेत. त्या सगळ्यांनी या मासिकाचे वर्गणीदार झाले पाहिजे. विज्ञानविषयक जी मोजकी मासिके अस्तित्त्वात आहेत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला शक्य होईल तेवढा हातभार लावावा ही विनंती.

त्यांचा पत्ता असा आहे:

महाराष्ट्रातून संपर्क करण्यासाठी वा वर्गणी भरुन अंक घरपोच मिळवण्यासाठी पत्ता असा लिहावा
महाराष्ट्रात वर्गणी २०० रुपये

संपादक, "सृष्टीज्ञान" ,
महात्मा फुले वस्तुसंग्रहालय,
१२०३, शिवाजी नगर, घोले रस्ता,
पुणे - ४११ ००४.
संपर्क : ०२०-२५५३२७५०

महाराष्ट्राबाहेरुन संपर्क करुन सृष्टीज्ञान घरपोच (अथवा ऑफिसपोच) मिळवण्यासाठी पत्ता इंग्रजीतूनच लिहावा

महाराष्ट्राबाहेर वर्गणी रुपये २२५/- फक्त. ( २००+२५ जास्तीचे पोस्टेज ) चेक अथवा डिमांड ड्राफ्ट ने पाठवावेत. काही शंका असल्यास आधी फोन करुन विचारुन घ्या.

इंग्रजी पत्ता:
Chief Editor "Srushtidnyan" ,
Mahatma Phule Vastusangrahalay
1203, Shivaji Nagar, Ghole road,
Pune - 411 004.
Contact: 020 – 25532750

(स्त्रोतः मटावरील लेख )

किशोर कुमार (श्रद्धांजली) : मेरे ये गीत याद रखना

१३ ऑक्टोबर, माझ्या लाडक्या किशोर कुमार चा पुण्यस्मरणदिन

किशोरदांना माझी भावूक श्रद्धांजली

भारतीय टपाल खात्यानेही किशोरदांच्या नावाने एक तिकीट काढून श्रद्धांजली दिलेली आहेच

किशोरदांची स्वाक्षरी :

मध्य प्रदेश येथील खांडवा येथे जन्म झालेल्या आणि वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी मुंबईत नशीब काढायला आलेल्या किशोर कुमार यांनी अवघ्या चित्रपट सृष्टीला आपल्या प्रतिभेने चकीत केले. अभिनेता, संगीतकार , निर्माता आणि दिग्दर्शक अशा अनेक क्षेत्रांवर या हरहुन्नरी कलाकाराने आपली न विसरता येणारी छाप उमटवलेली असली तरी किशोर कुमार ने आपल्या जादुई आवाजाने संगीत ऐकणार्‍या प्रत्येक हृदयात स्वतःला अजरामर करुन सोडले आहे.
किशोर च्या गाण्यांनी लाखो हृदयांना संजीवनी दिलेली आहे. मग तो कोणताही मूड असो. रोमॅन्टीक असो किंवा दु:खाचा मूड असो, प्रत्येक मूडला किशोरने सजीव केले आहे.

आजची सारी रात्र किशोरची गाणी ऐकायचे ठरवले आहे आणि किशोरदां बद्दल अजून लिहायला शब्दच सुचत नाहियेत. तेव्हा इथेच थांबतो आणि माझ्या आवडीची काही गाणी पुढे देतो आहे.

http://www.esnips.com/web/Best-of-Kishor-Kumar या दुव्यावर एमपी थ्री अपलोड केली आहेत.

खाजगी आयुष्यात किशोरदांना दु:ख भोगावे लागले असले तरी ५१ व्या वर्षी लीना चंदावरकर सोबत विवाह करुन लवकरच अपत्य प्राप्ती झाल्यामुळे सुखाचे काही कण जीवनाच्या शेवटी त्यांना लाभले असे म्हणता येईल.
पहिली पत्नी रुमा घोष (हिच्यापासून अमितकुमार चा जन्म झाला)
दुसरी मधुबाला
तिसरी योगिताबाली
आणि शेवटी लीना चंदावरकर सोबत १९८० साली लग्न केले (हिच्यापासून सुमित कुमार चा जन्म झाला)

एकूण ८ वेळा किशोरदांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला असला तरी त्यांचे प्रत्येक गाणे हृदयाची तार झंकारुन जायचे असा जादुई आवाज त्यांना लाभला होता.
या गाण्यांसाठी ८ वेळा किशोरदांना फिल्मफेअर मिळाला होता:
र्ष गाणे चित्रपट संगीतकार गीतकार
१९६९ रूप तेरा मस्ताना - आराधना
१९७५ दिल ऐसा किसी ने मेरा तोडा - अमानुष
१९७८ खैके पान बनारासवाला - डॉन
१९८० हज़ार राहें मुडके देखीं - थोडीसी बेवफाई
१९८२ पग घुँघरू बाँध - नमक हलाल
१९८३ हमें और जीने की चाहत ना होती - अगर तुम ना होते
१९८४ मंजिलें अपनी जगह - शराबी
१९८५ सागर किनारे - सागर

बाकी मीमराठीवरील किशोरदा प्रेमी माहितीत चर्चेद्वारे भर घालत राहतीलच...

किशोरदांची माझी सर्वात आवडती ३ गाणी
१. जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम

२. फूलोंके रंग से दिल के कलम से

३. कभी अलविदा ना कहना

जन-गण-मन राष्ट्रगीताची शताब्दी

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

आज २७ डिसेंबर २०११.
शंभर वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी २७ डिसेंबर १९११ रोजी जन-गण-मन हे गीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता येथील कार्यक्रमात सर्वात पहिल्यांदा गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत रचलेले हे गीत भारताचे राष्ट्रगीत होईल असे त्यावेळी कोणाला वाटले असेल काय? टागोरांनी हे गीत कधी रचले ते माहित नाही. पण शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच ते सार्वजनिक झाले त्यामुळे या गीताच्या सार्वजनिक आयुष्याचा आज शताब्दी दिवस आहे.

जय हिंद ... जय भारत...

भारताचे राष्ट्रगीत म्हणून जन-गण-मन या गीताचे पहिले कडवेच म्हटले जाते व त्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता २४ जानेवारी १९५० रोजी मिळाली.

या गीतातील सिंध आता सध्याच्या पाकीस्तान मधे असल्यामुळे 'सिंध' हा शब्द बदलून 'सिक्कीम' टाकायचा प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन आहे. हा या संदर्भातील माहितीचा दुवा

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे...

जनमनगण हे संपूर्ण गीतः

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||

पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दु:स्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दु:ख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||

रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||

स्त्रोतः विकी

===========

माझे परमस्नेही श्री. अशोक पाटील यांनी जन-गण-मन या गीतामागचा उलगडलेला हा सत्य इतिहास

"त्या" गीताच्या इतिहासाबद्दल खूप लिहिले गेले आहेच यापूर्वीही, पण भारत सरकारच्या प्रसिद्धी संचालनालयाद्वारेच प्रकाशित झालेल्या Collected Works of Rabindranath Tagore मध्ये ज्या पत्राचा उल्लेख केला गेला आहे, त्यातील मजकूर वाचल्यानंतर त्यापुढे कसल्याही अन्य चर्चेचे प्रयोजन उरत नाही.

इंडियन नॅशनल कॉन्ग्रेसने १९११ मध्ये कलकत्ता इथे भरलेल्या वार्षिक अधिवेशनासाठी किंग जॉर्ज यांच्या स्तुतीप्रित्यर्थ एक स्वागतगीतसम गाणे टागोरांनी लिहून द्यावे अशी विनंती 'एका सर्टन हाय ऑफिशिअल" मार्फत त्यांना करण्यात आली (हा सर्टन हाय ऑफिशिअल म्हणजे पंडित नेहरू असावेत असा कयास नंतर मांडण्यात आला). या विनंतीमुळे जरी टागोर अस्वस्थ झाले तरी त्यानी हे गीत लिहिले, त्यात एम्पररची स्तुती नसून 'भारतमातेला समृद्ध करणारी जी कुणी अज्ञात दैवी शक्ती आहे' तिची आराधना केली आहे. आपले मित्र श्री.पुलिनबिहारी सेन याना लिहिलेले रविन्द्रनाथांचे खालील पत्र वाचा :

In a letter to Pulin Behari Sen, Tagore later wrote, “A certain high official in His Majesty’s service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Vidhata of India who has from age after age held steadfast the reins of India’s chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the
Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song."

पुढे १९१३ मध्ये टागोरांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांचे नाव सर्वतोमुखी होणे साहजिकच होते. विविध ठिकाणाहून इंग्रजी, बंगाली, हिंदी भाषांतून त्यांच्या अनेकविध साहित्याचे प्रकाशनही नियमित होत गेले. १९१९ मध्ये तर ब्रिटिश आधिपत्याखाली चालत असलेल्या शाळांमधून 'जन-गण-मन' चे रुपांतर Morning Song of India या शीर्षकाखाली झाले आणि सकाळच्या प्रार्थनेसाठी त्याचा उपयोग सुरू झाला.

पुढे १९४२ च्या म.गांधींच्या 'चले जाव' चळवळीला मिळालेले यश पाहून भारतवासियांची खात्री झाली होती की आज ना उद्या (दुसरे महायुद्ध समाप्तीनंतर) देश स्वतंत्र होणारच असल्याने त्याला पूरक असे राष्ट्रगीत तयार करणे गरजेचे आहे. अशावेळी पं.नेहरू यानीच पुढाकार घेऊन गुरुदेवांच्या या प्रदीर्घ गीतातील पहिल्या कडव्याचा त्या कारणासाठी विचार करायला आपल्या पक्षाला सांगितले, जे पुढे सर्वानुमते मान्य करण्यात आले. तेव्हा जरी ते गीत पंचम जॉर्ज यांच्या भेटीच्या निमित्ताने रचले गेले असले तरी ते त्यांची स्तुतीदर्शक होते असे मानू नये, कारण खुद्द टागोरांनीच त्या समजाचे लेखी स्वरूपात खंडन केले असल्याने तो विषय संपला. आपण घटना पवित्र मानतो आणि त्यानुसारच एक सुजाण नागरिक म्हणून आपले वर्तन ठेवतो. मग त्याच घटनेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेले "जन-गण-मन" सर्वांसाठी पवित्रच आहे, आणि म्हणून त्याचा सदैव आदर राखणे नितांत गरजेचे आहे.

भारतच नव्हे तर बांगला देशानेही १९७१ च्या स्वातंत्र्यानंतर आपले म्हणून जे राष्ट्रगीत निवडले ते "आमार शोनार बांगलादेश" ज्याची रचना तसेच चालही गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर यांचीच आहे आणि बांगलादेशी नागरिक ते गीत अभिमानाने आणि आदराने म्हणतात.

-अशोक पाटील

==========

वाचल्याबरोबर नष्ट होणारा ई-मेल संदेश

वाचल्याबरोबर नष्ट होणारा ई-मेल संदेश याबद्दल किती जणांना माहिती आहे हे मला माहित नाही, त्यामुळे मीमराठीच्या मित्र-मैत्रिणींसाठी हा दुवा व थोडी माहिती देतो आहे.

दुवा : http://www.privnote.com/

ही सुविधा कशी वापरायची?:

आपला खाजगी संदेश त्या व्यक्तीशिवाय कोणालाही माहिती होऊ नये अथवा त्याचा चुकूनसुद्धा गैरवापर होऊ नये असे वाटत असेल तर ही साईट तुम्हाला मदत करु शकेल.

प्रक्रिया अगदी सोपी आहे.

या साईट वर तुमचा मजकूर टाईप करा व लगेच त्याची लिंक मिळवा. तुम्ही तुमच्या ई-मेल आयडी वरुन हव्या असलेल्या व्यक्तीला ती लिंक पाठवा.

तुमचा हा गुप्त संदेश तुम्ही ज्याला पाठवला त्या व्यक्तीने फक्त त्या लिंक वर क्लिक करायचे म्हणजे त्याला हा संदेश वाचता येईल. हे फक्त एकदाच करता येईल. एकदा का संदेश त्या व्यक्तीने वाचला की पुन्हा दुसर्‍यांदा त्याच व्यक्तीला तीच लिंक वापरुन देखील वाचता वा वापर करता येणार नाही. शिवाय त्या व्यक्तीने तुमचा संदेश वाचल्याची पोचपावती मात्र तुमच्या ई-मेल वर तुम्हाला अवश्य मिळेल..

आहे की नाही खरा गुप्त संदेश हास्य

तेव्हा ही सुविधा वापरा आणि गुप्त संदेश खर्‍या अर्थाने गुप्त ठेवा

!!! सावधान !!! ... आकाश घोटाळा येत आहे...

नुकतीच सकाळ मधील ही बातमी वाचली.

आपले सरकार म्हणे जगातील सर्वात स्वस्त असलेले आकाश टॅब्लेट् पीसी विद्यार्थ्यांना अकराशे रुपये या सवलत दरात देणार आहेत.
वाटले वा खूप स्तुत्य उपक्रम आहे.
नंतर म्हटले गणित करुन बघूया किती रक्कम यासाठी खर्च होते आहे ते?

ते गणित असे आहे:

१ टॅब्लेट् १,१००/- रुपयांना (फक्त विद्यार्थ्यांना) (विद्यार्थी नसलेल्यांना २,२०० का २,४०० रु. दर आहे)

याप्रमाणे
२२ हजार टॅब्लेट्स २ कोटी ४२ हजार रुपयांना
२२ लाख टॅब्लेट्स २४२ कोटी रुपयांना
२२ कोटी टॅब्लेट्स २४ हजार २०० कोटी रुपयांना

यापेक्षा पैशाची उधळपट्टी दुसरी ती कोणती?
चालू वर्षातील एक लाख युनिट्स ( ते ही त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्रुटी असतानाही) ही संख्या वाढवून मागणी एकदम २२ कोटी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर नेऊन ठेवण्याची खरोखर गरज आहे काय?
या टॅब्लेट्सचा खप होण्याची हमी सरकार कोणत्या बळावर घेते आहे? भारताची लोकसंख्या मटावरील या बातमीप्रमाणे एक अब्ज २१ कोटी आहे.

१०० कोटी म्हणजे १ अब्ज यानुसार भारताची लोकसंख्या झाली १२१ कोटी
म्हणजे जवळपास सर्व लोकसंख्येच्या एक पंचमांश संख्येने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आकाश टॅब्लेट्वर खर्च करणे गरजेचे आणि आवश्यक आहे काय?
याचा अर्थ अगदी स्पष्ट आणि उघड आहे. २०१४ साली निवडणुका आहेत. त्याआधीच मोठी कमाई करुन घ्यायचा हा डाव आहे. समाजातील विचारवंत, विरोधी पक्षनेते आणि सर्वच थरातील लोकांनी या निर्णयाला विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आकाश टॅब्लेट ही काही गरज नाहिये, ही चैन आहे (ते ही त्यातील त्रुटी अजूनही दूर झालेल्या नसताना). त्यापेक्षा तेच पैसे शेती व इन्फ्रास्ट्रक्चर यांकडे वळवले तर त्याचा देशाच्या प्रगतीसाठी फायदा तरी आहे.
मी असे म्हणत नाही की आकाशची निर्मिती करुच नये. पण १ लाख टॅब्लेट्स वरुन हा आकडा आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या एक पंचमांश एवढा मोठ्या प्रमाणावर नेण्याची खरोखर गरज आहे काय?

त्यातही अजून भ्रष्टाचार होणार आहे. आकाश च्या निर्मितीची कंत्राटे कंपन्यांना देण्यासाठी कोट्यावधी रुपयांची लाच घेतली जाणार आहे.

महानरेगा, कॉमनवेल्थ, टेलिकॉम, हवाला, आणि भविष्यात आता आकाश घोटाळा समोर दिसतो आहे. मी मात्र सामान्य माणूस. गप्प बघत बसणार आहे. Sad

विचार पटले तर पसरवा अन्यथा ठळकवलेले वाक्य वाचा आणि मूग गिळून स्वस्थ बसा.

मानवंदना : वासुदेव बळवंत फडके

आज १७ फेब्रुवारी.
आजच्या पुण्यदिनी थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मरण न होणे अशक्यच. आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचे आणि प्राणांचे दिलेले अर्घ्य आजच्या धकाधकीच्या जीवनात विसरुन जात आहोत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या हा महान क्रांतिकारक १७ फेब्रुवारी १८८३ रोजी हुतात्मा झाला.

वासुदेव बळवंत फडके

२० जुलै १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना कलदगी गावातील देवळात इंग्रज व फडके यांच्यात तुंबळ लढाई झाली. पण इंग्रजांनी पूर्ण घेराबंदी करुन वासुदेव बळवंत फडके यांना जिवंत पकडले. पुण्याच्या तुरुंगात ठेवून तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काका या नावाने प्रसिद्ध असलेले श्री.गणेश वासुदेव जोशी यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या काळात अशा क्रांतिकारकांचे निवाडे कसे होत हे सांगण्याची गरजच नाही. त्यामुळे नाममात्र खटला चालवायचा आणि क्रांतिकारकांना फासावर लटकवायचं हे इंग्रजांचं दडपशाहीचं धोरण होतं.

पण सार्वजनिक काकांनी केलेल्या युक्तीवादामुळे वासुदेव बळवंत फडके यांना फाशीची शिक्षा न होता त्याऐवजी त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. अरेबियातील एडन येथील तुरुंगात फडके यांना पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी आपल्या मातृभूमिकडे पलायन करायचा चंग बांधला. एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागर्‍यांसकट उचकटून काढून त्यांनी तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना पुन्हा पकडले व तुरुंगात टाकले.
तुरुंगात आपल्याला मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकी विरुद्ध वासुदेव बळवंत फडके यांनी आमरण उपोषण केले व शेवटी त्यांना त्यातच १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यू आला.

अशा या लढवय्या महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना माझी मानवंदना.